Raj Thackeray | राज ठाकरेंची वाशी कोर्टात हजेरी, 9 नंबरच्या कारने ‘कृष्णकुंज’हून रवाना

राज ठाकरे हे 9 हा अंक लकी मानतात. त्यामुळे मनसेचे महत्त्वाचे निर्णय, शुभारंभ हा 9 या नंबरभोवती फिरताना दिसतो. (Raj Thackeray Lucky Number 9 Car)

Raj Thackeray | राज ठाकरेंची वाशी कोर्टात हजेरी, 9 नंबरच्या कारने 'कृष्णकुंज'हून रवाना
राज ठाकरे यांची ९ नंबरची कार
Follow us
| Updated on: Feb 06, 2021 | 12:37 PM

नवी मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी वाशी न्यायालयात हजर झाले आहेत. कोर्टात हजेरीसाठी जाताना राज ठाकरे कृष्णकुंज निवासस्थानावरुन 9 क्रमांकाच्या गाडीने रवाना झाले. नऊ हा राज ठाकरे यांचा लकी नंबर मानला जातो. राज ठाकरेंसोबत मनसे नेते नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर उपस्थित आहेत. तसेच त्यांच्यासोबत वकिलांची फौजही आहे. (MNS Raj Thackeray Lucky Number 9 Car for Vashi Toll Naka Court Case)

कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी राज ठाकरे 9 या क्रमांकाची निवड करत असल्याचं निरीक्षण कायम नोंदवलं जातं. वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणातही न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने लागावा, यासाठी राज ठाकरेंनी 9 क्रमांकाच्या गाडीची निवड केल्याची कुजबूज आहे.

राज ठाकरेंचं 9 नंबर कनेक्शन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे 9 नंबरला ‘लकी’ मानतात. पूर्वी शिवसेनेत असताना असो किंवा मग मनसेची स्थापना केल्यानंतर असो, राज ठाकरेंचं हे ‘9’ अंकावरील प्रेम वारंवार दिसत राहिलं आहे. आपल्या मुलाच्या लग्नाच्या निमित्तानं देखील राज ठाकरेंनी आपला लकी नंबर जपण्याचा पूरेपूर प्रयत्न केला.

विधानसभा निवडणुकीतही राज ठाकरेंनी आपल्या प्रचाराची सुरुवात 9 तारखेपासून केली होती. पहिल्या सभेसाठी मुहूर्त मनसेने आपला लकी नंबर 9 निवडला होता. राज ठाकरे हे 9 हा अंक लकी मानतात. त्यामुळे मनसेचे महत्त्वाचे निर्णय, शुभारंभ हा 9 या नंबरभोवती फिरताना दिसतो.

राज ठाकरेंनी आपल्या पक्षाची भूमिका बदल्यानंतर हिंदुत्वाकडे वाटचाल केली आहे. पक्षाची भूमिका बदलल्यांतर राज यांनी पहिला मोर्चा गेल्या वर्षी 9 फेब्रुवारी रोजी आयोजित केला होता.

राज ठाकरेंचा लकी नंबर 9

  • 27 (2+7) नोव्हेंबर 2005 : शिवसेना सोडण्याची घोषणा
  • 18 (1+8) डिसेंबर 2005 : शिवसेना सोडली
  • 9 मार्च 2006 : महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाच्या स्थापनेची घोषणा
  • 18 (1+8) मार्च 2006 : शिवतीर्थावरील पहिली सभा

गाड्यांचे नंबर, मुलाच्या लग्नाचा मुहूर्त

राज ठाकरे यांच्या सर्व गाड्यांचा नंबर 9 आहे. इतकंच काय त्यांचा मुलगा अमितच्या लग्नाचा मुहूर्तही 27 जानेवारी (2+7) दुपारी 12 वाजून 51 मिनिटांनी (1+2+5+1 = 9) होता.

वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी हजेरी

नवी मुंबईतील वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात बेलापूर न्यायालयाने वॉरंट जारी केलं आहे. सकाळी अकरा वाजताच्या सुमारास राज ठाकरेंचा ताफा कृष्णकुंज निवासस्थानावरुन रवाना झाला. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी मनसैनिकांनी वाशी टोलनाक्यावर पोस्टरबाजी केली होती.

दादर ते नवी मुंबई या मार्गावर मनसैनिकांनी शक्तिप्रदर्शन केलं. सर्वप्रथम राज ठाकरे नवी मुंबईतील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात गेले. यावेळी तुतारीच्या निनादात त्यांचं स्वागत करण्यात आलं. राज ठाकरे यांचं मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी औक्षण केलं. त्यानंतर काही वेळात राज ठाकरे वाशी कोर्टात रवाना झाले. मनसे कार्यालय आणि वाशी न्यायालय परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. (MNS Raj Thackeray Lucky Number 9 Car for Vashi Toll Naka Court Case)

राज ठाकरेंचे वकील काय म्हणतात?

मनसे प्रमुख राज ठाकरेंना जानेवारी महिन्यात वॉरंट बजावण्यात आलं होतं. मनसेच्या विधी व न्याय विभागाची फौज वाशी न्यायालय परिसरात दाखल झाले आहे. राज ठाकरेंना जामीन मंजूर होईल, अशी आशा अ‌ॅड. रविंद्र पाष्टे यांनी सांगितलं. मनसेच्या विधी विभागाचे वकील मोठ्या संख्येने वाशी न्यायालय परिसरात उपस्थित आहेत.

राज ठाकरेंच्या भाषणानंतर टोलनाक्याची तोडफोड

26 जानेवारी 2014 रोजी वाशीमध्ये राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. राज ठाकरे यांच्या या भाषणानंतर मनसैनिकांनी वाशी टोलनाक्याची तोडफोड केली होती. या प्रकरणी राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर वाशी न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

मनसैनिकांकडून ग्रँड वेलकम

राज ठाकरे येणार असल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं ग्रँड वेलकम करण्याचं ठरवलं आहे. नवी मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे येत असल्याने याचा राजकीय फायदा नक्कीच मनसेला होईल अशी आशा मनसैनिकांना वाटते.

संबंधित बातम्या :

गाडीचा नंबर, पहिली सभा ते मनसेचा महामोर्चा, राज ठाकरेंचं 9 नंबर कनेक्शन

वाशी टोलनाका तोडफोड प्रकरण, राज ठाकरे कोर्टात हजर राहणार, मनसेच्या वकिलांची तगडी फौज उपस्थित

पहिली सभा ते उमेदवार यादी, राज ठाकरेंचा लकी नंबर

(MNS Raj Thackeray Lucky Number 9 Car for Vashi Toll Naka Court Case)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.