शरद पवार आणि अजित पवार हे भाजपात येणार नाही, पण जर आलेच तर… सुधीर मुनगंटीवार मोठं वक्तव्य
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलत असतांना एक भुवया उंचावणारे वक्तव्य केले आहे. त्यामध्ये अजित पवार यांच्यासह जयंत पाटील यांचंही नाव घेतलं आहे.
विजापूर, कर्नाटक : खरंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामध्ये अजित पवार यांच्या भाजपच्या चर्चा असो नाहीतर अजित पवार चाळीस आमदारांना घेऊन सरकार स्थापन करणार असो. अशा विविध चर्चेने राजकीय वातावरण तापलेले आहे. त्याचे कारण म्हणजे कोणत्याही क्षणी राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र होतात का? याशिवाय राज्यातील सरकारचे काय होईल अशी स्थिती सध्या राजकीय वर्तुळात चर्चेची ठरत आहे. त्यामध्ये भाजप सोबत राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकार स्थापन करेल इथपर्यंत चर्चा सुरू होती. त्याच पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठीशी बोलत असतांना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठं वक्तव्य केले आहे.
खरंतर अजित पवार यांची चर्चा सुरू असतांना सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार यांचेही नाव बोलतांना घेतले आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणाले अजित पवार आणि शरद पवार हे भाजपमध्ये येणार नाहीत. पण जर आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू असे म्हंटले आहे.
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचवणार आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्याने हे वक्तव्य केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजप मध्ये देखील उलट सुलट चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.
मात्र, मागे अजित पवार हे चाळीस आमदारांना घेऊन भाजप सोबत जाणार. सत्ता स्थापन करणार अशी चर्चा सुरू असतांना अजित पवार यांनी मी मरेपर्यन्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातच राहणार असल्याचे म्हंटले होते. त्यामुळे अजित पवार यांच्याकडून चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न झाला होता.
सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा स्वागत करू असं म्हणत असतांना अजित पवार यांच्या सोबत शरद पवार यांचेही नाव घेऊन नवी चर्चा घडवून आणली आहे. त्यामध्ये अजित पवार यांच्याबरोबरच जयंत पाटील यांच्याही चर्चा सुरू होणार आहे. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या व्यक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
खरंतर राज्यातील पुढील काही दिवसांत मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये अजित पवार यांचा सहभाग राहील की नाही याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू असतांना सुधीर मुनगंटीवार यांनी स्वागत करू म्हणत नवी चर्चा सुरू करून दिली आहे.
त्यामुळे आगामी काळात शरद पवार आणि अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या किंवा भाजप सोबत सत्तेत जाण्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्यास त्याला सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली प्रतिक्रिया निमित्त ठरणार आहे.