Raj Thackrey Speech : कितीही लाथा मारल्या ढुंगणावर, राज ठाकरेंनी, मलिक, भुजबळांची जेलवारी काढली

देशाच्या उद्योगपतीच्या घराजवळ गाडी सापडते त्याचं उत्तर महाराष्ट्राला मिळत नाही, देशाला मिळत नाही. गृहमंत्री आत जातो. पोलीस कमिशनरला काढून टाकलं जातं. पोलिस कमिशन म्हणतो गृहमंत्र्यांने 100 कोटी मागितले. एक अधिकारी तुरुंगात जातो. हे आठवतं का तुम्हाला. ज्याने गद्दारी केली त्याला विसरतो. याच गोष्टीचा ते फायदा घेत आले.

Raj Thackrey Speech : कितीही लाथा मारल्या ढुंगणावर, राज ठाकरेंनी, मलिक, भुजबळांची जेलवारी काढली
राज ठाकरेImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 9:32 PM

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackarey) यांनी आज शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळावा (Gudhipadawa Melava) घेतला. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात नवाब मलिक आणि छगन भुजबळांवर चांगलेच टीकास्त्र सोडले. अँटेलिया शस्त्र प्रकरण, नवाब मलिक अटक, छगन भुजबळांचा शपथविधी यावर शरसंधान साधले. दोन अडीच वर्ष तुरुंगात गेलेल्या भुजबळ स्वातंत्र सैनिक नव्हते, देशाच्या उद्योगपतीच्या घराजवळ गाडी सापडते त्याचं उत्तर मिळत नाही देशाला असे राज ठाकरे म्हणाले. (MNS president Raj Thackeray criticizes Nawab Malik Chhagan Bhujbal Antelia case at Gudi Padwa rally)

अँटेलिया शस्त्र प्रकरणी राज ठाकरेंकडून समाचार

कोण तरी वझे. तो वझे कुठे होता शिवसेने. तो वझे जिलेटिन ठेवतो. ती गाडी देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतीच्या घराखाली गाडी ठेवतो. हिंमत कशी होते. हे काय सहज झालं ? एका पोलिसवाल्याला वाटलं, त्याने एक गाडी घेतली, त्यात जिलेटि ठेवले आणि गाडी नेऊन देशातील एका उद्योगपतीच्या घराजवळ नेऊन ठेवली. तेव्हा सांगतिलं होतं याचे उत्तर तुम्हाला सापडणार नाही. हे सर्व भरकटवत नेणार हे विषय. माझ्या परिचयाचे एक आहेत. त्यांना गाणं गाण्याचा भयंकर शोक होता. काही चार पाच झाले ते गाणं म्हणायचे. रमय्या वस्तावया. ते ताण द्यायचे. ती तान साधारण एक मिनिटभर चालायची. त्यांना वाटायचं सूर चांगला होता. नंतर ते पुन्हा विचारायचं गाना कौनसा था. तशी ती तान आहे. त्यावर आज कोण बोलत नाही.

देशाच्या उद्योगपतीच्या घराजवळ गाडी सापडते त्याचं उत्तर महाराष्ट्राला मिळत नाही, देशाला मिळत नाही. गृहमंत्री आत जातो. पोलीस कमिशनरला काढून टाकलं जातं. पोलिस कमिशन म्हणतो गृहमंत्र्यांने 100 कोटी मागितले. एक अधिकारी तुरुंगात जातो. हे आठवतं का तुम्हाला. ज्याने गद्दारी केली त्याला विसरतो. याच गोष्टीचा ते फायदा घेत आले. नवीन टूम काढतात, अशा शब्दात अँटेलिया प्रकरणी राज ठाकरेंनी समाचार घेतला.

आमच्या हातात सत्ता द्या, आम्ही वाटेल ते करू

दाऊदशी संबंध आलेला नवाब मलिकांचा, तेही आत गेले. याच शिवतिर्थावर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. दोन अडीच वर्ष तुरुंगात गेले त्या भुजबळांचा शपथविधी झाला. ते काही स्वातंत्र्य सैनिक नव्हते. सत्ता आल्यावर त्यांना मंत्रिपद द्यावं. हे तुमच्या नाकावर टिच्चून करतात. कोण तुम्ही ? एका दिवसाचे मतदार. जो माणूस तुरुंगात होता, त्याला पहिला मंत्री केले. गृहमंत्री आत गेला काही फरक पडत नाही. काय करणार तुम्ही. मुंबईत बॉम्बस्फोट घडवणाऱ्या दाऊदशी संबंधित मलिकांना आत टाकलं. त्यांची हिंमत बघा.गाडीत बसताना ते तुम्हाला अंगठा दाखवतात. ते तुम्हाला मेंढरासारखं वापरतात, अशी टीका करत आमच्या हातात सत्ता द्या, आम्ही वाटेल ते करू, असे आवाहन राज ठाकरेंनी केले. (MNS president Raj Thackeray criticizes Nawab Malik Chhagan Bhujbal Antelia case at Gudi Padwa rally)

संबंधित बातम्या

Raj Thackrey Speech : ‘राष्ट्रवादीनं दुसऱ्या जातीचा द्वेष करायला लावला’, राज ठाकरेंचा शरद पवारांवर पुन्हा थेट आरोप

Raj Thackrey : ‘साला पळून कोणा बरोबर गेली, लग्न कोणा बरोबर केलं?’ उद्धव ठाकरेंच्या जुगाडावर राज ठाकरेंचं थेट बोट

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.