Ganesh Festival : गणपती विसर्जन दरम्यान राज्यात 21 जणांचा मृत्यू, नेमक्या कुठं घडल्या घटना?

केवळ विसर्जन दरम्यान बुडूनच नव्हे तर इतर कारणांमुळेही गणेश भक्तांना जीव गमवावा लागला आहे. नागपुरातील शक्करदरा परिसरात झालेल्या रस्ते अपघातामध्ये चौघांना जीव गमवावा लागला. ठाण्यातील कोलबाड परिसरात पावसामुळे गणेश मंडपावरच झाड कोसळले यामध्ये 55 वर्ष व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.

Ganesh Festival : गणपती विसर्जन दरम्यान राज्यात 21 जणांचा मृत्यू, नेमक्या कुठं घडल्या घटना?
गणेश विसर्जन Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 10, 2022 | 7:58 PM

मुंबई : यंदाचा (Ganesh Festival) गणेशोत्सव निर्बंधमुक्त झाला असला तरी, गणेश भक्तांनीच स्वत:हून काही निर्बंध लादून घ्यावेत असाच काय तो उत्सवाचा शेवट झाला. त्याला कारणही तसेच आहे. राज्यात (Ganesh Visarjan) गणेश विसर्जन दरम्यान तब्बल (21 Death) 21 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटना वेगवेगळ्या कारणाने घडल्या असल्या तरी विसर्जन दरम्यान गणेश भक्तांनी काळजी घेणेही तेवढेच गरजेचे आहे. या घटनांबाबत पोलिस प्रशासनाने माहिती दिली असून 21 पैकी 15 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. विदर्भात अधिक घटना घडल्याचे समोर आले आहे. वर्धा जिल्ह्यातील सांगवी ह्या एकाच गावातील तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे.

अशा आहेत राज्यभरातील घटना

गणेश विसर्जन दरम्यान गणेश भक्तांचा उत्साह हा शिगेला पोहचला होता. असे असले तरी राज्यात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात होता. त्यामुळे शहरी भागात नाही पण ग्रामीण भागातच अधिकच्या दुर्घटना घडल्या आहेत. यामध्ये वर्धा जिल्ह्यातील सांगवी येथे तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर याच जिल्ह्यातील देवळीत एकाला जलसमाधी मिळाली आहे. यवतमाळ जिल्ह्यांमध्ये दोघेजण,नगर जिल्ह्यात दोघांचा तर जळगाव जिल्ह्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे.

ग्रामीण भागात अधिकच्या घटना

शहरी भागात उत्साह अधिकचा असला तरी नियमांचे पालन केले जाते. शिवाय मूर्ती विसर्जन ठिकाणी पोलिस बंदोबस्तही तैनात केलेला असतो. ग्रामीण भागात मात्र, गणेश भक्तांकडून नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. तर शहराप्रमाणे पोलिस बंदोबस्तही नसतो. त्यामुळे ग्रामीण भागात गर्दी कमी असूनही अशा दुर्घटना ह्या घडतातच.

रस्ते अपघातामध्ये चौघांचा मृत्यू

केवळ विसर्जन दरम्यान बुडूनच नव्हे तर इतर कारणांमुळेही गणेश भक्तांना जीव गमवावा लागला आहे. नागपुरातील शक्करदरा परिसरात झालेल्या रस्ते अपघातामध्ये चौघांना जीव गमवावा लागला. ठाण्यातील कोलबाड परिसरात पावसामुळे गणेश मंडपावरच झाड कोसळले यामध्ये 55 वर्ष व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. हे कमी म्हणून की काय, रायगड येथील पनवेल येथे विजेच्या धक्क्याने 9 वर्षाच्या मुलीसह इतर 11 जण हे जखमी झाले होते.

कायद्याचेही उल्लंघन

गणेश विसर्जनाच्या मिरवणूक वेळी काही ठिकाणी कायद्याचेही उल्लंघन झाले. यामध्ये मुंबईतील प्रभादेवी परिसरात शिंदे गट आणि शिवसेनेचे पदाधिकारी आमने-सामने आले होते. अहमदनगरमध्येही या दोन गटातीलच पदाधिकारी भिडले होते. जळगावमध्ये महापौर यांच्या बंगल्यावर काही जणांनी तुफान दगडफेक केली होती.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.