AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kirit Somaiya | कोण आहेत प्रवीण कलमे? किरीट सोमय्यांनी विचारलेल्या प्रश्नांमध्ये आज हे नाव चर्चेत

आजच्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्यांनी दोन व्यक्ती गायब असून त्यांना कुठे लपवून ठेवलंय, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना केलाय. पहिले म्हणजे नंदकिशोर चतुर्वेदी आणि दुसरे म्हणजे प्रवीण कलमे (Pravin Kalme).

Kirit Somaiya | कोण आहेत प्रवीण कलमे? किरीट सोमय्यांनी विचारलेल्या प्रश्नांमध्ये आज हे नाव चर्चेत
प्रवीण कलमे कुठे गायब आहेत? किरीट सोमय्यांचा सवाल Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 2:43 PM

मुंबई | आयएनएस विक्रांत घोटाळ्या प्रकरणी 58 कोटी रुपयांचे आरोप असलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज अनेक दिवसानंतर पत्रकार परिषद घेतली. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी दोन व्यक्ती गायब असून त्यांना कुठे लपवून ठेवलंय, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना केलाय. पहिले म्हणजे नंदकिशोर चतुर्वेदी आणि दुसरे म्हणजे प्रवीण कलमे (Pravin Kalme). मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या दादर येथील श्री जी कंपनीत 29 कोटींचा मनी लाँड्रिंगचा पैसा आला असून तो हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदीच्या मदतीने आल्याचा आरोप सोमय्यांनी केला. तपास यंत्रणा चतुर्वेदींच्या शोधात असून ते गायब असल्याचे दिसून येत आहेत, असे सोमय्या म्हणाले. तसेच प्रवीण कलमे यांनीही माझ्याविरोधात अनेक केसेस केल्या, मात्र आता तेदेखील गायब असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं.

प्रवीण कलमे भारतात की परदेशात पळाले?- सोमय्या

पत्रकार परिषदेत प्रवीण कलमे यांच्याविषयी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, ‘काही महिन्यांपूर्वी मी जितेंद्र आव्हाड यांचे वाझे यावर बोललो होतो. त्यानंतर प्रवीण कलमे यांनी माझ्याविरोधात अनेक तक्रारी केल्या. कोर्टात याचिका दाखल केली. कलमेंनी अनेक केसेस केल्या आणि आरोप केले. माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे. प्रवीण कलमे कुठे आहेत? आव्हाड त्याची माहिती देऊ शकतात का? की कलमे भारतात आहे की विदेशात आहे? प्रवीण कलमे यांच्याविरोधात एप्रिलमध्ये एफआयआर दाखल केला. ही सोमय्या यांनी केली नाही. तर एसआरएने दाखल केली आहे. कलमे सरकारी कार्यालयात येऊन फायली आणि कागदे चोरून नेत असल्याचा आरोप केला आहे. अजामीनपात्रं गुन्हा दाखल आहे. त्याच्याविरोधात का कारवाई होत नाही? त्यांना फरार का घोषित केलं जात नाही? त्याला कागद चोरताना पकडलं आहे. या गोष्टीला आज 15 दिवस झाले. कलमे विदेशात गेला? तो कसा गेला? त्यांना मदत कुणी जितेंद्र आव्हाड की अनिल परबांनी केली? आमच्या विरोधात आरोप करणारे आणि त्यांना पाठिंबा देणारे यावर उत्तर देणार का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला.

कोण आहेत प्रवीण कलमे?

  1.  प्रवीण कलमे हे मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते आहेत. अर्थ या सामाजिक संस्थेचे ते अध्यक्ष आहेत.
  2.  किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांनुसार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गृहनिर्माण विभाग, एसआरए तसेच म्हाडा या संस्थांमध्ये काम करणाऱ्या बिल्डरांकडून 100 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश प्रवीण कलमे यांना दिले आहेत.
  3. प्रवीण कलमे हे गृहनिर्माण विभाग, एसआरए तसेच म्हाडा या सरकारी संस्थांमधील सचिन वाझे आहेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी एप्रिल 2021 मध्ये केला होता.
  4. त्यानंतर प्रवीण कलमे आणि अर्थ या सामजिक संस्थेने किरीट सोमय्यांविरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता.
  5. त्यानंतर शिवडी न्यायालयानं 15 हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर केला होता.

इतर बातम्या-

Kirit Somaiya: मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्याच्या कंपनीत मनी लॉन्ड्रिंगचा पैसा, पैसा कसा आला?; सोमय्यांनी सांगितली मोडस ऑपरेंडी

Vastu Tips: ही झाडे लावल्यानंतर घरात पैसाच पैसा येईल, जाणून घ्या कोणती आहेत ती रोपं

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.