Sanjay Raut : ‘या पोकळ शंभुंनी समजून घ्यावं’, संजय राऊत यांचा घणाघात
Sanjay Raut : "तुमचं हेच धोरण आहे, धमक्या देणं. पूर्वी अंडरवर्ल्डचे लोक धमक्या द्यायचे. माणसं मारायचे. अपहरण करायचे. त्याच पद्धतीने हे लोक टोळ्या चालवत आहेत. शेवटी अमित शाह आहेत. दुसरे काय करणार. तेच करणार ना. पक्ष फोडणार, घरं फोडणार, दुकानं फोडणार. गुजरातमध्ये जो पॅटर्न चालवला तोच महाराष्ट्रात चालवत आहेत" अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली.

आनंद दिघे असताना संजय राऊत शिवसेनेत नव्हते असं शंभुराज देसाई म्हणाले. “शंभुराज देसाई शिकवणार का? काँग्रेस पक्षातून इथे बेडका सारखा उडी मारलेला शंभुराज देसाई आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे शिकवणार का? एवढी महाराष्ट्राची अवस्था खराब झाली नाही. त्यांनी इतिहास वाचावा. ज्या विषयावर खटला चालला. गद्दारांना क्षमा नाही. तो खटला काय होता. त्यात राऊतांची भूमिका काय होती. या पोकळ शंभुंनी समजून घ्यावं. हे भैसटलेले आणि भरकटलेले आहेत” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
“त्यांचे पक्षप्रमुख अमित शाह यांनी त्यांना तंबी दिली. फडणवीसांची चाकरी करा, नाही तर सरकारमधून दूर व्हा. तुमच्याशिवाय हे सरकार चालेल. मला त्यांच्या चर्चा माहीत आहेत. फार शहाणपणा करू नका. त्यामुळे खातेपिते घरं सोडून कसे जातील. त्यांना त्यांच्या नेत्यांनी सांगितलं आहे, इथेच राहू. भांडी घासू. चाकरी करू. गुलामी करू. बाहेर पडता येणार नाही. त्यामुळेच त्यांनी दिघे, ठाकरे आम्हाला शिकवू नये” असं संजय राऊत म्हणाले.
‘तुम्हीच फोटो काढा आणि आम्हाला पाठवा’
शंभुराज देसाई म्हणाले की, नाशिकच्या मेळाव्याचा फोटो काढून ठेवा. महिन्याभरात सर्व लोक शिंदे गटात येतील. “तुम्हीच फोटो काढा आणि आम्हाला पाठवा. कोण येतात ते. काहीच हरकत नाही. लुटलेला पैसा राजकीय कार्यकर्त्यांना विकत घेण्यासाठी वापरायचा. हा तुमचा धर्म आहे. धर्मवीरांचा नवा. या धमक्या देऊ नका. अजिबात धमक्या देऊ नका” असं संजय राऊत यांनी शंभूराज देसाईना ठणकावून सांगितलं.
‘शेवटी अमित शाह आहेत, दुसरे काय करणार’
“तुमचं हेच धोरण आहे, धमक्या देणं. पूर्वी अंडरवर्ल्डचे लोक धमक्या द्यायचे. माणसं मारायचे. अपहरण करायचे. त्याच पद्धतीने हे लोक टोळ्या चालवत आहेत. शेवटी अमित शाह आहेत. दुसरे काय करणार. तेच करणार ना. पक्ष फोडणार, घरं फोडणार, दुकानं फोडणार. गुजरातमध्ये जो पॅटर्न चालवला तोच महाराष्ट्रात चालवत आहेत. अमित शाह त्यांच्या पक्षाचं पावित्र्य जपत आहेत. पण एकनाथ शिंदे, अजित पवार ते त्यांची वाट लावणार” अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली.
