MPSC exam: ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; अखेर MPSC परीक्षा पुढे ढकलली

MPSC च्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय| MPSC Exam postpone

MPSC exam: ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; अखेर MPSC परीक्षा पुढे ढकलली
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
Follow us
| Updated on: Apr 09, 2021 | 4:16 PM

मुंबई: राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 11 एप्रिलला होऊ घातलेली राज्य लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा (MPSC Exam) पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर प्रमुख नेत्यांना पत्र लिहून तशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन अखेर मुख्यमंत्र्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती मान्य केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी दुय्यम गट ब परीक्षा पुढे ढकलल्याची घोषणा केली आहे.    तेव्हा राज्य सरकार MPSC परीक्षेची पुढची तारीख आत्ताच जाहीर करणार का, हे बघावे लागेल. (MPSC exam Scheduled On April 11 postpone)

काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. 11 एप्रिलची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरुन देण्यात आली आहे. परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असंही कळवलं आहे.

एमपीएससीची पूर्व परीक्षा 11 एप्रिलला होणार आहे. मात्र, वाढत्या कोरोना संसर्गामुळे ही परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. विशेष गोष्ट म्हणजे गेल्याच महिन्यात एमपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यात विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले होते. मात्र, आता विद्यार्थ्यांची भूमिका पूर्णपणे बदलली आहे.

कोरोनाचा वाढता धोका पाहता परीक्षेच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोव्हिड विषाणूची लागण होऊ शकते. तर अनेक विद्यार्थ्यांना यापूर्वीच कोरोना झाला आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यात या परीक्षेची तयारी करणाऱ्या वैभव शितोळे या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून आता संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती.

परीक्षा रद्द करण्याची मागणी कोणी केली होती?

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. एमपीएसी समन्वय समिती, महाराष्ट्र या संघटना आणि प्रातिनिधीक स्वरुपात सोलापूर, अहमदनगर,सातारा, हिंगोली यवतमाळ, मुंबई, पुणे, लातूर, नागपूर, कोल्हापूर यासह राज्यभरातील विविध शहरातील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसेप्रमुख राज ठाकरे यांना पत्र लिहून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन पुन्हा चर्चा

राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी MPSC परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. यासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. त्यावेळी दोघांमध्ये MPSC ची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात चर्चा झाली होती. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला होता.

संबंधित बातम्या:

MPSC परीक्षार्थींसाठी रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे महत्वाची मागणी, वाहतुकीसह वयोमर्यादेचा मुद्दा उपस्थित

पुण्यात 109 केंद्रावर MPSCपरीक्षेची तयारी, 4 हजार कर्मचाऱ्यांची RTPCR टेस्ट

(MPSC exam Scheduled On April 11 postpone)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.