धनगर समाजासाठी अनुसूचित जमातीच्या ‘या’ 13 योजना लागू

मुंबई : राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या 13 योजना लागू करण्यात आल्या आहेत. धनगर समाजाच्या शैक्षणिक आणि सामजिक उन्नतीसाठी महिन्याभराच्या आत शासन निर्णय जाहीर करण्याचे आदेश मागास प्रवर्ग कल्याण मंत्री डॉ. संजय कुटे यांनी विभागाला दिले होते. या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 1 हजार कोटी एवढा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार […]

धनगर समाजासाठी अनुसूचित जमातीच्या 'या' 13 योजना लागू
Follow us
| Updated on: Sep 07, 2019 | 12:08 AM

मुंबई : राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या 13 योजना लागू करण्यात आल्या आहेत. धनगर समाजाच्या शैक्षणिक आणि सामजिक उन्नतीसाठी महिन्याभराच्या आत शासन निर्णय जाहीर करण्याचे आदेश मागास प्रवर्ग कल्याण मंत्री डॉ. संजय कुटे यांनी विभागाला दिले होते.

या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 1 हजार कोटी एवढा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यापैकी 500 कोटी रुपये निधीची या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. या योजनांमध्ये धनगर समाजातील बांधवांना घर बांधणे, युवक-युवतींसाठी स्पर्धा परीक्षेसाठी शुल्कात आर्थिक सवलत लागू करणे, सैन्यात भरतीसाठी पूर्व प्रशिक्षण देणे, स्पर्धा परीक्षांसाठी निवासी प्रशिक्षण देणे, गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना वसतिगृह निर्माण करणे, धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित निवासी शाळेत शिक्षण देणे इत्यादी बाबींचा समावेश आहे.

धनगर समाजासाठी लागू केलेल्या 13 योजना

1. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील भूमीहिन मेंढपाळ कुटुंबांसाठी अर्धबंदिस्त, बंदिस्त, मेंढीपालनासाठी जागा उपलब्ध करुन देणे किंवा जागा खरेदीसाठी अनुदान तत्वावर अर्थसहाय्य देणे.

2. वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या भटक्या जमाती-क या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या स्वयंम योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र योजना कार्यान्वित करणे.

3. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश देणे.

4. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना पहिल्या टप्प्यात 10,000 घरकुले बांधून देणे.

5. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील आवश्यक असलेल्या परंतु अर्थसंकल्पित निधी उपलब्ध नसलेल्या योजना/कार्यक्रम राबवण्यासाठी न्युक्लिअस बजेट योजना.

6. राज्यातील भटक्या जमाती-क या प्रवर्गातील व्यक्ती सदस्य असलेल्या सहकारी सूत गिरण्यांना भागभांडवल मंजूर करणे.

7. केंद्र शासनाच्या ‘स्टँड अप इंडिया’ योजनेत भटक्या जमाती-क या प्रवर्गातील नवउद्योजकांना सहाय्य करण्यासाठी ‘मार्जिन मनी’ उपलब्ध करुन देणे. 8. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील मेंढपाळ कुटुंबांना पावसाळ्यात चराईकरिता जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांसाठी चराई अनुदान देणे. (प्रायोगिक तत्वावर)

9. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील होतकरु बेरोजगार पदवीधर युवक-युवतींना स्पर्धा परिक्षेसाठी परीक्षापूर्व निवासी प्रशिक्षण.

10. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील बेरोजगार युवक-युवतींना स्पर्धा परिक्षेसाठी परिक्षा शुल्कात आर्थिक सवलती लागू करणे.

11. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील बेरोजगार युवक युवतींना लष्करातील सैनिक भरती व राज्यातील पोलीस भरतीसाठी आवश्यक ते मूलभूत प्रशिक्षण देणे.

12. ग्रामीण परिसरातील कुक्कुटपालन संकल्पनेंतर्गत भटक्या जमाती (क) या प्रवर्गातील जमातीसाठी 75 टक्के अनुदानावर 4 आठवडे वयाच्या सुधारित देशी (सीएआरआय- मान्यता प्राप्त) प्रजातीच्या 100 कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी आणि संगोपनासाठी अर्थसहाय्य.

13. नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर आणि अमरावती या महसूली विभागांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी भटक्या जमाती-क प्रवर्गातील मेट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करणे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.