Eknath Shinde : मनमाड करंजवण पाणीपुरवठ्यासाठी 317 कोटी, 272 कोटींची आनंद दिघे योजना मंजूर, मुख्यमंत्र्यांची माहिती

आनंद दिघे यांना ते आपले गुरू मानतात. त्यांच्या नावानं त्यांनी पाणीपुरवठा योजना मंजूर केली. शिवाय बाळासाहेब ठाकरे मनमाड करंजवण पाणीपुरवठ्यासाठी 317 कोटी मंजूर केलेत. त्यामुळं स्थानिक कार्यकर्ते खुश आहेत.

Eknath Shinde : मनमाड करंजवण पाणीपुरवठ्यासाठी 317 कोटी, 272 कोटींची आनंद दिघे योजना मंजूर, मुख्यमंत्र्यांची माहिती
272 कोटींची आनंद दिघे योजना मंजूर, मुख्यमंत्र्यांची माहिती
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 7:10 PM

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे मनमाड करंजवण पाणीपुरवठ्यासाठी (Water Supply) 317 कोटी मंजूर केलेत. तसंच 78 खेड्यांची 272 कोटींची आनंद दिघे (Anand Dighe) पाणीपुरवठा योजना मंजूर केलीय. कागदपत्रांत अडकत न बसता थेट अंमलबजावणी होणार आहे. यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलंय. शिंदे म्हणाले, सुहास कांदे डॅशिंग आमदार आहेत. मनमाड, नांदगावच्या रस्त्यांना पैसा कमी पडू देणार नाही. आम्ही घेतलेली भूमिका योग्य आहे. म्हणून तुम्ही इथे आले आहात. मनमाडला पाणीपुरवठा योजना लागू होईल. सुहास कांदे हुशार आहे. मनमाडच्या चौकात मुख्यमंत्री म्हणून आलो. दुसरं कोण आलं असतं का असा टोला शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लगावला.

मुख्यमंत्री अॅक्शन मोडवर

मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे हे अॅक्शन मोडवर आहेत. आमदारांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या मार्गा लावत आहेत. आनंद दिघे यांना ते आपले गुरू मानतात. त्यांच्या नावानं त्यांनी पाणीपुरवठा योजना मंजूर केली. शिवाय बाळासाहेब ठाकरे मनमाड करंजवण पाणीपुरवठ्यासाठी 317 कोटी मंजूर केलेत. त्यामुळं स्थानिक कार्यकर्ते खुश आहेत.

रस्त्यांची परिस्थिती सुधारणार

मालेगाव दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री आपल्या दारी या उपक्रमांतर्गत नाशिक विभागीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतील विविध प्रश्नांबाबत आढावा घेत हे प्रश्न वेगाने मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीत सदर जिल्ह्यांतील दळणवळण सुयोग्य राहण्यासाठी रस्त्यांची परिस्थिती सुधारण्याला प्राधान्य देण्यास निर्देशित करण्यात आले. रस्ते हे कोणत्याही यंत्रणेच्या अखत्यारीत असले तरीही ते तातडीने बुजवले जावेत, असे संबंधित यंत्रणांना निर्देश दिले.

हे सुद्धा वाचा

जीव गेले त्यांच्या कुटुंबीयांना मदत करा

उत्तर महाराष्ट्रातील मलनिस्सारण तसेच पाणीपुरवठा योजनांबाबत प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत. पश्चिम वाहिनी नद्यांचे अतिरिक्त पाणी गिरणा खोऱ्यात वळवण्याबाबतचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश संबंधित प्रशासनास देण्यात आले. या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्यात येत आहेत. मदतीचे प्रस्ताव सादर करावा. ज्यांचे जीव गेले त्यांना तातडीने मदत वितरित करावी, असेही प्रशासनास आदेश दिले.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.