MNS Raj Thackeray: भोंग्यांच्या डेडलाईन आधीच शिवतीर्थावर मनसेची खलबतं; राज ठाकरे काय आदेश देणार?
MNS Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांवरून राज्य सरकारला इशारा दिला आहे. राज ठाकरे यांनी सरकारला भोंगे उतरवण्यासाठी 3 मेची डेडलाईन दिली आहे. पण या डेडलाईनच्या आधी म्हणजे 14 दिवस आधीच राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर मनसैनिकांची बैठक बोलावली आहे.
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्यांवरून राज्य सरकारला (maharashtra government) इशारा दिला आहे. राज ठाकरे यांनी सरकारला भोंगे उतरवण्यासाठी 3 मेची डेडलाईन दिली आहे. पण या डेडलाईनच्या आधी म्हणजे 14 दिवस आधीच राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर मनसैनिकांची (mns) बैठक बोलावली आहे. आज शिवतीर्थावर ही बैठक होत असून बैठकीला मनसे पदाधिकारी जमू लागले आहेत. त्यामुळे या बैठकीत राज ठाकरे नेमके काय आदेश देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. डेडलाईननंतर काय करायचं यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. राज्यभरात एकाच वेळी हनुमान चालिसा करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात येणार असून या मोहिमेसाठी पदाधिकाऱ्यांवर काही जबाबदारी दिली जाणार असल्याचेही संकेत मिळत आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी बोलावलेल्या या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यावरून राज्य सरकारला दिलेल्या इशाऱ्यानंतर पहिल्यांदाच शिवतीर्थावर ही बैठक होत आहे. या बैठकीला मनसेचे मुंबई-ठाण्यासह राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीत मशिदीवरील भोंगे हटवण्यावर आणि महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे. त्याशिवाय पदाधिकाऱ्यांवर काही जबाबदाऱ्या सोपवल्या जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. यावेळी राज ठाकरे यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राज ठाकरे काय म्हणाले होते?
राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मुंबईतील सभेत भोंगे हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर ठाण्यातील सभेत त्यांनी भोंगे हटवण्यासाठी 3 मेची डेडलाईनही दिली होती. 3 मेपर्यंत भोंगे हटवले नाही तर मशिदीसमोरच हनुमान चालिसाचं पठण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर पुण्यातील पत्रकार परिषदेत 3 तारखेनंतर मनसैनिकांनी सज्ज राहावे, असे जाहीर आदेशच दिले होते. त्यांनी भोंगे हटवले नाही तर जशास तसे उत्तर दिले जाईल. त्यामुळे भोंगे हटवा, असं आवाहन त्यांनी केलं होतं. सरकारने राज ठाकरे यांच्या या धमकीची गंभीरपणे दखल घेतली भोंग्यांचा आवाज कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर नाशिकसह काही भागातील पोलीस आयुक्तांनी अनधिकृत भोंग्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
Maharashtra | MNS Chief Raj Thackeray will hold a meeting with the party’s top leaders at his residence today. In today’s meeting, a strategy will be prepared on the issues of May 3 ultimatum to remove mosque loudspeakers, May 1 party meeting in Aurangabad & Ayodhya visit in June
— ANI (@ANI) April 19, 2022
संबंधित बातम्या: