PM मोदींच्या कामाचा धडाका, लोकसभा निवडणुकांपूर्वी राज्यातले 38 प्रकल्प झपाट्यानं पूर्ण करणार, वाचा 3 महत्त्वाचे प्रोजेक्ट!
महाराष्ट्रातील रेल्वे विभागातील 14, कोळसा विभागातील 5, पेट्रोलियम विभागातील 5, शहरी विकासाबाबतचा एक मेट्रोचा प्रकल्प, महामार्गांसंबंधी 13 प्रकल्प केंद्र सरकारच्या वतीने वेगाने पूर्ण केले जातील, असे उद्दिष्ट निर्धारीत करण्यात आले आहे.
मुंबईः आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Elections 2024) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी विविध राज्यांतील विकास कामे अग्रक्रमाने पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निर्धारीत केले आहे. यात राज्यातील 38 प्रकल्पांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पांचा खर्चही आता कित्येक पटींनी वाढला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या पूर्वीच हे प्रकल्प मार्गी लावण्याचे केंद्र सरकारतर्फे ठरवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील रेल्वे (Railway), रस्ते, शहरी पायाभूत सुविधांशी संबंधित या प्रकल्पांकडे पंतप्रधान आवर्जून लक्ष देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे 2024 मधील निवडणुकांपूर्वी हे प्रलंबित प्रकल्प मार्गी लागतील, अशी शक्यता आहे. यात पुढील प्रकल्पांचा समावेश आहे.
- मुंबई मेट्रो लाइन-3 (कुलाबा-वांद्रे- सिप्झ) या प्रकल्पाचा अंदाजे खर्च 23,136 कोटी रुपये एवढा होता. मात्र लॉकडाऊनमुळे मेट्रो लाइन 3 च्या प्रकल्प खर्चात वाढ झाली असून तो 33,406 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. कोरोना संकटामुळे आलेल्या अडचणींमुळे 23 मार्च 2020 ते 22 सप्टेंबर 2020 या काळातील कामांना मुदतवाढ दिली होती. या काळात स्थापत्य काम आणि मजुराच्या वेतनापोटी प्रशासनाच्या खर्चात 107 कोटी 91 लाख रुपयांनी वाढ झाली आहे. मुंबई मेट्रो 3 प्रकल्पातर्फे पूर्णत्वास जाणाऱ्या प्रकल्पाबद्दल मुंबईकरांना नुकत्याच शुभेच्छा दिल्या.
It’s time to enjoy again and make happy memories that will be cherished forever. Happy Dhulivandan.#HappyHoli2022
चला करू साजरा धुलीवंदनाचा सोहळा, जपू आपली परंपरा, रंगवू नव्या माळा धुलीवंदनाच्या शुभेच्छा pic.twitter.com/C8cDrr5ZnO
— MumbaiMetro3 (@MumbaiMetro3) March 18, 2022
- बेलापूर-सीवूड इलेक्ट्रिक डबल लाइन हा प्रकल्प येत्या 3 महिन्यात पूर्ण होण्याचा अंदाज आहे. 1996 मध्ये या प्रकल्पाचा अंदाजे खर्च 495 कोटी रुपये गृहित धरण्यात आला होता. आता मात्र या प्रकल्पाची किंमत 500 टक्क्यांनी वाढली आहे. हा खर्च अंदाजे 2, 980 कोटी रुपये एवढा असेल. यंदाच्या अर्थसंकल्पात बेलापूर-सीवूड- उरण मार्गासाठी 150 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एमयूटीपी 3 प्रकल्पातील हा प्रकल्प पूर्ण झाल्यास रेल्वे मुंबई ते उरण थेट सेवा देता येणार आहे.
- वडसा- गडचिरोली नवीन रेल्वे मार्ग या प्रकल्पासाठी 229 कोटी रुपये अंदाजे खर्च नियोजित करण्यात आला होता. यात आता 378% वाढ झाली असून 1096 कोटी रुपयांपर्यंत प्रकल्पाचा खर्च जाण्याची शक्यता आहे. गडचिरोली आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर जंगल असल्यामुळे तसेच येथील परिसरात वाघांचा अधिवास असल्यामुळे प्रकल्पाच्या कामांना विलंब होत आहे. फेब्रुवारी 2024 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे.
- यासह महाराष्ट्रातील रेल्वे विभागातील 14, कोळसा विभागातील 5, पेट्रोलियम विभागातील 5, शहरी विकासाबाबतचा एक मेट्रोचा प्रकल्प, महामार्गांसंबंधी 13 प्रकल्प केंद्र सरकारच्या वतीने वेगाने पूर्ण केले जातील, असे म्हटले जात आहे.
इतर बातम्या-