अजितदादा पवार मुख्यमंत्री होणार!; संजय राऊतांनी तारीख सांगितली…

Sanjay Raut on Ajit Pawar and Maharashtra CM : अजितदादा मुख्यमंत्री होणार, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शिवाय अजित पवार मुख्यमंत्री कधी होणार, याची तारीखही संजय राऊत यांनी सांगितली आहे. हे विधान करत असतानाच राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.

अजितदादा पवार मुख्यमंत्री होणार!; संजय राऊतांनी तारीख सांगितली...
Follow us
| Updated on: Nov 30, 2023 | 1:22 PM

गणेश थोरात, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, मुंबई | 30 नोव्हेंबर 2023 : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की, आपल्या नेत्याने मुख्यमंत्री व्हावं. आम्हाला देखील वाटतं की, अजितदादा पवार यांनी राज्याचं मुख्यमंत्री व्हावं, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसंच अजित पवार कधी मुख्यमंत्री होतील, याची तारीखही संजय राऊत यांनी केली आहे.

“या दिवशी अजित पवार मुख्यमंत्री होणार”

येत्या 31 डिसेंबरपर्यंत आमदार अपात्रता प्रकरणी निर्णय घेण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिल्या आहेत. त्याचाच धागा धरत हा निकाल आल्यानंतर शिंदे सरकार जाणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे 31 डिसेंबरनंतर मुख्यमंत्रिपद रिकामं होणार आहे. त्या जागेवर अजित पवार बसले तर आम्हाला देखील आनंद होईल, असं संजय राऊत म्हणालेत.

“…तर तो आनंद दिघेंचाही अपमान!”

ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांच्या अटकेचा संजय राऊत यांनी निषेध केला. ही सुडाच्या भावनेतून कारवाई केली जात असल्याचा दावा राऊतांनी केला आहे. महाराष्ट्र राज्यात दोन कायदे आहेत. गद्दारांसाठी वेगळा कायदा असेल तर तसं जाहीर करा. राज्यपालांना आम्ही विचारतो आहोत. ज्या शब्दामुळे अटक झाली तो शब्द चित्रपटात आहे. दिघे साहेबांच्या तोंडी तो शब्द सेन्सॉरनं कापला का? दळवींना अटक करून तुम्ही आनंद दिघे यांचाही अपमान करत आहात, असं म्हणत राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली आहे.

पोलिसांवर दबाव असल्यानं जामीन प्रक्रियेत उशीर होतोय. हरकत नाही शिवसैनिक तुरुंगात जाऊन मोडत नाहीत. तुका म्हणे ऐशा नरा, मोजुनी माराव्या पैजारा, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. त्यापुढे जात मी म्हणतो की, हजार माराव्यात आणि एक मोजावं! आज तुकोबा असते तर त्यांना देखील यांनी देहू पोलीस कोठडीत पाठवलं असतं, असं म्हणत राऊतांनी टीकास्त्र डागलं आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.