जागतिक स्तरावरून राज्यातील गुंतवणूक वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न; दाओस बैठकीतील चर्चा ‘या’ मंत्र्यांनी सांगितली

राजकीय पक्षाची जबाबदारी असते. शिंदे गटाकडे आता बहुमत असल्यामुळेच खऱ्या शिवसेनेचे दावेदार आम्ही असून शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह हे आमचे असल्याचा विश्वासही शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.

जागतिक स्तरावरून राज्यातील गुंतवणूक वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न; दाओस बैठकीतील चर्चा 'या' मंत्र्यांनी सांगितली
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 11:04 PM

मुंबईः महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस अनेकार्थाने महत्वाचा ठरला आहे. एकीकडे ठाकरे-शिंदे गटाच्या धनुष्यबाणाबद्दलचा वादावर आज सुनावणी देण्यात आली. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दाओस दौऱ्यामध्ये 45 हजार कोटींच्या करारावर सह्या झाल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितली. एक ते दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्याचं उद्दिष्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठेवले आहे.

राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात जागतिक पातळीवरून गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

त्यामुळे दाओसमध्ये झालेल्या परिषदेत पहिल्याच दिवशी मोठी गुंतवणूक होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. धनुष्यबाण चिन्हाचा वाद न्यायालयात चालू असताना मंत्री शंभूराज देसाई यांनी आपली लोकशाहीमध्ये ज्यांच्याकडे बहुमत असते.

त्यांच्याकडेच राजकीय पक्षाची जबाबदारी असते. शिंदे गटाकडे आता बहुमत असल्यामुळेच खऱ्या शिवसेनेचे दावेदार आम्ही असून शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह हे आमचे असल्याचा विश्वासही शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत सध्या दाओस दौऱ्यावर आहेत. त्यामुळे या दौऱ्याविषयी बोलताना शंभूराज देसाई यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे राज्यातील औद्यागिक धोरण विकासाचे आणि प्रगतीचे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दाओस दौऱ्यामुळे पहिल्या दिवशीच औद्योगिक विकासाबरोबर मोठ्या प्रमाणात राज्यात गुंतवणूक झाल्याची माहितीही शंभूराज देसाई यांनी यावेळी दिली. 45 हजार कोटी रुपयांच्या करारावर आज पहिल्याच दिवशी सह्या झाल्याचेही शंभूराज देसाई यांनी सांगितले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.