पुण्यात उष्णतेचा पारा 40 पार, मुंबईत उकाडा वाढणार की कमी होणार ?
उन्हाळा आता तोंडावर आला असून हळूहळू उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या आहेत. उन्हाच्या तडाख्यामुळे सामान्य नागरिकही त्रस्त झाले आहेत. त्यातच आता एरवी कूल असलेल्या पुण्यातही उन्हाचा कडाका वाढला असून सूर्यदेव तापल्याचे दिसत आहे.

उन्हाळा आता तोंडावर आला असून हळूहळू उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या आहेत. उन्हाच्या तडाख्यामुळे सामान्य नागरिकही त्रस्त झाले आहेत. त्यातच आता एरवी कूल असलेल्या पुण्यातही उन्हाचा कडाका वाढला असून सूर्यदेव तापल्याचे दिसत आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील उष्णतेचा पारा चाळीशीपार पोहोचला आहे. यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमान पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर मध्ये आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजगुरुनमध्ये 40°c तापमानाची नोंद आहे तर शहरातील कोरेगाव पार्क परिसरात देखील 40°c तापमान आहे.
मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात शहरासह जिल्ह्यातील कमाल तापमानाने 41 अंशापर्यंत पोहोचणार असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. त्यामुळे वाढत्या उन्हापासून वाचण्यासाठी पुणकेरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मुंबईतील तापमानात चढ – उतार
मुंबईमधील किमान तापमानात वाढ झाली असली तरी गेल्या एक – दोन दिवसांपासून कमाल तापमान स्थिर आहे. दरम्यान, मुंबईत पुढील काही दिवस उष्ण व दमट वातावरणाचा अंदाज कायम आहे. या कालावधीत तापमानात वाढ होण्याची शक्यता नसली तरी उष्ण व दमट वातावरणामुळे बैचेन होईल. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी ३३ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३४.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
सध्या मुंबईत सकाळी सात- साडेसात वाजल्यापासून अगदी सायंकाळपर्यंत अंगाची लाही लाही होत आहे. या उकाड्यापासून सुटका होणे दूरच, उलट तो कायम राहण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे पुढील काही दिवस मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका होण्याची शक्यता नाही. दरम्यान, मागील काही दिवसांत तापमानात वाढ झालेली आहे. यामुळे मुंबई, ठाणे, पालघर परिसरात तीव्र उकाडा जाणवत आहे. वाढत्या आर्द्रतेमुळे त्यात भर पडत आहे.