MPSC News LIVE: परीक्षा 14 तारखेलाच घ्यावी- गोपीचंद पडळकर
MPSC News LIVE: लोकसेवा आयोगाच्या निर्णयाचा विरोध करत विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं आहे.
मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 14 मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलल्यानं विद्यार्थी संतप्त झाल्यानंतर आता या परीक्षा आठवडाभरात होतील अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. शुक्रवारी संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. परीक्षा पुढे ढकलल्यामुळे ठाकरे सरकारच्या या निर्णयाला राज्यभरातून विरोध झाला होता. संपूर्ण राज्यातून विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर वाढता विरोध लक्षात घेऊन ठाकरे यांनी फेसबूक वरुन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एमपीएससीचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर जाईल अशी घोषणा केली.
LIVE NEWS & UPDATES
-
सकाळपासून कोणाशीही बोललो नाही, राजकारणाचे आरोप मागे घ्यावेत- गोपीचंद पडळकर
मी सकाळपासून कोणाशीही बोललेलो नाही. माझा फोन चेक करावा. माझा फोन आधीच ट्रॅक होतोये. त्यांनी चेक करावं. मी कोणत्याही भाजप नेत्याशी बोललेलो नाही. या आंदोलनला राजकारणाचा, जातीचा, धर्माचा मुलामा देऊ नये. माझ्यासोबत सगळे मराठा समाजाचे विद्यार्थी आहेत. येथे जात-पात याला थार नाही. मी सगळ्यांना विनंती करतो की कोणीही या प्रश्नामध्ये जात-पात आणू नये.
-
माझा मुक्काम इथेच असेल, मी राजकारण करत नाही- गोपीचंद पडळकर
सरकारने पाच वेळा परीक्षा पुढे ढकलली. आमचा सरकारवर विश्वास होता. मात्र आता आम्ही रस्त्यावर उतरले आहोत. माझा आजचा मुक्काम इथेच असेल. पोलिसांनी दादागिरी करायची असेल तर त्यांनी करावी. महाराष्ट्राने विद्यार्थ्याकडे पाहून निर्णय घ्यावा. पुण्यात एका विद्यार्थ्याला हर्ट अटॅक आला. सरकारने निर्णय घ्यावा. मी राजकारण करत नाही.
-
-
14 तारखेलाच परीक्षा घ्यायला हवी. आम्ही इथेच झोपणार- गोपीचंद पडकळर
येथे वडापाव खाऊन विद्यार्थी दिवस काढत आहेत. वर्ष दोन तीव वर्षांपासून तयारी करत आहेत. मुलीपण परीक्षेची तयारी करत आहेत. त्यांचे ल्ग्न करायचे बाकी आहेत. मुख्यमंत्र्यांनी एमपीएससी परीक्षेची तारीख आजच जाहीर करावी. 14 तारखेलाच परीक्षा घ्यायला हवी. आम्ही इथेच झोपणार- गोपीचंद पडकळर,
-
परीक्षेला संपूर्ण शासकीय यंत्रणा लागते, त्यासाठी कर्मचाऱ्यांची तयारी करुन घ्यावी लागणार- उद्धव ठाकरे
उद्याची परीक्षा पुढे ढकलण्यामागे कोरोनाचा हाच कारण आहे. आपल्याला कल्पना असेल या परीक्षेला संपूर्ण शासकीय यंत्रणा लागते. त्यासाठी कर्मचाऱ्यांची तयारी करुन घ्यावी लागणार.
कोरोनाचा राक्षस पुन्हा डोकं वर काढतोय. त्यामुळे जे कर्मचारी परीक्षेसाठी काम करणार आहेत त्यांची टेस्ट केली जाणं महत्त्वाची आहे. ज्यांना लस दिली गेलीय तेच कर्मचारी यासाठी काम करतील, असा माझा आग्रहच नव्हे तर सूचना आहे. विद्यार्थी परीक्षेत आल्यानंतर कोणत्याही दडपणात राहू नयेत.
-
उद्याची परीक्षा पुढे ढकलण्यामागे कोरोनाचा हेच कारण- उद्धव ठाकरे
उद्याची परीक्षा पुढे ढकलण्यामागे कोरोनाचा हाच कारण आहे. आपल्याला कल्पना असेल या परीक्षेला संपूर्ण शासकीय यंत्रणा लागते. विद्यार्थ्यांची सोय पासून पेपर गोळा करुन गठ्ठे बांधने यासाठी काम लागते. त्यासाठी कर्मचाऱ्यांची तयारी करुन घ्यावी लागणार.
कोरोनाचा राक्षस पुन्हा डोकं वर काढतोय. त्यामुळे जे कर्मचारी परीक्षेसाठी काम करणार आहेत त्यांची टेस्ट केली जाणं महत्त्वाची आहे. ज्यांना लस दिली गेलीय तेच कर्मचारी यासाठी काम करतील, असा माझा आग्रहच नव्हे तर सूचना आहे. विद्यार्थी परीक्षेत आल्यानंतर कोणत्याही दडपणात राहू नयेत.
-
-
उगाच कोणी भडकवतोय म्हणून भडकून जाऊ नका- उद्धव ठाकरे
मी नेहमी रविवारी बोलतो. आज जे वातावरण तयार करण्याच्या प्रयत्न झाला त्यावर मी बोलणार आहे. त्यानंतर साहजिकच कोरोनार बोलणार आहे. गेल्यावर्षी दिवाळीआधी या परीक्षांची तारीख जाहीर झाली होती. नंतर आपण ती पुढे ढकलली. ती पुढे ढकलल्यानंतर सांगितलं होतं, या पुढे जी तारीख जाहीर होईल तेव्हा ती कोणत्याही कारणाने पुढे ढकलली जाणार नाही. तशी ती तारीख या 14 मार्चला जाहीर झाली. आता परत ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली.
विद्यार्थी अनेक दिवसांपासून परिश्रम करुन अभ्यास करत आहेत. ही परीक्षा केवळ काही दिवसांसाठी पुढे ढकलली आहे. मी स्वत: मुख्य सचिवांना आणि एमपीएससीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. परीक्षेची तारीख पुढच्या आठ दिवसातीलच असणार आहे.
उगाच कोणी भडकवतोय म्हणून भडकून जाऊ नका. आपला अभ्यास सुरु ठेवा. मी तुम्हाला वचन देतो की, येत्या आठवड्याभरात परीक्षा होईल.
-
मला कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या भावनांशी आणि आरोग्याशी खेळायचं नाही- उद्धव ठाकरे
परीक्षाचं एखादं केंद्र प्रतिबंधात्मक क्षेत्रात असेल तर आपला प्लान बी काय असेल, कुठे परीक्षा आपण ठेवू श शकतो याबाबत निर्णय घेणं जरुरीचं आहे. बंदिस्त खोलीत जास्त वेळ राहणं धोकादायक आहे. मला कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या भावनांशी आणि आरोग्याशी खेळायचं नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थी निरोगी असलं पाहिजे. या सर्व गोष्टींची खबरदारी घेऊन पुढच्या आठवड्यात परीक्षा होणार.
-
पुढच्या आठ दिवसात परिक्षा- उद्धव ठाकरे
मी सांगितलं होतं तारीख पुढे ढकलणार नाही
पुढच्या आठ दिवसात परिक्षा
काही जणांना संवाद आवडतो, काहींना नाही आवडत
आज जो काही वातावरण करण्याचा प्रयत्न झाला होता त्यावर स्पष्टीकरण देतो
आधी एमपीएससीबद्दल बोलतो नंतर कोरोनाबद्दल
मी सांगितलं होतं तारीख पुढे ढकलणार नाही
पण मग असं काय झालं की आता पुढे ढकलावी लागली
ही काही महिने दोन महिने तारीख पुढे ढकलत नाही
उद्या परिक्षेची तारीख जाहीर करण्याचे आदेश
पुढच्या आठ दिवसात परिक्षा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
कुणी भडकवतं आहे म्हणून भडकू नका
आठवड्याभरात परिक्षा घेऊ
जर आठ दिवसात घेणार असाल तर मग उद्याची पुढं का ढकलता
तर कारण कोविडच आहे
कारण ह्या सगळ्या गोष्टींसाठी सरकारी यंत्रणाच लागते
कोरोनाचा राक्षस पुन्हा डोकं वर काढतो आहे.
-
मी सांगितलं होतं की कोणत्याही परिस्थितीत ही परीक्षा पुढे ढकलली जाणार नाही- उद्धव ठाकरे
गेल्या वर्षी परीक्षांची तारीख जाहीर झाली होती. मी सांगितलं होतं की कोणत्याही परिस्थितीत ही परीक्षा पुढे ढकलली जाणार नाही. मग असं काय झालं की ही तारीख पुढे ढकलावी लागली. मी विद्यार्थांच्या भावनेची किंम
-
तर विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा दिला पाहिजे: देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा 14 मार्चला झाल्या पाहिजेत. सत्ताधारी पक्षाचे कार्यक्रम होत आहेत. कोरोना काळात त्यांच्या ट्रॅक्टर रॅली होत आहेत. आम्ही विद्यार्थ्यांसोबत आहे. मुख्यमंत्र्यांना ईमेल केला आहे. अधिकाऱ्यांनी न सांगता निर्णय घेतला असं जर ते म्हणत असतील तर विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा दिला पाहिजे.
-
परीक्षा पुढे ढकलल्यानं विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण: राजू शेट्टी
एमपीएससीच्या परीक्षा सातत्याने पुढे ढकलण्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होते आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा जरा विचार करा आणि परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय तत्काळ रद्द करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले आहे.
-
तरुणांच्या हिताचे मुद्दे घेऊन सत्तेत आलेल्या सरकार ला त्याचा विसर पडलाय, चित्रा वाघ यांची टीका
तरुणांच्या हिताचे मुद्दे घेऊन सत्तेत आलेल्या सरकार ला त्याचा विसर पडलाय, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.
राज्य सरकारने एकदा २ दा नव्हे तर तब्बल ५ वेळा #MPSC परीक्षेचा गोंधळ निर्माण केला आहे तरुणांच्या हिता चे मुद्दे घेऊन सत्तेत आलेल्या सरकार ला त्याचा विसर पडलाय हे आजच्या निर्णया वरून दिसून येतं राज्य सरकार ला विनंती आहे की तरुणांची आयुष्य उध्वस्त करू नका @CMOMaharashtra #MPSC
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 11, 2021
-
MPSC परिक्षा रद्द चा निर्णय चुकीचा, पंकजा मुंडे यांची राज्य सरकारवर टीका
MPSC परिक्षा रद्द चा निर्णय चुकीचा, पंकजा मुंडे यांची राज्य सरकारवर टीका
#MPSC परिक्षा रद्द चा निर्णय चुकीचा.
उमेदवारांमध्ये उद्रेक -ही वेळ येऊ द्यायला नको होती.
सरकारच्या भूमिका जनतेची काळजी दूर करणाऱ्या असाव्यात.
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) March 11, 2021
-
येवल्यात शॉर्टसर्किटमुळे आग, गॅस टाक्यांचा भीषण स्फोट
नाशिक – शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने घरातील दोन गॅस टाक्यांचा येवल्यात स्फोट
– येवल्यातील परदेशपूर भागातील घटना
– भीषण आगीत संपूर्ण संसार जाळून खाक
– जंगीर शेख आपल्या कुटुंबासह घराबाहेर असल्याने कुठलीही जीवितहानी नाही
– येवला नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश
-
सचिव स्तरावरुन अंधारात ठेऊन निर्णय घेतला, याबाबत चौकशी करण्यात येईल: विजय वडेट्टीवार
मला अंधारात ठेऊन घेतलेला निर्णय असल्याने याबाबत चौकशी करण्यात येईल, असं ट्विट विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
माझ्या विभागाने मला न विचारता सचिव स्तरावरून परस्पर घेतलेला निर्णय आहे. मला याबाबत काही ही माहिती नाही. मला अंधारात ठेऊन घेतलेला निर्णय असल्याने याबाबत चौकशी करण्यात येईल. @abpmajhatv @TV9Marathi @zee24taasnews pic.twitter.com/fdeaHtSxcG
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) March 11, 2021
-
MPSC विद्यार्थ्यांच्या परीक्षा 21 मार्चला होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती
MPSC विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढील 8 ते 10 दिवसांत होण्याची शक्यता असून 21 मार्चला परीक्षा होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी राज्य सरकार परीक्षा घेण्याच्या तयारीत, असल्याची सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एमपीएससी परीक्षांबाबत मोठ निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीनं गांभीर्यानं दखल घेतली आहे.
-
मुख्यमंत्री MPSC विद्यार्थ्यांच्या विषयी पण ते लवकरच हिताचा निर्णय घेतील : वरुण सरदेसाई
उद्धवसाहेब ठाकरे हे अतिशय संवेदनशील नेते आहेत. कोरोना काळात संपूर्ण राज्याला ज्या संवेदनशीलतेने साहेबांनी सांभाळले आहे त्याच प्रमाणे MPSC विद्यार्थ्यांच्या विषयी पण ते लवकरच हिताचा निर्णय घेतील. विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्यच असून त्यांच्या समस्येचे कोणी राजकीय भांडवल करू नये, असं ट्विट युवासेनेचे वरुण सरदेसाई यांनी केले.
CM उद्धवसाहेब ठाकरे हे अतिशय संवेदनशील नेते आहेत. Covid काळात संपूर्ण राज्याला ज्या संवेदनशीलतेने साहेबांनी सांभाळले आहे त्याच प्रमाणे MPSC विद्यार्थ्यांच्या विषयी पण ते लवकरच हिताचा निर्णय घेतील. विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्यच असून त्यांच्या समस्येचे कोणी राजकीय भांडवल करू नये
— Varun Sardesai (@SardesaiVarun) March 11, 2021
-
विद्यार्थ्यांचा असंतोष तीव्र आंदोलनाच्या रूपाने बाहेर पडला तर त्याची जबाबदारी कोण घेणार?: अमित ठाकरे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा दिनांक 14 मार्च रोजी होणार होती. या परीक्षेला केवळ तीन दिवस उरलेले असताना ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे प्रशासकीय सेवेत जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे भावविश्व उद्ध्वस्त झाले आहे. एमपीएससी परीक्षेसाठी वर्षानुवर्षे तयारी करणारे लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनी या निर्णयामुळे संतप्त झाले असून पुणे, संभाजीनगर तसंच राज्यात ठिकठिकाणी रस्त्यावर उतरत आहेत. उद्या या विद्यार्थ्यांचा असंतोष तीव्र आंदोलनाच्या रूपाने बाहेर पडला तर त्याची जबाबदारी कोण घेणार?
-
लोकसेवा आयोगाच्या परिक्षा पुढे ढकलल्याचा वंचितकडून जाहीर निषेध: अॅड. प्रकाश आंबेडकर
राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलल्या आहेत. याबाबत त्यांनी कोरोना वाढत असल्याचे कारण दिले आहे. राज्य शासन श्रीमंत मराठा याला बळी पडत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला.
राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलल्याने ओबीसी, एससी, एसटी या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. वंचित बहुजन आघाडी राज्य शासनाच्या या निर्णयाचा निषेध करीत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता तरी कणा दाखवला पाहिजे व परीक्षा घेतल्या पाहिजे असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
-
पुण्यातील आंदोलनात विद्यार्थ्याला भोवळ
परीक्षा लांबणीवर टाकल्यामुळं आंदोलन करणाऱ्या पुण्यातील आंदोलक विद्यार्थ्याला भोवळ आलेली असून त्याला रुग्णालयात नेण्यात येत आहे.
-
सांगली मळनी यंत्रामध्ये चिरडून महिला जागीच ठार, खानापूरच्या करंजे येथील घटना
सांगली : मळनी यंत्रामध्ये चिरडून महिला जागीच ठार
सुभद्रा विलास मदने असे महिलेचे नाव
साडीचा पदर अडकून मशीनमध्ये अडकून घडली घटना
सांगलीतील खानापूरच्या करंजे येथील दुर्दैवी घटना
-
अजब सरकार की गजब कहाणी, सुधीर मुनगंटीवार यांचे सरकारला खडे बोल
अतिशय दुटप्पी भूमिका घेणारं जगातील सर्वाधिक संभ्रमी सरकार आहे. विद्यार्थ्यांच्या मनात मेहनतीबाबत प्रश्नचिन्ह आहे. सरकार वयोमर्यादा वाढवण्याबाबत काही निर्णय घेत नाही. आरोग्य विभागाबाबत नोकरभरतीसाठी परीक्षा घेण्यात आली आहे. कोरोनाविषयी सावधानता पाळली पाहिजे. पोहरादेवीवर हजारो लोक एकत्र येतात तिथं नाममात्र एफआयआर दाखल केला. मंत्र्यांनी कोरोना काळात मोर्चा काढण्यात आला. परीक्षा देण्याच्या संधी मर्यादित करता, परीक्षा घेत नाही, घुमजाव करता. खुल्या प्रवर्गाला 6 संधी ठेवता. ओबीसीसाठी संधीची मर्यादा ठेवता. लोकसेवा आयोगाचे सदस्य नेमत नाही. सदस्य नेमण्याची फाईल आत्महत्या करेल. महाराष्ट्राच्या सरकारपुढं मोहन डेलकर हा एवढाच विषय आहे, असं टीकास्त्र सोडलं आहे.
-
विद्यार्थ्यांचं आंदोलन संवेदनशील पद्धतीनं हाताळा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्यात बैठक झाली. पुणे येथे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे त्याबाबत चर्चा झाली. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था या विषयावर चर्चा झाली. विद्यार्थ्यांचं आंदोलन संवेदनशील पद्धतीनं हाताळा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
-
मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांची एमपीएससी परीक्षांबाबत भेट घेऊन चर्चा करणार: बच्चू कडू
एमपीएससी मार्फत होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. या विरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांची मागणी ही रास्त आहे. मंत्री उदय सामंतजी सोबत या विषयावर माझे बोलणे झाले. लवकरच मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांची या विषयावर भेट घेऊन चर्चा करणार.
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) March 11, 2021
-
MPSC परीक्षा पुढे ढकलणे हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अन्यायकारक: चंद्रकांत पाटील
MPSC परीक्षा पुढे ढकलणे हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अन्यायकारक आहे. या सरकार मध्ये जरा देखील समन्वय आढळून येत नाही त्यामुळेच ही गोंधळाची परिस्थिती उद्भवली आहे. प्रत्येक विद्यार्थी या परीक्षेसाठी २ ते 3 वर्ष प्रयत्न करत असतो.त्याच्यामागे अनेक वर्षांची मेहनत आणि कष्ट असतात त्यामुळे विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरणे स्वाभाविक आहे. MPSC सरकारी नोकऱ्यांची वयोमर्यादा २ वर्ष वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा अशी मी मागणी करतो, असं भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले.
-
हिंगोलीमध्ये आदर्श कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांचं आंदोलन
एम पी एस सी परीक्षा रद्द केल्याच्या विरोधात विधर्थ्यांनी हिंगोलीमध्ये आंदोलन केले आहे. आदर्श कॉलेज परिसरात आंदोलन सुरू असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
-
नांदेडमध्ये एमपीएससी परीक्षा रद्द निर्णयाचा निषेध, विद्यार्थ्यांचा चक्काजाम
नांदेड: Mpsc चे शेकडो विद्यार्थी रस्त्यावर, परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचा निषेध करत रास्ता रोको, विद्यार्थ्यांच्या चक्काजाम मुळे वाहतूक विस्कळीत.
-
सरकारी नोकऱ्यांची वयोमर्यादा २ वर्ष वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा: चंद्रकांत पाटील
सरकारी नोकऱ्यांची वयोमर्यादा २ वर्ष वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा: चंद्रकांत पाटील
#MPSC सरकारी नोकऱ्यांची वयोमर्यादा २ वर्ष वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा अशी मी मागणी करतो. @officeofUT
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) March 11, 2021
-
आजचं एमपीएससी परीक्षेबाबत आजच निर्णय होणार: विजय वडेट्टीवार
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. आजचं एमपीएससी परीक्षेबाबत आजच निर्णय होणार, अशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. विरोधी पक्षनेते मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेऊन परीक्षा घ्या असं म्हणतात. विनायक मेटे एक भूमिका घेतात, गोपीचंद पडळकर एक भूमिका घेतात. याविषयावर राजकारण करु नये, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
-
MPSC ची परीक्षा झाली पाहिजे,काँग्रेस नेते नाना पटोले यांचं वक्तव्य
अनेक संकटांना मात करत विद्यार्थी हा परिक्षा करीता परिश्रम घेत असतो. जवळ आलेली #MPSC ची परीक्षा झाली पाहिजे कारण विद्यार्थांचा भविष्य हे परीक्षा वर अवलंबून असतो. कोरोना चे संपूर्ण नियमांचे पालन करत विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याकरीता परीक्षा झाली पाहिजे ही आमची रास्त मागणी आहे..
— Nana Patole (@NANA_PATOLE) March 11, 2021
-
एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी वाशिममध्ये आक्रमक, अकोला नांदेड मार्गावर रास्ता रोको
एमपीएससीची परीक्षा रद्द झाल्याने वाशिमचे विद्यार्थी आक्रमक झाले असून त्यांनी वाशिम शहरातील अकोला नाका चौकात रास्ता रोको केला आहे. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हा निर्णय रद्द करण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली. रास्ता रोकोमुळं अकोला – नांदेड या महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
-
एमपीएससी परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, यवतमाळमध्येही आंदोलन
यवतमाळ – एमपीएससी परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. यवतमाळच्या बसस्थानक चौकात विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. शासनानं परीक्षा घेण्याचा निर्णय घ्यावा ही मागणी करत आंदोलन सुरु आहे.
-
MPSC परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय तत्काळ रद्द करावा!: देवेंद्र फडणवीस
एमपीएससीच्या परीक्षा सातत्याने पुढे ढकलण्यामुळे वर्षानुवर्षे त्यासाठी तयारी करणार्या असंख्य विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होते आहे. त्यामुळे परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय तत्काळ रद्द करावा! #MPSC @CMOMaharashtra
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 11, 2021
-
एमपीएससीची परीक्षा रद्द केल्याच्या विरोधात अहमदनगरमध्ये विद्यार्थ्यांचा मोर्चा
एमपीएससीची परीक्षा रद्द केल्याच्या विरोधात एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा
मोर्चाला शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा पाठिंबा
बालिकाश्रम रोड येथून मोर्चा, सरकार विरोधात विद्यार्थी आक्रमक
दिल्ली गेट या ठिकाणी हा मोर्चा काढून सरकारचा निषेध,
-
MPSC परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचा जाहीर निषेध, काँग्रेस नेत्याचा सरकारला घरचा आहेर
MPSC परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचा जाहीर निषेध, काँग्रेस नेत्याचा सरकारला घरचा आहेर https://t.co/c18D0l58QW @satyajeettambe @CMOMaharashtra @OfficeofUT @Dev_Fadnavis #mpsc #mpscexam #StudentProtest #SatyajeetTambe
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 11, 2021
-
अधिवेशन आणि लग्न होतात मग MPSC परीक्षा का नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारला घरचा आहेर
अधिवेशन आणि लग्न होतात मग MPSC परीक्षा का नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारला घरचा आहेर https://t.co/hmHLJtjjXF #mpscexam #Congress #PrithvirajChavan #MahavikasAgahdigovt
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 11, 2021
-
Pune MPSC Student Protest | MPSC परीक्षा पुढे ढकलल्याने पुण्यात विद्यार्थ्यी आक्रमक
Pune MPSC Student Protest | MPSC परीक्षा पुढे ढकलल्याने पुण्यात विद्यार्थ्यी आक्रमकhttps://t.co/GFMN5BmCpI#Pune | #Maharashtra | #MPSC | #MPSCStudentlive
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 11, 2021
-
विद्यार्थ्यांच्या भावना समजून घ्या, विजय वडेट्टीवार यांचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आवाहन
राज्यात दिवसेंदिवस कोव्हिडचे रुग्ण वाढत असल्याने कोव्हिडची पार्श्वभूमी लक्ष्यात घेता राज्य सरकारने mpsc ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेताला आहे, या राज्याचा मंत्री जरी असलो तरी कष्टकरी, कामगार, मध्यमवर्गीय यांची मुले मोठ्या प्रमाणात परीक्षा देत असल्याने त्यांचे आईवडील घाम गाळून मुलांना अधिकारी होण्याचे स्वप्न बघत आहे, त्यामुळे मी स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याना विनंती करून यावर तोडगा काढून मार्ग काढावा, विद्यार्थ्यांच्या भावना समजून घ्या,असं आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
-
सांगलीत विद्यार्थ्यांकडून राज्य सरकारचा निषेध
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 14 मार्चला होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यात विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. या विधार्थना पाठिंबा देण्यासाठी सांगलीतही आंदोलन करण्यात आले.विध्यार्थी रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध केला.यावेळी मोठ्या प्रमाणात विध्यार्थी विधार्थिनीने सहभाग घेतला
-
जळगाव शहारतील कोर्ट चौकात केले रस्ता रोको
जळगाव – एमपीएससी ची राज्यसेवा परीक्षा शासनाने रद्द केल्याने विद्यार्थ्यांनी जळगावात रस्ता रोको
जळगाव शहारतील कोर्ट चौकात केले रस्ता रोको
250 ते 300 विद्यार्थ्यांनी केले रस्ता रोको
-
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एमपीएसीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडं लक्ष द्यावं : रोहित पवार
यापुढं कोरोनामुळं कोणतीही गोष्ट न थांबवता कोरोना प्रतिबंधक नियम पाळून आपल्याला पुढं जावं लागेल. त्यासाठी लोकही सहकार्य करतील असा विश्वास आहे. त्यानुसारच #MPSC ची परीक्षाही झाली पाहिजे. मुख्यमंत्री @OfficeofUT साहेब आणि @AjitPawarSpeaks दादा आपण याकडं लक्ष द्यावं, ही विनंती!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 11, 2021
-
परीक्षा पुढं लांबणीवर टाकल्या हा चुकीचा निर्णय: पंकजा मुंडे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत #MPSC रविवार दिनांक 14 मार्च, 2021 रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा-2020 ही अचानक पुढे ढकलण्यात आली आहे, हा चुकीचा निर्णय घेतला गेला आहे, त्यामुळे परीक्षार्थींचे नुकसान होणार असल्याने त्याला नापसंती व्यक्त करत आहे. pic.twitter.com/UWe4kDzdJJ
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) March 11, 2021
-
हे सरकार गोंधळलेलं सरकार : गोपीचंद पडळकर
यूपीएससी ते सीईटीच्या परीक्षा होतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी पुण्यात अभ्यास करतात. 14 तारखेला होणारी परीक्षा झाली पाहिजे. एमपीएससी परीक्षेमध्ये राजकारण करु नका, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. हे गोंधळलेले सरकार आहे, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.
-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं निर्णयावर तातडीनं फेरविचार करावा: सत्यजीत तांबे
सत्यजीत तांबेंचे सरकारला निर्णय मागं घेण्याचं आवाहन
काँग्रेसचे युवा नेते सत्यजीत तांबे यांनी देखील राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे. एमपीएससीची परीक्षा अचानकपणे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला त्याचा निषेध करतो, असं सत्यजीत तांबे यांनी म्हटलं आहे. अचनाकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे, असा सवाल तांबे यांनी केला. त्या निर्णयावर तातडीनं फेरविचार करा, असं आवाहन तांबे यांनी केलं आहे.
एमपीएससीची परीक्षा अचानकपणे पुढे ढकलण्याचा जो निर्णय आज झाला आहे, त्याचा मी जाहीर निषेध करतो. करोनाचे संकट कितीही मोठे असले तरीही अशा पध्दतीने अचानकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे ? ह्या निर्णयावर तातडीने फेरविचार झालाच पाहीजे.
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) March 11, 2021
-
राज्य शासनाचं नियोजन चुकलंय, प्रविण दरेकरांचा आरोप
राज्य शासनाचं नियोजन चुकलं आहे. सरकारनं नियोजन करायला पाहिजे. मुलांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रयत्न होतोय. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावं. विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा. महाराष्ट्र थांबला नाही, थांबनार नाही हे सांगून चालणार नाही त्यावर मार्ग काढा, असं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले.
-
कोल्हापूरमध्येही विद्यार्थ्यांचं आंदोलन
कोल्हापूरमधील सायबर चौकात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. राजकारण्यांच्या निवडणुका होतात, विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द का? कोरोनाचं कारण रद्द का? कोरोना लसीवर सरकारचा विश्वास आहे का? परीक्षा झाली पाहिजे, असं कोल्हापूरमधील विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे.
-
परीक्षा पुढे का पुढे ढकलल्या हे समजत नाही: संभाजीराजे
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आम्ही यापूर्वी मागणी केली होती. ती एमपीएससीच्या परीक्षा रद्द केलया पाहिजेत. कोरोणा ची महामारी त्यावेळी होती आणि तेही कारण होतं. पण माझं वैयक्तिक मत आहे ही एक कायमस्वरूपी लांबवले पाहिजे. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू यांचा आहे. तिथे सर्व जातीतल्या धर्मातल्या लोकांना राहण्याचा तेवढाच अधिकार आहे. या परीक्षा का पुढे ढकलण्यात त्याचं कारण समजत नाही. सरकारने कोरोनाची महामारी पुन्हा वाढू लागली आहे. म्हणून निर्णय घेतला असं कळत आहे. या अगोदर आरोग्याच्या परीक्षा झाल्या आणि आता एमपीएससीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे.
Published On - Mar 11,2021 9:06 PM