आंबेडकरांच्या विचारांचा संदर्भ देत गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर भाष्य; म्हणाले, डंके की चोट पर सांगतो…
Gunratna Sadavarte on Babasaheb Ambedkar and Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील काय बॅरिस्टर आहे का?; गुणरत्न सदावर्ते भडकले. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा संदर्भ देत गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर भाष्य केलं. सदावर्ते नेमकं काय म्हणाले? पाहा...
गोविंद ठाकूर, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, मुंबई | 06 डिसेंबर 2023 : मराठा आरक्षणा संदर्भात दाखल करण्यात आलेल्या क्युरेटिव्ह प्रिटीशनवर आज सुनावणी होत आहे. या पार्श्वभूमीवर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी डॉ. बाबासाहेब आंबडकरांच्या विचारांचा संदर्भ देत आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. माझा संविधानावर विश्वास आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या विचारातून सांगितलं आहे की, खुल्या वर्गातील आलेले आहे की 50 टक्के जागा असतील. या गुणवंतांसाठी ब्राह्मण, वैश्य, जैन आणि बौद्ध यांच्यासाठी असतील. जर कोणी गुणवंत असतील. त्या सगळ्या गुणवंतांसाठी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराच्या कवच आहे, असं गुणरत्न सदावर्ते म्हणालेत.
“डंके की चोट पर सांगतो…”
माननीय सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च या देशाच्या जे पुस्तक आहे भारतीय संविधान… त्या संविधानाच्या पुस्तकानुसार बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला 50 टक्के कवच निश्चित संरक्षण होईल, यांच्या मला खात्री आहे. डंके की चोट पर मला विश्वास आहे की, 50% च्या वर आरक्षणाची टक्केवारी जाणार नाही, असा सदावर्ते यांनी म्हटलं आहे. आरक्षणाच्या नावाखाली गलिच्छ राजकारण करू नका. हीच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असेल, असं आवाहनही सदावर्ते यांनी केलं आहे.
शिंदे समितीवर सदावर्तेंचं भाष्य
न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती मराठा समाज कुणबी असण्याचे पुरावे शोधत आहे. त्यावरही सदावर्ते यांनी भाष्य केलं आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. त्या संविधानामध्ये स्पष्ट लिखित आहे की, मागास आयोगाचे कर्तव्य आणि जबाबदारी मला समजत नाही. कसा प्रकारे शिंदे समिती त्या सगळ्या बाबींना टेकओव्हर कशी करू शकते? समिती हा आयोग नाही आहे आणि त्यामुळे किंवा आज तरी संविधानिक संस्थांकडे कार्य करून द्या. शिंदे समिती हैदराबादमध्ये जे भ्रमण करत आहे. त्याच्यातून मला वाटतं की, मराठा आरक्षणासाठी काही लाभ होणार नाही, असं ते म्हणालेत.
मनोज जरांगेंवर टीकास्त्र
मनोज जरांगे कोण आहे? मनोज जरांगे पाटील हे काय बॅरिस्टर आहेत? मला हे समजत नाही. त्यांची भाषा तुम्ही बघा. हे अशा प्रकारच्या कोणी खपवून घेतला जाणार नाही. पाटील म्हणणार ते आरक्षणाला पात्र ठरत की नाही हे सुद्धा जरांगेने विचार घेतला पाहिजे. जरांगे यांच्या संविधानिक योगदान मी पाहिलेलं नाही. मला हे म्हणायचं आहे की, महाराष्ट्र शासन येणाऱ्या काळात जरांगे म्हणून कायदा करू शकत नाही. म्हणजे कुणबी आरक्षणाच्या कायदा हिवाळी अधिवेशनात करता येणार नाही. हिवाळी अधिवेशनात कायदा होऊ शकत नाही. जर कायदा झाला तर त्या कायद्याला कायदेशीर काय होतंय ते सुद्धा तुम्ही बघा, असंही सदावर्तेंनी म्हटलं.