खारघर प्रकरणावरुन संजय राऊत आक्रमक, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली मोठी मागणी, रोख कुणावर?
खारघर प्रकरणी आत्तापर्यन्त चौदा जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून त्यावरून संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल करत मोठी मागणी केली आहे.
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस विरोधात असते तर काय केलं असतं हे सांगत संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. खारघर प्रकरणात मृत्यूचे आकडे लपविले जात आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दबाव टाकला असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. यामध्ये आत्तापर्यन्त 14 जणांचा मृत्यू झाला असला तरी हा आकडा 20 पर्यन्त जाण्याची भीती व्यक्त केली जात असल्याचे संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. संजय राऊत यांनी खारघर प्रकरणात उष्माघात हे कारण नसून सरकारने केलेले ढिसाळ नियोजन आहे. सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
खारघर येथे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने दिला जाणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये लाखो श्री सदस्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये उष्माघातामुळे आत्तापर्यन्त चौदा जणांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र शासन आणि श्री सदस्यांच्या समितीच्या माध्यमातून ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये कडक्याच्या उन्हात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला असून विरोधकांनी यावरून हल्लाबोल केला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील श्री सदस्य त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. सायंकाळच्या वेळेला खारघर येथील कार्यक्रमात उष्माघाताने मृत्यू झाल्याचे समोर आले होते. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी करत मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर करत इतरांवर मोफत उपचार केले जाईल अशी घोषणा केली होती.
तर त्यानंतर रात्री उशिरा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही रुग्णालयात जाऊन उपचार घेणाऱ्या श्री सदस्यांची भेट घेतली होती. त्यानंतर विरोधकांनी थेट अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत टीका केली होती. नंतर राज ठाकरे यांनी दुसऱ्या दिवशी भेट दिली होती.
राज ठाकरे म्हणाले हा कार्यक्रम दुपारी घेण्याऐवजी संध्याकाळी घेता आला असता. कडक्याच्या उन्हात हा कार्यक्रम झाल्याने आत्तापर्यन्त चौदा जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये आकडे लपविण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केली आहे.
यावरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा देवेंद्र फडणवीस यांनी मागायला हवा. सांस्कृतिक मंत्री यांचाही राजीनामा घ्या म्हणत सरकारवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस विरोधात असते तर त्यांनी हीच मागणी केली असती असेही राऊत यांनी म्हंटलं आहे.