MPSC Result 2019 | राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, सातारचा पठ्ठ्या अव्वल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2019 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. MPSC State Services Main Exam Result 2019

MPSC Result 2019 | राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, सातारचा पठ्ठ्या अव्वल
Follow us
| Updated on: Jun 19, 2020 | 7:57 PM

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2019 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. साताऱ्याचा प्रसाद चौघुलेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर उस्मानाबादचा रवींद्र शेळके मागासवर्गात प्रथम आला आहे. याशिवाय अमरावतीची पर्वणी पाटील महिलांमध्ये राज्यात प्रथम आली आहे. (MPSC State Services Main Exam Result 2019)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 13 ते 15 जुलै 2019 या दरम्यान 420 पदांसाठी राज्यसेवा मुख्य परीक्षा घेतली होती. जवळपास वर्षभराने आज या परीक्षेचा निकाल  जाहीर झाला. उमेदवारांच्या माहितीसाठी हा निकाल आणि प्रत्येक पवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण अर्थात कट ऑफ मार्क्स आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

निकाल जाहीर करताना MPSC ने काय म्हटलं?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 13 ते 15 जुलै 2019 रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 च्या एकूण 420 पदांचा अंतिम निकाल संबंधित उमेदवारांनी अर्जात केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पात्रता शासना स्तरावर मूळ प्रमाणपत्रांवरुन तपासण्याच्या अटीच्या अधिन राहून दिनांक 19 जून 2020 रोजी जाहीर करण्यात आला आहे.

या परीक्षेत सातारा जिल्ह्यातील प्रसाद बसवेश्वर चौगुले (बैठक क्रमांक PN 008356) हे राज्यातून सर्वसाधारण वर्गवारीमधून प्रथम आले आहेत. तर उस्मानाबाद या जिल्ह्यातील रविंद्र आपदेव शेळके (बैठक क्रमांक AU 002167) हे मागासवर्गवारीतून प्रथम आले आहेत. तसेच महिला वर्गवारीतून अमरावती जिल्ह्यातील पर्वणी रविंद्र पाटील (बैठक क्रमांक PN 007356) या राज्यात प्रथम आल्या आहेत.

उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल आणि प्रत्येक प्रवर्गाकरिता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (cut off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

राज्य सेवा (पूर्व) परीक्षा 17 फेब्रुवारी 2019 रोजी मुंबईसह अन्य 37 जिल्हा केंद्रांवर घेण्यात आली होती. पूर्व परीक्षेकरता 3 लाख 60 हजार 990 उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. या परीक्षेमधून राज्य सेवा (मुख्य) परीक्षेकरता 6 हजार 825 उमेदवार अर्हताप्राप्त ठरले होते. ही मुख्य परीक्षा 13 ते 15 जुलै 2019 दरम्यान मुंबई, औरंगाबाद, नागपूर आणि पुणे येथे घेण्यात आली होती. लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी 1 हजार 326 उमेदवार अर्हताप्राप्त ठरले.

प्रस्तुत परीक्षेचा निकाल आरक्षणाच्या आणि इतर मुद्द्यांच्या संदर्भात विविध न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे.

अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे, अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलमध्ये पाठवण्याच्या दिनांकापासून 10 दिवसात आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.

(MPSC State Services Main Exam Result 2019)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.