रत्नागिरी दिवा पॅसेंजरमधून पडून मुंबई पोलीस कर्मचारी गंभीर जखमी; सुकीवली गावाजवळ घडली घटना

रत्नागिरी दिवा पॅसेंजरला प्रचंड गर्दी होती. त्यामुळे ते दरवाजावर थांबून रेल्वेतून जात होते. ते रेल्वेच्या दरवाजावर थांबले असतानाच रेल्वे सुरु झाली, त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी त्यांना व्यवस्थित उभाही राहता आले नसल्याने हात सुटून ते चालत्या रेल्वेतून खाली पडले. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत.

रत्नागिरी दिवा पॅसेंजरमधून पडून मुंबई पोलीस कर्मचारी गंभीर जखमी; सुकीवली गावाजवळ घडली घटना
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 8:59 PM

रत्नागिरीः मे महिन्याचा सध्या शेवटचा आठवडा सुरु आहे, त्यामुळे कोकणात मुंबईवरुन आलेले चाकरमनी आता सुट्ट्या संपल्याने ते पुन्हा मुंबईकडे परतू लागले आहेत. सध्या कोकणातील चाकरमान्यांचा मुंबईकडे परतीचा प्रवास सुरु झाला असल्याने आता बस, रेल्वेत प्रचंड गर्दी दिसत आहे. रेल्वेतील गर्दीमुळेच मुंबईकडे परतणारा पोलीस कर्मचारी (Mumbai Police) रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाल्याची घटना सुकीवली गावानजीक रत्नागिरी दिवा पॅसेंजर (Ratnagiri Diva Passenger) जात असताना घडली. मुंबई पोलिसात असणाऱ्या या कर्मचाऱ्याचे नाव उमेश पांडुरंग भोसले असून ते गंभीर जखमी (Injured) झाले असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले आहे.

मुंबई पोलिसात असलेले उमेश पांडुरंग भोसले हे दापोलीतील टेटवलीमध्ये मे महिन्याची सुट्टी घालवण्यासाठी आले होते. काही दिवसांची सुट्टी घालवून ते पुन्हा मुंबईकडे कामावर रुजू होण्यासाठी जात होते.

परतीच्या प्रवासात अपघात

आज रविवार असल्याने रत्नागिरी दिवा पॅसेंजरला प्रचंड गर्दी होती. त्यामुळे ते दरवाजावर थांबून रेल्वेतून जात होते. ते रेल्वेच्या दरवाजावर थांबले असतानाच रेल्वे सुरु झाली, त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी त्यांना व्यवस्थित उभाही राहता आले नसल्याने हात सुटून ते चालत्या रेल्वेतून खाली पडले. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत.

पुढील उपचारासाठी मुंबईला

सुकावली गावाजवळ ते रेल्वेतून पडल्यानंतर त्या ठिकाणी रुग्णवाहिका मागवून घेण्यात आली, मात्र ते धावत्या रेल्वेतून पडून जखमी झाल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात मार लागला आहे. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले आहे.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.