Sanjay Raut : ‘औरंगजेबाने मंदिरं तोडली, तसं तुम्ही लोकशाहीच मंदिर तोडलं’ – संजय राऊत
Sanjay Raut : "कुणाल कामरासोबतचे माझे फोटो दाखवले, हो आहेत, मी नाकारले का? त्या लोकांचे फोटो का नाही दाखवले? कुणाल कामरा अनेक वर्ष या क्षेत्रात आहे. कुणाल नवीन आला, त्यावेळी त्याने त्या काळातल्या काँग्रेस पक्षावर मनमोहन सिंग, सोनिया गांधी यांच्यावर सुद्धा अशाच प्रकारचे शो केले"

“मोठ्या दंगलीचे मास्टरमाइंड हे सरकारमध्ये असतात. सरकार कोणाच आहे?. तुम्ही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्यांच्या घरावर बुलडोझर चालवताय. पण दंगलीची ठिणगी टाकणारे तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. तुम्ही जर निष्पक्ष राज्यकर्ते असाल, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच नाव सांगत असाल, छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रजेला त्रास देणाऱ्या नातेवाईकांनाही सोडलं नाही” असं संजय राऊत म्हणाले. “तुमच्याच मंत्रिमडळातले लोक कायदा- सुव्यवस्थेला आव्हान देत आहेत. कायदा-सुव्यवस्थेला आव्हान म्हणजे गृहमंत्र्यांना आव्हान हे देवेंद्र फडणवीसांनी समजून घेतलं पाहिजे. नुसता विरोधकांवर चिखल उडवायचा. या छाछूगिरीला आय रिपीट छाछू गिरीला राज्य करणं म्हणत नाहीत” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
“आज सत्ता आहे तुमच्याकडे. बहुमत खूप चंचल असतं. कधी सरकेल इकडे-तिकडे, त्यावेळी तुम्हाला मग कळेल. आपण काय चुका केल्या होत्या” असं संजय राऊत बोलले. “कुणाल कामरासोबतचे माझे फोटो दाखवले, हो आहेत, मी नाकारले का? त्या लोकांचे फोटो का नाही दाखवले? कुणाल कामरा अनेक वर्ष या क्षेत्रात आहे. कुणाल नवीन आला, त्यावेळी त्याने त्या काळातल्या काँग्रेस पक्षावर मनमोहन सिंग, सोनिया गांधी यांच्यावर सुद्धा अशाच प्रकारचे शो केले” असं संजय राऊत म्हणाले.
‘औरंगजेबाने मंदिरं तोडली, तुम्ही लोकशाहीच मंदिर तोडलं’
“त्याच्या शो ना मी अनेकदा गेलो आहे. माझ्यावर टीका करतात, मी सगळं सहन करतो. काल अनधिकृत दाखवून एका तरुणाचा स्टुडिओ, व्यासपीठ तोडलं. इतक्या वर्षांनी टीका केल्यावर ते अनधिकृत असल्याच तुम्हाला साक्षात्कार झाला का? कुणाल कामरावर कायदेशीर कारवाई करु शकत होता. तरुण कलाकाराच व्यासपीठ तुम्ही तोडलं, याला औरंगजेबाची वृत्ती म्हणतात. औरंगजेबाने मंदिरं तोडली, तुम्ही लोकशाहीच मंदिर तोडलं. अनिधिकृत बांधकाम तोडायची असेल, मलबार हिलला बुलडोझर फिरवा. तिथे महापालिकेची परवानगी न घेता अनेक मंत्र्यांच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झालेली आहेत” असा आरोप राऊत यांनी केला.
‘हा देशद्रोह आहे का?’
“कायद्या सगळ्यांसाठी सारखा ठेवा. कामराने काही चुकीच केलेलं नाही. रिक्षावाल्याला रिक्षावाला म्हणणं, गद्दाराला गद्दार म्हणणं, चोराला चोर म्हणणं हा देशद्रोह आहे का?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.