मुंबई: मालेगावात काँग्रेसला (congress) मोठं खिंडार पडलं आहे. मालेगावातील काँग्रेसच्या 28 नगरसेवकांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. राष्ट्रवादी (ncp) बदनाम होणार नाही, पक्षाला गालबोट लागणार नाही आणि जनतेच्या मनात चुकीची भावना निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्या, अशा सूचना अजित पवार यांनी या सर्व नगरसेवकांना दिल्या आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र सत्तेत असले तरी या तिन्ही पक्षात पक्षवाढीसाठी एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहेत. आज काँग्रेसच्या 28 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर काँग्रेस त्यावर काय उत्तर देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
काँग्रेसचे माजी आमदार आणि माजी महापौर आसिफ शेख यांच्या नेतृत्वात आज काँग्रेसच्या 28 नगरसेवकांनी राष्ट्रवादीच प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी या नगरसेवकांना मार्गदर्शनही केलं. तुम्ही आजपासून राष्ट्रवादीचे सैनिक झाले आहात. त्यामुळे जोमाने काम करा. राष्ट्रवादीची बदनामी होईल, पक्षाला गालबोट लागेल आणि पक्षाची प्रतिमा मलिन होईल असं कृत्य करू नका. राष्ट्रवादीचे सैनिक म्हणून तुम्ही जोमाने काम करा, असं सांगतानाच आजपासून तुमची जबाबदारी राष्ट्रवादीची आहे. पक्षात तुमचा सन्मान होईल. तसेच तुम्हाला काम करण्याची पूर्ण मोकळीक असेल. आगीतून निघालो आणि फुफाट्यात पडलो अशी तुमची भावना होणार नाही, याची आम्ही खबरदारी घेऊ, असं पवार म्हणाले.
आसिफ शेख यांच्या नेतृत्वात आम्ही मालेगावात रॅली आयोजित करतो. आम्ही मालेगाव परिसर राष्ट्रवादीमय करतो आणि राष्ट्रवादीत प्रवेश करतो, असा नगरसेवकांचा आग्रह होता. पण कोरोना असल्याने आम्ही हा कार्यक्रम न घेण्याचा निर्णय घेतला. कारण कोरोनाची नियमावली आम्हीच करत असल्याने आम्ही ते करणं योग्य नव्हतं. शेवटी आज हा कार्यक्रम घेतला. माजी आमदार, माजी महापौर आसिफ शेख यांच्याशी माझा 1999 मध्ये संबंध आला. ते मालेगावचा प्रश्न पोटतिडकीने मांडायचे. वय जरी झालं असलं तरी त्यांची बांधिलकी कमी झाली नाही, असं अजित पवार म्हणाले.
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 27 January 2022https://t.co/6bM40Wyct1#NewsUpdates | #BreakingNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 27, 2022
संबंधित बातम्या:
शिवसेना भाजप युतीवर मंत्री अब्दुल सत्तार पुन्हा बोलले, नितीन गडकरीच हा पूल बांधू शकतील कारण…