Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ती १४ वर्षांची, तो १९ वर्षांचा पाच दिवस गायब होते, अचानक मुलीचा वडिलांना फोन आला आणि…

या मुलीला फसवले असल्याचे आता समोर आले आहे. या मुलीला फसवून तिला जबरदस्तीने आझमगडला नेण्यात आले. आझमगडच्या एका छोट्याशा गावात बंद खोलीत तिला कोंडून ठेवण्यात आले.

ती १४ वर्षांची, तो १९ वर्षांचा पाच दिवस गायब होते, अचानक मुलीचा वडिलांना फोन आला आणि...
Follow us
| Updated on: May 24, 2023 | 1:04 PM

गणेश थोरात, प्रतिनिधी, मुंबई : 14 वर्षांची मुलगी पाच दिवस बेपत्ता होती. तिच्या घराजवळ राहणाऱ्या सैफ खान आणि त्याचा साथीदार मोहम्मद यांनी या मुलीला फसवले असल्याचे आता समोर आले आहे. या मुलीला फसवून तिला जबरदस्तीने आझमगडला नेण्यात आले. आझमगडच्या एका छोट्याशा गावात बंद खोलीत तिला कोंडून ठेवण्यात आले. मुलीचा मोबाईलही तिच्याकडून काढून घेतला. पाच दिवस या मुलीची छेडछाड करण्यात आली. असा आरोप पीडितांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

मुलीने दुसऱ्या कोणाच्या मोबाईलवरून आपल्या वडिलांना कळविले की तिला कुठेतरी कोंडून ठेवण्यात आले आहे. या फोन कॉलचा पाठपुरावा, ट्रेस करताना मुंबई पोलीस आझमगड येथे पोहचले. पाच दिवसांनी या मुलीला ताब्यात घेण्यात आले. मुंबईत आणण्यात आले.

सैफ खानला मदत कुणाची?

या मुलीला पळवणारा, तिच्याशी प्रेमाचे नाटक करणारा सैफ खान हा फक्त १९ वर्षाचा आहे. १९ वर्षाचा मुलगा एकटा अशा प्रकारचे धाडस करू शकत नाही, अशी स्पष्टता भाजपाचे किरीट सोमय्या यांनी केली आहे. किरीट सोमय्या यांनी मुलीची मुलीच्या वडिलांची आणि भांडूपच्या पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. मुंबई पोलिसांनी हे प्रकरण सामान्य प्रकरण म्हणून घेतले, त्याची तीव्र टीका केली.

हे सुद्धा वाचा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सोमय्या यांनी चर्चा केली. त्यानंतर आता हे प्रकरण मुंबई पोलीसचे सहआयुक्त सत्यनारायण हाताळत आहेत. या मुलीला पळवण्यात आलं. या मुलीचे अपहरण करण्यात आलं. पाच दिवस छोट्याशा गावात बंद खोलीत कोंडण्यात आले.

त्या पाच लोकांना अटक करण्याची मागणी

या प्रकरणात सैफ आणि मोहम्मद यांना त्यांच्या परिवाराच्या आणखीन पाच लोकांनी मदत केली. हे प्रकरण लव्ह जिहादच आहे. म्हणून त्याच्यावर कडक कारवाई व्हायला हवी. सैफ आणि मोहम्मद सह त्यांना मदत करणाऱ्या पाच लोकांना ताबडतोब पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

काल संबंधित न्यायालयात मुलीचा जबाब, स्टेटमेटही झाले आहे. मुलीचे वडील आणि मुलीने हे स्पष्टपणे सांगितले आहे की, मुलीची छेडछाड करण्यात आली होती. मुलीला फसवण्यात आले होते. तिचा मोबाईल जप्त करण्यात आला होता. सुदैवाने ज्या परिवारात कोंडून ठेवण्यात आले होते, त्याच घरातील एक मोबाईल काही सेकंदासाठी तिच्या हातात आला आणि तिने वडिलांना कळवले.

जर मुलीला मोबाईलवर वडिलांना निरोप देता आला नसता तर या १३ वर्षाच्या हिंदू मुलीचे काय झाले असते. लव्ह जिहादमधील या प्रकरणावर कडक कारवाईची मागणी सोमय्या यांनी केली आहे. लव्ह जिहाद संबंधात ताबडतोब कायदा आणावा, असे आवाहन किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.