समृद्धी महामार्गावरील अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
Samriddhi Highway Accident : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून समृद्धी महामार्गावरील अपघाताबाबत दु:ख व्यक्त; पाच लाखांची मदत जाहीर, पाहा...
मुंबई | 01 ऑगस्ट 2023 : समृद्धी महामार्गावरील शहापूर सरलांबे इथे काल मध्यरात्री भीषण अपघात झाला. समृद्धी महामार्गावर पुलाचं काम सुरू असताना ग्रेडर-मशिन कोसळल्याने अपघात झालाय. या अपघातात 16 कामगारांचा मृत्यू झाला. तर एका जखमी कामगाराला शहापूर उपजिल्हा रुग्णालयात तर दोघांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातामुळे अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
समृध्दी महामार्गावरच्या अपघाताबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट दु:ख व्यक्त केलं. तसंच मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत सरकारकडून देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ट्विट
शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघात हा अत्यंत दुर्दैवी आणि दुःखदायक आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत १७ जण मरण पावले आहेत. मृत कामगारांच्या कुटुंबिंयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणा केली असून जखमींवर तातडीने शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश दिले आहेत.
आज पंतप्रधानांच्या कार्यक्रमानिमित्त पुणे येथे असून अपघाताचे वृत्त समजताच जिल्हा प्रशासन तसेच संबंधित अधिकारी यांच्याशी बोलून दुर्घटनेची माहिती घेतली. हा अपघात अतिशय दुर्दैवी असून त्याची सखोल चौकशी करण्याच्याही सूचना दिल्या आहेत.
सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांच्याशी बोलून त्यांना तातडीने दुर्घटनास्थळी रवानाही केले. एनडीआरएफ चे पथक याठिकाणी पोहचले असून बचाव कार्य करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. पावसाळा असल्याने अधिक खबरदारी घेण्यास सांगितले आहे. समृध्दी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना हा अपघात घडला.
शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघात हा अत्यंत दुर्दैवी आणि दुःखदायक आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत १७ जण मरण पावले आहेत. मृत कामगारांच्या कुटुंबिंयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणा केली असून जखमींवर तातडीने शासकीय खर्चाने…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 1, 2023
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट करत या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट
शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना एक दुर्घटना होऊन काही मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
या घटनेत 3 कामगार जखमी झाले. त्यांच्यावर रूग्ण्यालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या घटनेची तज्ज्ञांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना एक दुर्घटना होऊन काही मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत 3 कामगार जखमी झाले.…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 1, 2023
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ट्विट करत अपघातावर दु्:ख व्यक्त केलं आहे.मृत्यू पावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो, असं अजित पवार म्हणालेत.
अजित पवार यांचं ट्विट
शहापूर तालुक्यातील सरलंबे येथे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्यातील काम सुरु असताना घडलेल्या दुर्घटनेत मजुरांचा झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. पुलाचं काम सुरू असताना गर्डर मशिन आणि क्रेन खाली कोसळल्यानं हा अपघात झाला. बचावकार्य युद्धपातळीवर राबवलं जात आहे. जखमींवर उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी ही प्रार्थना. मृत्यू पावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो.
शहापूर तालुक्यातील सरलंबे येथे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्यातील काम सुरु असताना घडलेल्या दुर्घटनेत मजुरांचा झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. पुलाचं काम सुरू असताना गर्डर मशिन आणि क्रेन खाली कोसळल्यानं हा अपघात झाला. बचावकार्य युद्धपातळीवर राबवलं जात आहे.…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) August 1, 2023