Raj Thackeray MNS Meet : राज ठाकरेंची मनसे नेत्यांसोबत मुंबईत बैठक, तीन तारखा, तीन ठिकाणं, मनसेचा मास्टरप्लॅन ठरतोय…
01 मे, 03 मे आणि 05 जून या तीन तारखांना मनसेच्या दृष्टीने महत्त्वाचे आयोजन कऱण्यात आले आहे. यासंबंधीच्या नियोजनाची बैठक आज शिवतीर्थावर पार पडली. यावेळी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक येथील मनसेचे नेते, अध्यक्ष, उपाध्यक्ष सरचिटणीस आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
मुंबईः हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतलेल्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आगामी रणनितीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच यासंदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक घेतली. मुंबईत झालेल्या या बैठकीत तीन महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी दिली. 01 मे, 03 मे आणि 05 जून या तीन तारखांना मनसेच्या दृष्टीने महत्त्वाचे आयोजन कऱण्यात आले असून त्याचे नियोजन करण्याबाबतची चर्चा आज शिवतीर्थावरील बैठकीत झाल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक येथील मनसेचे नेते, अध्यक्ष, उपाध्यक्ष सरचिटणीस आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
तीन तारखा, तीन ठिकाणं मनसेचा प्लॅन काय?
01 मे रोजी औरंगाबादेत सभा- पुण्यात राज ठाकरेंनी घोषणा केल्याप्रमाणे येत्या 01 मे रोजी औरंगाबादमध्ये मनसेच्या सभेचे आयोजन केले जात आहे. याकरिता औरंगाबाद मनसेसह महाराष्ट्रातील सर्व मनसे पदाधिकारी कामाला लागले आहेत, यासंबंधीच्या सूचनाही राज ठाकरे यांनी आज झालेल्या बैठकीत दिल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.
03 मे अक्षयतृतीयेचा मुहूर्त– येत्या 03 मे रोजी अक्षय्य तृतीयेचा दिवसदेखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी महत्त्वाचा आहे. तीन मे पर्यंत राज्यातील मशिदींवरचे सर्व भोंगे उतरवले पाहिजेत, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यावर गृहमंत्रालयातर्फे काय निर्णय घेतला जातात, याकडे सर्वांचं लक्ष आहे. सरकारच्या या निर्णयानंतरच मनसेची यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली जाईल, असं आजच्या बैठकीत ठरलं. दरम्यान, या दिवशी मुंबईत महाआरतीचं आयोजन करण्यात आल्यानं नांदगावकर यांनी सांगितलं. 03 तारखेच्या रणनितीबाबत राज्य तसेच केंद्र सरकारच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहिल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
05 जून रोजी अयोध्या दौरा– येत्या पाच जून रोजी राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याचीही घोषणा केली आहे. याकरिता अनेक मनसैनिकदेखील अयोध्येत दाखल होणार आहेत. मनसेच्या दृष्टीने हा दौराही महत्त्वपूर्ण असेल. याकरिताही नियोजन करण्याच्या सूचना आजच्या बैठकीत देण्यात आल्या आहेत. मनसेच्या पदाधिकारी अयोध्येत जाऊन या सभेकरिता रेकी करून आले असल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली.
औरंगाबाद मनसे जिल्हाध्य सुमित खांबेकर यांचे ट्वीट
#सरकारचे_12_वाजण्यास#आणि#राज_साहेबांच्या_संभाजीनगर_येथील_ऐतिहासिक_सभेस_फक्त_12_दिवस_बाकी. pic.twitter.com/cPHyyvt3uz
— Sumit Khambekar (@KhambekarSumit) April 19, 2022
इतर बातम्या-