शनिवारपर्यंत राज्यावर असणार अस्मानी संकट, हवामान खात्याचा इशारा
शुक्रवारी सकाळी अनेक जिल्ह्यांमध्ये पावासाने विश्रांती घेतली असली तर आजही हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई : बंगालच्या उपसागराच कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे गेल्या दोन दिवसांत अनेक राज्यांसह महाराष्ट्रालाही मुसळधार पावसाने झोडपून काढलं. अनेक ठिकाणी घरांत, रुग्णालयांत पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं. शुक्रवारी सकाळी अनेक जिल्ह्यांमध्ये पावासाने विश्रांती घेतली असली तर आजही हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (mumbai pune rain update maharashtra weather report 16th october)
भारतीय हवामान विभागा (IMD) ने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात तायर होत असलेला कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्राच्या दिशेने पुढे सरकरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पढच्या 48 तासांत याची तिव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. हवामानाच्या या बदलांचा परिणाम पुढचे दोन दिवस असणार आहे. यामुळे महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर, कोकण आणि दक्षिण गुजरातमध्ये मुसळधार पावसाची (Heavy Rains) शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकण आणि गोव्यासह महाराष्ट्राच्या अनेक घाटमाथा असलेल्या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस असेल तर काही ठिकाणी मुसळधार धारा कोसळण्याची शक्यता आहे. यावेळी मोठ्या वेगाने वारे वाहतील असाही अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
Extremely heavy falls (>20cm per day) is also likely over south Konkan and adjoining Ghat areas of Maharashtra. 16th October 2020: Light to moderate rainfall at most places with heavy rainfall at isolated places over Konkan & Goa, south Gujarat region and Saurashtra & Kutch.
— India Met. Dept. (@Indiametdept) October 15, 2020
(mumbai pune rain update maharashtra weather report 16th october)
दक्षिण कोकणामध्ये असेल रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही रेड अलर्ट जारी केलेला आहे. या दोन दिवसांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यावेळी वाऱ्याचा वेग 30 ते 40 किलोमीटर असेल. उत्तर कोकणामध्ये, ठाणे, मुंबई, पालघर या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
17 ऑक्टोबरपर्यंत राज्यात कोसळधारा हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, 13 ऑक्टोबरपासून ते 17 ऑक्टोबरपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यात किनारपट्टीलगच्या सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या चक्रीवादळ विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणात मुसळधार ते अतिमुसळधार (heavy to very heavy falls) पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कर्नाटक, रायलसीमा, दक्षिण कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दुर्गम भागांतही जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर, उत्तर आंध्र प्रदेश, दक्षिण ओडिशा आणि विदर्भातील दुर्गम भागातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मच्छिमारांना अलर्ट जारी पुढील 24 तासात ते दिनांक 17 ऑक्टोबर 2020 रोजीपर्यंत किनारपट्टीवर 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी दिली असल्याने मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये.
इतर बातम्या –
सावधान! मेंदूत जळजळ झाल्यास गंभीर; कोरोनाचं समोर आलं धक्कादायक लक्षणं
‘हे काय आहे?’; नोरा फतेहीने इन्स्टाग्रामवर ठेवला असा DP की चाहते गडबडले
(mumbai pune rain update maharashtra weather report 16th october)