Uddhav Thackeray | महिनाभर दाऊद एके दाऊदच, सरकारनं काय केलं लक्षच नाही, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर पलटवार

उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीपासून (Maharashtra assembly) विरोधकांनी काय गोंधळ घातला आणि सभागृहाचं कामकाज कसं पार पाडू दिलं नाही, यावर भाष्य केलं. अगदी सुरुवातीला राज्यपालांनाही बोलू दिलं नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Uddhav Thackeray | महिनाभर दाऊद एके दाऊदच, सरकारनं काय केलं लक्षच नाही, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर पलटवार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विधानसभेत विरोधकांना प्रत्युत्तरImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 4:09 PM

मुंबईः विरोधी पक्षांचे केवळ सरकारवर आरोप करणं सुरु आहे. राज्य सरकारनं काय कामं केली, हे कुणी ऐकून घ्यायलाच तयार नाही, असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज विधानसभेत केला. काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजावर जोरदार टीका केली. सरकारला सर्व काही आलबेल सुरु आहे, असं वाटतंय. पण ठिकठिकाणी भ्रष्टाचार बोकाळल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. याला उत्तर देताना आज उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीपासून (Maharashtra assembly) विरोधकांनी काय गोंधळ घातला आणि सभागृहाचं कामकाज कसं पार पाडू दिलं नाही, यावर भाष्य केलं. अगदी सुरुवातीला राज्यपालांनाही बोलू दिलं नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे आज विधानसभेत बोलताना म्हणाले, ‘ मी बसून बोललो म्हणजे जोर गेला असा कोणी अर्थ काढू नये. उठा बश्यानी ताकद वाढतं. अंतिम आठवडा प्रस्ताव चर्चा. एका वाक्यात उत्तरं देता येणार नाही. पण इतरांचीही नोंद घेतो. काहींवर भाष्य करत असतो. मी तळमळीने आणि मनमोकळं बोलणार आहे. मला खोटं बोलता येत नाही. राज्यपालांच्या भाषणापासून सुरू केलं. राज्यपाल हे संवैधानिक पद आहे. आपण राज्यपाल महोदय काय बोलतात हे ऐकून घ्यायला हवं होतं. दाऊदचा उल्लेख केला. तो तेवढ्या पुरता नव्हता. तो उल्लेख रोजच करत आलात आहात. काल फडणवीस तुम्ही कविता सादर केली तेच ते तेच ते पण ते तुम्ही महिनाभर केलं. दाऊद एके दाऊद. राज्यपालांकडे काही तक्रार करत असतो तेव्हा राज्याचं सरकार काय करतं त्याचा आढावा राज्यपाल मांडत असतात. राज्यपाल राष्ट्रगीतालाही थांबू शकले नाही. त्यांना थांबू दिले नाही. एवढा घोर अपमान क्वचितच झाला असेल…असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.

जेवणात आंबट वरण, तोंडी लावायला पर्यावरण…

मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले, ‘ माझे शासन समाजसुधारकांच्या आदर्शाचं अनुकरण करते. त्यांचं भाषण ऐकूनच घेतलं नाही तर आदर्श कोण आणि समाजसुधारक कोण हे कसे कळले. महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनांचा शासन निषेध करते असं म्हटलं. ज्यांचं पलिकडे शासन आहे त्यांनी भाषण होऊ दिलं नाही. ऑक्सिजनची माहिती त्यांच्या भाषणात आहे. टँकर भरून गॅस कसे आणले त्याची माहिती होते. मुख्यमंत्री म्हणून अभिमान आहे. ही तीच यंत्रणा आहे. मुख्यमंत्री कोण वगैरे हा मुद्दा नाही. जेवणात आंबट वरण असतं तसं तोंडी लावायला पर्यावरण आहे. पण काम कोण करतं? पण आपलं सरकार काम करतं ? ते ऐकून घेतलं पाहिजे. स्कॉटलंडचा पुरस्कार आपल्या शासनाने जिंकला. महाराष्ट्रातील एकमेव राज्य आहे पुरस्कार जिंकणारं. असं राज्यपाल म्हणाले. राज्यपालांना अभिमान वाटतो.

आरसा बघितला तरी भ्रष्टाचार भ्रष्टाचार करतात…

सरकारच्या कामाचा दाखला देताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘ शिवभोजन सुरू केलं. दहा रुपयात जेवण देतो ही अभिमानाची गोष्ट आहे. हे मोठं काम आहे. आजपर्यंत 8 कोटी पेक्षा अधिक थाळ्यांचं वाटप केलं. हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. आपण त्यावर 500 कोटी तरतूद केली आहे. त्यावर लक्ष ठेवा नाही तर त्यातही भ्रष्टाचार दिसेल. काही झालं तरी भ्रष्टाचार भ्रष्टाचार… आरसा बघितला तरी भ्रष्टाचार भ्रष्टाचार करतात. पण आरश्याच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये भ्रष्टाचार होऊ शकतो ना. पण त्यासाठी चेहरा तर आरशात पाहिला पाहिजे.

इतर बातम्या-

CSK vs KKR, IPL 2022 Match Prediction: चेन्नई सुपर किंग्स वि कोलकातामध्ये कोण मारणार बाजी, रेकॉर्ड काय सांगतो?

विवेक अग्निहोत्री पुन्हा वादात, म्हणतात “भोपाळी” म्हणजे समलैंगिक, तर दिग्विजय सिंह म्हणतात हा संगतीचा परिणाम…

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.