‘कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही,’ मनसे नेत्याने करून दिली उद्धव ठाकरे यांना राज ठाकरेंच्या ट्वीटची आठवण
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरें यांना राज ठाकरे यांच्या एका ट्वीटची आठवण करून दिली आहे. ज्यात राज ठाकरे यांनी म्हटलं होतं की, राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे, आमच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा तार्मपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही, असं म्हटलं आहे.
मुंबई : काही दिवसांपूर्वीच राज्यात झालेल्या राज्यसभा निवडणूकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा झालेल्या पराभव हा शिवसेनेच्या जिव्हाळी लागणारा होता. हे नुकसान भरून निघते ना निघते तोच विधानपरिषद निवडणूकीत ही महाविकास आघाडी सरकारला झटका बसला. तर शिवसेनेचे काही मतं फुटली. याचदरम्यान भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांनी महाविकास आघाडी सरकार हे अल्पमतात आल्याचे म्हटलं होतं. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुतोवाच करताना तसेच महाविकास आघाडी सरकारमधील असणारी धुसफूस ही यानिमित्ताने बाहेर आल्याचे म्हटलं होतं. त्यानंतरच शिवसेनेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपली नाराजी व्यक्त करत आपण काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राहणार नसल्याचे म्हटलं आणि भाजपसोबत पुन्हा युती करा असा प्रस्ताव मुख्यमंत्री आणि शिवसेना पत्रप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिला. त्यानंतर राज्यातील राजकारण हे तंग झाले आहे. तर आता माहाविकास आघाडी सरकार हे काही सत्तेत राहणार नाही अशी चर्चा राज्यभर रंगली आहे. याच दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी शिवसेनेवर तोफ डागताना एक ट्वीट केले आहे. ज्यात त्यांनी म्हटलं आहे, लक्षात आहे ना? राज साहेबांनी काय म्हटलं होतं…सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा तार्मपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही, असं म्हटलं आहे. ज्यामुळे हे प्रकरण अधिक तापण्याचे चिन्ह दिसत आहेत.
लक्षात आहे ना? pic.twitter.com/J02My2lwyb
हे सुद्धा वाचा— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 21, 2022
राज्यात सत्तेत असणारे महाविकास आघाडी सरकार हे अल्पमतात सध्या आल्याचे चित्र आहे. तर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा नाही म्हटलं आहे. तसेच त्यांनी आपल्या सोबत 35 पेक्षा जास्त आमदारांना घेतलं आहे. ज्यामुळे शिवसेनेची पक्षीय ताकद आता पणाला लागली आहे. तर शिंदे हे सहकारी आमदारांसह सुरतमध्ये असल्याची माहिती आहे. तर याच बंडावरून मनसे ने शिवसेनेची पुन्हा एकदा खोड काढली आहे. यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरें यांना राज ठाकरे यांच्या एका ट्वीटची आठवण करून दिली आहे. ज्यात राज ठाकरे यांनी म्हटलं होतं की, राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे, आमच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा तार्मपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही, असं म्हटलं आहे.
काल काल काही फुटले आज १३ झाले यालाच तीन तेरा वाजणे म्हणतात…. pic.twitter.com/JCC0qr2r6f
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 21, 2022
याच दरम्यान भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी देखील खोचक टीका करणारं ट्विट केले. त्या म्हणाल्या, विधान परिषद निवडणुकीमध्ये काही फुटले, आज तेरा गेले यालाच तीन तेरा वाजणे. चित्रा वाघ यांच्यापूर्वी भाजप नेते अनिल बोंडे यांनी देखील याच मुद्द्यावरून शिवसेनेवर टीका केली होती.