Kunal Karma : धन्यवाद कुणाल कामरा, ‘त्या’ गाण्याबद्दल मनसेच्या नेत्याने थेट मानले आभार !
स्टँडअप कॉमेडिअन कुणाल कामरा याने एका शोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं गायल्याने मोठा गदारोळ माजला. गेल्या 2-3 दिवसांपासून या मुद्यावरून वातावरण तांपलेलं असून राज्यात नवा वादही पेटला आहे.

स्टँडअप कॉमेडिअन कुणाल कामरा याने एका शोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं गायल्याने मोठा गदारोळ माजला. गेल्या 2-3 दिवसांपासून या मुद्यावरून वातावरण तांपलेलं असून राज्यात नवा वादही पेटला आहे. मात्र कुणाल कामरा आपल्या भूमिकेवर ठाम असून माफी मागणार नसल्याचे त्याने स्पष्ट केलं. उलट त्या व्हिडीओनंतर त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एकापाठोपाठ एक असे नवे व्हिडीओही शेअर केले आहेत. त्यातीलच एका व्हिडीओमध्ये त्याने राज्यातील मेट्रोची काम, रस्त्यांची दुर्दशा या मुद्यांवरूनही सरकारला टार्गेट केलं आहे.
सत्ताधारी कुणाल कामरावर भडकले असले तरी विरोधकांनी मात्र त्याची बाजू उचलून धरली आहे. कुणाल कामराला अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेत, राजू पाटील यांनीही X या सोशल मीडिया साईटवरील त्यांच्या अकाऊंटवर कुणाल कामराचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी कुणाला कामराला टॅगही केले असून, डोंबिवलीकरांच्या व्यथा मांडल्याबद्दल त्यांनी कुणालला धन्यवादही दिलेत. यामुळेही हा आता नवा वाद निर्माण होऊ शकतो.
धन्यवाद @kunalkamra88 , आम्हा डोंबिवलीकरांच्या व्यथा मांडल्याबद्दल ! #बिल्डरांची_मेट्रॅा #MMRDA #MSRDC #टक्केवारी #kunal_kamra pic.twitter.com/R7smgHaymm
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) March 26, 2025
काय आहे ते गाणं ?
इन सडकोंकी बरबादी करने सरकार है आई..
मेट्रो है इनके मन मैं, खोद कर ये ले अंगडाई..
ट्राफिक बढाने ये है आई,ब्रिजेस गिराने ये है आई
कहते है इसको, तानाशाही
असे या गाण्याचे बोल आहेत. राजू पाटील यांनी तो व्हिडीओ त्यांच्या अकाऊंटवर शेअर केला आहे. तसेच #बिल्डरांची_मेट्रॅा #MMRDA #MSRDC #टक्केवारी #kunal_kamra असे हॅशटॅगही पाटील यांनी त्याखाली वापरले आहेत.
असा पेटला वाद
कॉमेडियन कुणाल कामरा यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यावर गाणे गायले होते. एका शोमधील व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र या गाण्याच्या बोलवरुन शिवसैनिक संतापले. त्यांनी कॉमेडियन कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दुसरीकडे शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी हे गाणे ट्विट केल्याने हा वाद आणखीनच पेटला. त्यानंतर शिवसैनिकांनी हा शो जिथे झाला त्या हॉटेलमध्ये जाऊन शोच्या सेटची तोडफोड केली होताी.
काय होतं ते गाणं ?
महाराष्ट्राच्या राजकारणावर कुणाल कामराने भाष्य केलं. आधी शिवसेना भाजपामधून बाहेर आली, नंतर शिवसेना शिवसेनेतून बाहेर आली. राष्ट्रवादी राष्ट्रवादीतून बाहेर आली. या प्रकारात सर्वच कन्फ्यूज झाले. हा प्रकार एकाने सुरु केला होता, असे सांगत कुणाल गाणं सुरू करतो. ‘ठाणे की रिक्षा चेहर पर दाढी, ऑख पर चष्मा….मेरी नजर से दोखो तो गद्दार नजर आये…. ‘ या गाण्यात त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांचे नाव घेतले नाही, पण त्याचा रोख त्यांच्याकडेच होता.