Supriya Sule : ‘पैसा येतो-जातो शेवटी…’ सुनेत्रा पवारांच्या मोदी बागेतील भेटीवर सुप्रिया सुळे म्हणाल्या…

Supriya Sule : "केसच्या सुनावणीच्यावेळी मी सुप्रीम कोर्टात असते. काही जणांच्या मागे अदृश्य शक्ती आहेत. त्यांचे वकील आम्हाला भेटतात. आमच्याशी प्रेमाने बोलतात. आमच्याशी त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. दोन्ही बाजूंचे वकील आमचेच आहेत. क्लायंट कधी कोर्टात दिसत नाही. अदृश्य शक्ती यंत्रणा चालवते"

Supriya Sule : 'पैसा येतो-जातो शेवटी...' सुनेत्रा पवारांच्या मोदी बागेतील भेटीवर सुप्रिया सुळे म्हणाल्या...
supriya sule
Follow us
| Updated on: Jul 17, 2024 | 11:14 AM

“मायबाप जनतेने साथ दिली. आशिर्वाद दिला. काही विरोधकही पवार साहेबांकडे अपेक्षेने पाहतात. यात सगळया प्रश्नांची उत्तर आली” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. “पूजा खेडकर प्रकरणात रोज नवीन काहीतरी घडतय. सरकारने जबाबदारी घ्यावी. कुठलीही बातमी लीक होता कामा नये. व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे. चॅनलवर रोज काहीतरी नवीन दिसतय. सरकारसाठी हे फार चांगलं नाही असं मला वाटतं. सरकारने शांततेने, डीपमध्ये जाऊन चौकशी केली पाहिजे. रोज ब्रेकिंग न्यूज कशी होते? सरकार काय करतय?” असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला.

सुनेत्रा पवार काल मोदी बागेत आलेल्या, त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “मी काल सुप्रीम कोर्टात होते. आम्ही पाठपुरावा करतोय. सुप्रीम कोर्टाचे मी आभार मानते. आमचा युक्तीवाद त्यांनी ऐकून घेतला. आम्हाला ऑगस्टची तारीख दिलीय. उद्धव साहेब, पवार साहेबांकडून पक्ष, चिन्ह चुकीच्या पद्धतीने काढून घेतलं. त्या बद्दलची ही केस आहे. केसच्या सुनावणीच्यावेळी मी सुप्रीम कोर्टात असते. काही जणांच्या मागे अदृश्य शक्ती आहेत. त्यांचे वकील आम्हाला भेटतात. आमच्याशी प्रेमाने बोलतात. आमच्याशी त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. दोन्ही बाजूंचे वकील आमचेच आहेत. क्लायंट कधी कोर्टात दिसत नाही. अदृश्य शक्ती यंत्रणा चालवते” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पण सुनेत्रा पवार यांनी असं केलं नाही

पत्रकारांनी पुन्हा सुप्रिया सुळे यांना सुनेत्रा पवार यांच्या मोदी बागेतील भेटीबद्दल प्रश्न विचारला. तुम्ही मतदानाच्या दिवशी अजित पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या आईचा आशिर्वाद घेतला. पण सुनेत्रा पवार यांनी असं केलं नाही. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “त्या प्रश्नाच उत्तर मी देऊ शकत नाही. त्याच देऊ शकतात. माझ्यासाठी कौटुंबिक नाती महत्त्वाची आहेत. सत्ता, पैसा येतो-जातो शेवटी नाती महत्त्वाची असतात”

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.