Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Unlock Update : मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट साडे पाच टक्क्याच्या खाली, तरीही मुंबई लेव्हल 3 मध्येच! कारण काय?

चालू आठवड्यात मुंबईतील पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांच्या खाली आला आहे. असं असलं तरी मुंबई लेव्हल 3 मध्येच असेल आणि त्यानुसारच मुंबईत नियमावली लागू असेल, असं महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलंय.

Mumbai Unlock Update : मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट साडे पाच टक्क्याच्या खाली, तरीही मुंबई लेव्हल 3 मध्येच! कारण काय?
mumbai municiple corporation
Follow us
| Updated on: Jun 11, 2021 | 10:48 PM

मुंबई : पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजन बेडच्या निकषांप्रमाणे 14 जूनपासून राज्यांतील जिल्ह्यांमध्ये स्थानिक आपत्ती प्रशासन प्राधिकरणे, जिल्हा प्रशासन निर्बंधांचे स्तर( लेव्हल्स) ठरवतील असं मदत व पुनर्वसन विभागाकडून सांगण्यात आलं आहे. त्यानुसार चालू आठवड्यात मुंबईतील पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांच्या खाली आला आहे. असं असलं तरी मुंबई लेव्हल 3 मध्येच असेल आणि त्यानुसारच मुंबईत नियमावली लागू असेल, असं महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलंय. (Corona Positivity rate in Mumbai is below 5 percent, Level 3 restrictions will remain in place)

पॉझिटिव्हिटी रेट स्थित असेल तर नियम बदलण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. असं असताना मुंबईतील पॉझिटिव्हिटी रेट घसरल्यानंतरही मुंबईत सध्या तरी लेव्हल 3 चेच निकष लागू असणार आहेत. असा निर्णय मुंबई महापालिकेलनं घेतला आहे. मुंबईच्या सध्याचा पॉझिटिव्हिटी रेट 4.40 टक्क्यांवर आला आहे. तर ऑक्सिजन बेड व्यापीचा दर 27.12 टक्के आहेत. आकडेवारीनुसार मुंबई लेव्हल 2 मध्ये गेली असली तर मुंबईत लेव्हल 3 चेच, म्हणजे सध्या लागू असलेलेच निर्बंध कामय असणार आहेत. यासाठी महापालिकेनं काही कारणंही दिली आहेत.

मुंबई महापालिकेनं दिलेली कारणे –

>> मुंबईतील लोकसंख्या घनतेचे प्रमाण जास्त

>> लोकलमधील गर्दी, एमएमआर परिसरातून मोठ्या संख्येनं मुंबईत येणारे प्रवासी

>> हवामान विभागानं मुंबईला दिलेला अतिवृष्टीचा इशारा

राज्यातील कोरोनाची सध्यस्थिती

महाराष्ट्र शासनाने 4 जून रोजी जारी केलेल्या आदेशाद्वारे राज्याच्या विविध जिल्ह्यांतील भिन्न प्रशासकीय क्षेत्रांमध्ये संबंधित क्षेत्रातील कोव्हिड-19 पॉझिटीव्हीटीचा वेग आणि वापरात असलेल्या ऑक्सिजन सुविधायुक्त खाटा यांच्या आधारे लागू करण्यात येणाऱ्या बंधनांच्या स्तरांविषयी निर्देश दिले आहेत. सदर आदेशातील अनुच्छेद चार मध्ये राज्यस्तरीय ऑक्सिजन यंत्रणाची व्याख्या दिली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 10 जून 2021 रोजी संपूर्ण राज्यात रुग्णांद्वारे वापरात असलेल्या ऑक्सिजनयुक्त खाटांची एकूण संख्या 20,697 इतकी असून ही संख्या घट दर्शवणारी आहे. ही संख्या 35,000 पेक्षा कमी असल्याने राज्यस्तरीय ऑक्सिजन यंत्रणा पुढील आठवड्यात कार्यरत राहणार नाही.

या जिल्ह्यांमध्ये अनलॉकची शक्यता

अहमदनगर, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नंदूरबार, नांदेड, परभणी, वर्धा, वाशिम, यवतमाळ, सिंधुदुर्ग

पहिल्या लेवलमधील जिल्हे

अहमदनगर- पॉझिटिव्हिटी रेट 2.63 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण- 12.77 टक्के

चंद्रपूर – पॉझिटिव्हिटी रेट 0.87 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण-4.95 टक्के

धुळे- पॉझिटिव्हिटी रेट 1.64 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण-2.15 टक्के

गोंदिया- पॉझिटिव्हिटी रेट 0.83 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण-1.87 टक्के

जळगाव- पॉझिटिव्हिटी रेट 1.82 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण – 13.98 टक्के

जालना- पॉझिटिव्हिटी रेट 1.44 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण-5.29 टक्के

लातूर- पॉझिटिव्हिटी रेट 2.43 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण-8.66 टक्के

नागपूर – 3.13 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण-3.93 टक्के

नांदेड- 1.19 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण- 2.5 टक्के

यवतमाळ- 2.91 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण-9.01 टक्के

दुसऱ्या लेवल मधून पहिल्या लेवलमध्ये

नंदुरबार- 2.06 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण-6.19 टक्के

हिंगोली- पॉझिटिव्हिटी रेट 1.20 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण-6.77 टक्के

तिसऱ्या लेवल मधून पहिल्या लेवलमध्ये

अमरावती- पॉझिटिव्हिटी रेट 4.36 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण- 16.57 टक्के

भंडारा पॉझिटिव्हिटी रेट 1.22 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण- 1.60 टक्के

वाशिम- 2.25 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण-9.01 टक्के

वर्धा- 2.5 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण-1.57 टक्के

परभणी- 2.30 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण-12.5 टक्के

सोलापूर- 3.43 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण-14.66 टक्के

चौथ्या लेवलमधून पहिल्या लेवलमध्ये येण्याची शक्यता

बुलढाणा पॉझिटिव्हिटी रेट 2.37 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण-9.03

संबंधित बातम्या : 

कोरोना रुग्ण आणि मृत्यू संख्येबाबत कोणतीही आकडेवारी लपवली जात नाही; आरोग्य विभागाची माहिती

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील आठवड्यापासून अनलॉकची शक्यता, तुमच्या जिल्ह्याचा समावेश आहे का?

Corona Positivity rate in Mumbai is below 5 percent, Level 3 restrictions will remain in place

देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा.
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट.
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं.
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका.
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला.
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया.
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला.
खोक्याच्या बायकोने धसांना फसवलं जात असल्याचा केला दावा
खोक्याच्या बायकोने धसांना फसवलं जात असल्याचा केला दावा.