Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Police medals : महाराष्ट्रातील 42 जवानांना शौर्य पुरस्कार, स्वातंत्र्य दिनापूर्वी 1 हजार 82 पोलीस पदकांनी सन्मानित

शौर्य पुरस्कार प्राप्त करणार्‍यांमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 109, जम्मू आणि काश्मीर पोलीस दलाच्या 108, महाराष्ट्र पोलीस दलाच्या 42, छत्तीसगड पोलीस दलाच्या 15 जवानांचा समावेश आहे.

Police medals : महाराष्ट्रातील 42 जवानांना शौर्य पुरस्कार, स्वातंत्र्य दिनापूर्वी 1 हजार 82 पोलीस पदकांनी सन्मानित
प्रातिनिधीक फोटोImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 3:50 PM

मुंबई : स्वातंत्र्य दिनापूर्वी 1 हजार 82 पोलिसांना शौर्य पदकानं सन्मानित करण्यात आलंय. त्यापैकी महाराष्ट्रातील 42 पोलिसांना शौर्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. शौर्यासाठी 347 पोलिसांना पदकं प्रदान करण्यात आले. विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस (President’s Police) पदकं 87 प्रदान करण्यात आले. सराहनीय सेवेसाठी 638 पोलीस पदकं प्रदान करण्यात आले. 347 शौर्य पुरस्कारांपैकी बहुतांश 204 कर्मचारी जम्मू काश्मीर (Jammu and Kashmir) क्षेत्रातील आहेत. 80 कर्मचाऱ्यांना दहशतवादी (Terrorists) प्रभावित क्षेत्रातील शौर्यासाठी मेडल देण्यात आले. स्वतंत्रता दिवस 2022 ला 55 कर्मचाऱ्यांना अग्निशमन सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं. त्यापैकी 11 कर्मचाऱ्यांना शौर्यासाठी अग्निशमन सेवा पदकं देण्यात आलं. 46 कर्मचाऱ्यांना होमगार्ड आणि नागरिक सुरक्षा पदकानं सन्मानित करण्यात आलं.

जम्मू-काश्मिरातील जवानांना जास्त पदकं

347 शौर्य पुरस्कारांपैकी 204 जवानांना जम्मू आणि काश्मीरमधील त्यांच्या शौर्याबद्दल, 80 जवानांना नक्षलप्रभावित भागात आणि 14 जवानांना ईशान्य भारतातील त्यांच्या शौर्याबद्दल सन्मानित केले जाणार आहे. शौर्य पुरस्कार प्राप्त करणार्‍यांमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 109, जम्मू आणि काश्मीर पोलीस दलाच्या 108, सीमा सुरक्षा दलाच्या 19, महाराष्ट्र पोलीस दलाच्या 42, छत्तीसगड पोलीस दलाच्या 15 जवानांचा समावेश आहे. उर्वरित पोलीस जवान इतर राज्ये/ केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे आहेत.

राज्यातील कोणत्या जवानांना पुरस्कार

महाराष्ट्रातील पोलीस जवानांमध्ये माहूरदार परांजने, राजरत्न खैरनार, राजू कांडो, अविनाश कुमरे, संदीप भांड, मोतीराम माडवी, दामोदर चिंतुरी, राजकुमार भालावी, सागर मूल्लेवार, शंकर माडवी, रमेश असम, महेश सयम, साईकृपा मिरकुटे, रत्नाय्या गोरगुंडा, मनीष कलवानिया, भाऊसाहेब ढोले, संदीप मंडलिक, दयानंद महादेश्वर, जीवन उसेंडी, राजेंद्र माडवी, विलास पाडा, मनोज इसकापे, समीर शेख, मनोज गजमवार, अशोक माजी, देवेंद्र पखमोडे, हर्षल जाधव, स्वर्गीय जगदेव मांडवी, सेवाक्रम माडवी, सुभाष गोमले, रोहित गोमले, योगीराज जाधव, धनाजी होनमाने, दसरू कुरसामी, दीपक विडपी, सुरज गंजीवार, दिवंगत किशोर अत्राम, गजानन अत्राम, योगेश्वर सदमेक, अंकुश खंडाळे यांचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.