AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे, फडणवीस, ठाकरे नव्हे तर ‘हा’ लोकप्रिय नेता पुढचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून जनतेचा कल

Who is Next CM of Maharashtra : देशात यंदा पंचवार्षिक लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीच्या बाजूने कल पाहायला मिळाला. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकही होणार आहे. यात कोण जिंकणार? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत लोकांनी मत व्यक्त केलं आहे.

शिंदे, फडणवीस, ठाकरे नव्हे तर 'हा' लोकप्रिय नेता पुढचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून जनतेचा कल
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस,Image Credit source: Facebook
| Updated on: Jul 16, 2024 | 5:56 PM
Share

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशातील महायुतीच्या बाजूने कल दिला. पुन्हा एकदा एनडीए सरकार सत्तेत आलं. पण महाराष्ट्रात मात्र वेगळं चित्र पाहायला मिळालं. महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने कल दिला. महाविकास आघाडीचे 30 उमेदवार निवडून आले. तर महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळवला आला. तर सांगलीला अपक्ष विशाल पाटलांचा विजय झाला. या निकालाचा आगामी विधानसभा निवडणुकीवर परिणाम होणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीचं चित्र काय असेल? यंदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदी महाराष्ट्रातील जनतेला कुणाला पाहायला आवडेल? याबाबत एक सर्व्हे करण्यात आला. यात भाजपच्या बड्या नेत्याला लोकांनी पसंती दिली आहे.

कुणाच्या नावाला पसंती?

राज्याचं मुख्यमंत्री कोण व्हावं? याबाबत एक सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेमध्ये लोकांनी भाजपच्या बड्या नेत्याच्या नावाला पसंती दिली आहे. सध्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा भाजपच्या या नेत्याला लोकांनी पसंती दिली आहे. हे नाव म्हणजे देशाचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाला पसंती देण्यात आली आहे. सकाळ समुहाने एक सर्व्हे केला यात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण व्हावं असं वाटतं? असा प्रश्न विचारण्यात आला. याचं उत्तर देताना लोकांनी सर्वाधिक पसंती ही नितीन गडकरी यांच्या नावाला दिली आहे.

महायुतीत कुणाला किती टक्के पसंती?

भाजपच्या कोणत्या नेत्याला मुख्यमंत्रिपदी बसलेलं पाहायला आवडेल असं विचारलं गेलं तेव्हा 18.8 टक्के लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली. तर 47.7 टक्के लोकांनी नितीन गडकरींच्या नावाला पसंती दिली आहे. विनोद तावडे यांना 6.3 टक्के, पंकजा मुंडेंना 5 टक्के तर सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाला 2.8 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर 14.5 टक्के लोकांनी एकनाथ शिंदेंना तर 5.3 टक्के लोकांनी अजित पवार यांच्या नावाला पसंती दिलीय.

महाविकास आघाडीबाबत असाच प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा 22.4 टक्के लोकांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाला पसंती दिली. 6.8 टक्के लोकांनी सुप्रिया सुळे, तर 4.7 टक्के लोकांनी नाना पटोले यांच्या नावाला पसंती दिली.

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.