Independence Day Live Updates : कोरोनाचे नियम पाळा, लवकर कोरोनाला हद्दपार करु- उद्धव ठाकरे
पंतप्रधान नरेंद्र मोदी परंपरेनुसार देशाच्या स्वातंत्र्यदिनी राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन तिरंगा ध्वज फडकावला. तब्बल 1 तास 38 मिनिटे त्यांनी देशातील जनतेला संबोधित केलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा समारंभ कोविड नियमांच्या पालनासह पार पडला.
75th independence day of india 2021 Live updates : भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन…. संपूर्ण देशवासिय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी परंपरेनुसार देशाच्या स्वातंत्र्यदिनी राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन तिरंगा ध्वज फडकावला. तब्बल 1 तास 38 मिनिटे त्यांनी देशातील जनतेला संबोधित केलं. तर मंत्रालयाच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं. यावेळी पुढचा स्वातंत्र्यदिन भयमुक्त, कोरोनामुक्त साजरु करु, असा सगळ्यांनी निश्चय करावा, असं आवाहन करताना नियमांचं पालन करणं गरजेचं आहे, तरच आपण कोरोनाला घालवू शकतो, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
LIVE NEWS & UPDATES
-
जळगावात शिंदाड येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त 75 वर्षांच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचा सत्त्कार
जळगाव : देशभरात सर्वत्र स्वातंत्र्यदिनाचा 75 वा अमृतमहोत्सव साजरा होत आहे. याच दिनाचे औचित्य साधत पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथे 75 वर्षांच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचा रुमाल तसेच गुलाबाचे पुष्प देऊन सत्त्कार करण्यात आला. या उपक्रमाने सर्व ज्येष्ठ नागरिक भारावले होते.
-
नांदेडमध्ये सुवर्ण कामगारांनी काढली तिरंगा रॅली
नांदेड : स्वातंत्र दिनाच्या निमित्ताने नांदेडमध्ये आज सुवर्ण कामगारांनी तिरंगा रॅली काढली.
भव्य दिव्य तिरंगा झेंड्याची ही रॅली पाहण्यासाठी नांदेडकरांनी मोठी गर्दी केली होती.
देशभक्तीच्या जोरदार घोषणाबाजीमुळे तिरंगा रॅली आकर्षण ठरली होती.
यावेळी अनेकांनी या रॅलीचे स्वागत केलं.
-
-
मूर्तीजापूर येथील क्रीडा संकुलात उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांच्या हस्ते ध्वजारोहण
अकोला : जिल्हातल्या मूर्तीजापूर येथील क्रीडा संकुल येथे मूर्तीजापूरचे उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
-
पुढचा स्वातंत्र्यदिन भयमुक्त, कोरोनामुक्त साजरु करु, सगळ्यांनी निश्चय करा- उद्धव ठाकरे
पुढचा स्वातंत्र्यदिन भयमुक्त, कोरोनामुक्त साजरु करु, असा सगळ्यांनी निश्चय करावा
नियमांचं पालन करणं गरजेचं आहे, तरच आपण कोरोनाला घालवू शकतो
-
लसीकरणाने वेग घेतलाय, काल राज्यभरात साडे नऊ लाख लोकांचं लसीकरण
लसीकरणाने वेग घेतलाय… काल राज्यभरात साडे नऊ लाख लोकांचं लसीकरण… राज्यात लसीकरणाचा उच्चांक….
आपण एक निश्चय करु, मी माझं राज्य, देश कोरोनामुक्त करणारच!
-
-
…तर नाईलाजाने आपल्याला लॉकडाऊन लावावं लागेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोनाचं संकट घोंघावतंय… आपण कोरोनाचा कहर अनुभवलाय… आरोग्य सुविधा आपण वाढवतोय… शिथीलता देत असताना ऑक्सिजनचा पुरवठा ठरवून आपण शिथिलता देत आहोत… ज्यावेळी असं लक्षात येईल, की ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतोय, त्यावेळी आपल्याला नाईलाजाने लॉकडाऊन लावावं लागेल
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात
ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना माझं वंदन
महापुरुषांनी स्वराज म्हणजे काय, स्वातंत्र्य म्हणजे काय याचा अर्थ समजावून सांगितला
मला अभिमान आहे, महाराष्ट्रातील 4 पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदकं मिळाली
-
RSS सरसंघचालकांच्या हस्ते मुंबईत ध्वजारोहण
Maharashtra: RSS chief Mohan Bhagwat hoists the national flag at IES Raja Shivaji School in Mumbai, on #IndependenceDay2021 pic.twitter.com/tHnRtQL6Zj
— ANI (@ANI) August 15, 2021
-
पहिल्यापेक्षा विकासाचा वेग वाढलाय, पण गोष्ट इथेच संपत नाही- मोदी
आज सरकारी योजनाओं की गति बढ़ी है और निर्धारित लक्ष्यों को प्राप्त कर रही है। पहले की तुलना में हम तेजी से आगे बढ़े लेकिन सिर्फ यहां बात पूरी नहीं होती। अब हमें पूर्णता तक जाना है: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी https://t.co/DY4AubKDoo
— ANI_HindiNews (@AHindinews) August 15, 2021
-
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण
Prime Minister Narendra Modi hoists the National Flag from the ramparts of Red Fort to celebrate the 75th Independence Day pic.twitter.com/0c3tZ6HQ3X
— ANI (@ANI) August 15, 2021
-
‘माँ तुझे सलाम….’, ITBP जवानांकडून स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ साजरा
Indo-Tibetan Border Police (ITBP) jawans celebrate #IndependenceDay2021 at the banks of Pangong Tso in Ladakh. pic.twitter.com/HSNiCkdxgu
— ANI (@ANI) August 15, 2021
-
पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावर दाखल
Delhi | Defence Minister Rajnath Singh, MoS Defence Ajay Bhatt and Defence Secretary Dr Ajay Kumar receive Prime Minister Narendra Modi at Red Fort pic.twitter.com/QvqinS7kmf
— ANI (@ANI) August 15, 2021
-
पंतप्रधान मोदींकडून महात्मा गांधींना आदरांजली
Delhi | PM Narendra Modi pays tribute to Mahatma Gandhi at Rajghat on the 75th Independence Day
(Photo source: DD News) pic.twitter.com/n9sybFSV1f
— ANI (@ANI) August 15, 2021
-
ऑलिम्पिकवीर खेळाडू लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला पोहोचले
?Join live ?
India is celebrating 75th #IndependenceDay
Watch the celebrations live from the Red Fort
?https://t.co/5MvuhvK6Na #IndiaAt75 #indiaIndependenceday pic.twitter.com/63ayUgTBkR
— PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) August 15, 2021
-
राजधानी नवी दि्ललीतील काही क्षणचित्रे
Glimpses from the Red Fort, Delhi as the nation celebrates 75th #IndependenceDayIndia
PM @narendramodi to unfurl the tricolour ?? and address the nation from the Red Fort, in a few minutes
?https://t.co/5MvuhvK6Na pic.twitter.com/nRpsTmMCtQ
— PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) August 15, 2021
-
स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी मुंबई महापालिकेला आकर्षक रोषणाई
स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला तिरंग्याची रोषणाई करण्यात आली आहे. ही रोषणाई नवी मुंबईकरांचे मन मोहून घेत आहे. त्याचबरोबर पनवेल येथील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या आयकर भवनची विद्युत रोषणाई देखील मन मोहून घेत आहे.
Published On - Aug 15,2021 6:48 AM