नरेंद्र मोदी विष्णूचा अवतार, मग ट्रम्पवर आत सुदर्शन चक्र सोडलं पाहिजे – संजय राऊत
"बाळासाहेबांनी जावेद मियादाद यांना बोलावलं नव्हतं. दिलीप वेंगसरकर यांच्यासोबत जावेद मियादाद आले होते. जावेदला बाळासाहेबांनी सुनावले होते की, आम्ही पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळणार नाही. आता हे लोक पाकिस्तान सोबत हात मिळवणी करत आहेत" अशी टीका संजय राऊत यांनी केली.

खासदार संजय राऊत काल उद्धव ठाकरे यांना श्रीकृष्ण बोलले. त्यावरुन सत्ताधाऱ्यांनी टीका केली. त्याला आज संजय राऊत यांनी उत्तर दिलं. “मला पोटशूळ उठत नाही. मी अजिबात तुलना केलेली नाही. त्यांनी पहाव, ते मुर्ख लोक आहेत. नरेंद्र मोदी विष्णूचा अवतार चालू शकतो का, नरेंद्र मोदी विष्णूचे 13 वे 14 वे अवतार. नॉन बायोलॉजिकल, त्यांना देवानेच आकाशातून पाठवलय. हे बावनकुळे, उदय सामंत लोकांना चालू शकतं का? कोणीही कोणाची तुलना केलेली नाही” असं खासदास संजय राऊत म्हणाले. “आम्ही माणसं आहोत. आम्ही देव नाही, म्हणून आम्ही संघर्ष करतोय. उद्धव ठाकरे यांचं नाव हे श्रीकृष्णाची असंख्य नाव आहेत, त्यात उद्धव एक नाव होतं हे मी सांगितलं. सहदेव होते, सहदेव महाभारतातल पात्र आहे, पांडवामध्ये एक सहदेव होते. संजय आहेच कायम महाभारतात” असं संजय राऊत म्हणाले.
“यांच्या कानाचे ऑपरेशन्स केले पाहिजेत किंवा मेंदूतील कचरा साफ केला पाहिजे. आम्ही कधी बाळासाहेबांची देवाशी तुलना केली नाही. यांना बाळासाहेब ठाकरे, वीर सावरकर, उद्धव ठाकरे कळले नाहीत, मग यांना काय कळतय? यांना फक्त चमचेगिरी, चाटुगिरी कळते” अशी टीका संजय राऊत यांनी केली. “नरेंद्र मोदी हे विष्णूचा अवतार आहेत, ट्रम्प तिथे भारताला धु धु धुतोय आणि विष्णूचे अवतार गप्प आहेत. अख्ख जग ट्रम्पच्या विरोधात उठलं आहे, आणि फक्त एकच देश भारत देश तोंडात गोळ्या घालून बसलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचा अवतार आहेत, मग या देवाने ट्रम्पवर सुदर्शन चक्र सोडलं पाहिजे” असं संजय राऊत म्हणाले.
भाजपचे मंत्री पाकिस्तानी क्रिकेटरच्या अंडर काम करणार
आशिया क्रिकेट कौन्सिलच्या अध्यक्षपदी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसीन नक्वी यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातील भाजपचे मंत्री आशिष शेलार यांची सुद्धा ACC च्या सदस्यपदी निवड झाली आहे. त्यावरुन संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. “जागतिक क्रिकेटचा उध्दार भारतालाच करावा लागत आहे. जय शाह यांनी शंभर सेंच्युरी मारल्या, शंभर झेल पकडले असे महान जय शाह भारतीय क्रिकेटचे सूत्रधार आहेत. ते दुबईत इस्लामी देशात बसलेत. पाकिस्तानचा एक क्रिकेटपटू आणि शेलार हातात हात घालून काम करणार आहेत. भारतीय क्रिकेटच्या उद्धारासाठी भारतातले भाजपचे मंत्री पाकिस्तानी क्रिकेटरच्या अंडर काम करणार. याजागी दुसरं कोणी असतं, तर हिंदुत्व, राष्ट्रवाद धोक्यात आला असता. शिवसेना, काँग्रेसचा कोणी असता तर भाजपने छाती बडवली असती. लोकांना मूर्ख बनवण्याचे काम कमी करा” असं संजय राऊत म्हणाले.