Sanjay Raut : ‘माझ्या नादाला लागू नको, नागडा करीन मी’, संजय राऊत यांची राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याला वॉर्निंग
"दाऊदचा आरोप आम्ही नाही केला. देशाच्या पंतप्रधानांनी केला. कुछ लोग मिर्ची का व्यवहार करते है और कुछ लोग मिर्ची से व्यवहार करते है, हे भंडाऱ्यात कोण बोललं. कुठला मिर्ची? कुणाविषयी बोलले. ईडीची केस पाहा. नंतर भाजपमध्ये जाऊन बुट चाटून त्यांची चाटूगिरी करून आरोप धुण्याचा प्रयत्न केला. दाऊदशी व्यवहार, इक्बाल मिर्चीशी व्यवहार. मुंबईत १०० हून अधिक बॉम्बस्फोट केले अशा माणसाशी व्यवहार" अशी टीका संजय राऊत यांनी केली.

“प्रफुल्ल पटेल दाऊदच्या पक्षातून जाऊन आले. दाऊदच्या पक्षातून भाजपमध्ये आले. भाजपमध्ये का आले तर आपली संपत्ती वाचवायला. तुरुंगात जाण्याची भीती असल्याने बचाव करण्यासाठी प्रफुल्ल पटेल दाऊदच्या सर्व संबंधासह भाजपात गेले. राष्ट्रवादाची आणि राष्ट्रीय सुरक्षेची भाषा करणाऱ्या अमित शाह यांनी त्यांना धुवून घेतलं. कारण ती वॉशिंग मशीन आहे. पटेल संसदेत आहे आम्हाला लाज वाटते हो. दाऊदचे हस्तक भाजपने संसदेत घेतले. ते दुसऱ्यांना निष्ठेच्या गोष्टी सांगतात, रंग बदलण्याच्या गोष्टी सांगतात. अजित पवार यांनी स्वत:चं अवमूल्यन करून घेतलंय” अशी टीका अजित पवार यांनी केली.
“प्रफुल पटेलसारख्या माणसांना. पटेल हे दलाल आहेत. पटेलांसारखे लोकं कुणाचीच नाहीत हे दलाल आहेत. कधी काँग्रेसची दलाली करत होते, कधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार यांना बाप बाप करत होते. कधी दाऊदची दलाली करत होते आणि इथे आल्यावर मग त्यांची संपत्ती मोकळी झाली. हजार भर कोटीची. अशा लोकांची संसदेत उभं राहून बोलण्याची लायकी आहे का?” अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली.
दाऊद इब्राहीमचा हिरवा रंग लागला
“आम्ही कसले रंग बदलले. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात आहोत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आहोत. तुमचे रंग आधी पाहा. तुमचा रंग कोणता आहे. तुम्हाला दाऊद इब्राहीमचा हिरवा रंग लागला आहे. आणि तुम्ही वक्फवर बोलतात. मी प्रफुल्ल पटेलांना सांगतो माझ्या नादाला लागू नको. नागडा करीन मी” अशा शब्दात राऊतांनी प्रफुल पटेल यांना इशारा दिला. “तिथे भाजपच्या लोकांना चमचेगिरी करून दाखवत होते. अशा घाण दळभद्र्याच्या तोंडाला लागणं हे शत्रू आहेत महाराष्ट्राचे. कशाला प्रफुल्ल पटेल भेटल्यावर नमस्कार करतो. जणू काय आकाशातून निष्ठेचा एक मूर्तीमंत पुतळा पडलोय, फार मोठा राष्ट्रभक्त आहे, अशा पद्धतीने” अशी टीका राऊत यांनी केली.
काय लेव्हल आहे का यांची फडणवीस यांच्या बाजूला बसायची
“त्यांचा इतिहास काढायला लागलो सर्व तर त्यांना महाराष्ट्र सोडून जावं लागेल. ही लोकं फडणवीस यांच्या बाजूला जाऊन बसणार. काय लेव्हल आहे का यांची फडणवीस यांच्या बाजूला बसायची. हे वाकलेले लोकं आहेत. यांना पाठिचा कणा नाही. हे लोक महाराष्ट्राचं नेतृत्व संसदेत करतात. भाजपही या लोकांना खांद्यावर घेऊन बसतात. भाजपनेही स्वत:ची लायकी काढली” अशी टीका संजय राऊत यांनी केली.