AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? आदित्य ठाकरे यांनी थेट नावच सांगितलं

"आम्ही आमची भूमिका मांडली. उद्धव ठाकरे हा आमचा चेहरा आहे. त्यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. लोक त्यांना पालक म्हणून पाहत आहे. पण महायुतीकडे चेहरा कोण आहे? जे योजनेच्या क्रेडिटवरून भांडतात ते आम्हाला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे विचारत आहेत", असं आदित्य ठाकरे म्हणाले.

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? आदित्य ठाकरे यांनी थेट नावच सांगितलं
आदित्य ठाकरे
Follow us
| Updated on: Sep 06, 2024 | 4:09 PM

आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु असल्याचं बघायला मिळत आहे. याबाबत ठाकरे गटाचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. “महायुतीकडे चेहरा कोण? ते जिंकणार तर नाहीच. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा घेऊन ते जाणार आहेत का? त्यांचं सरकार आहे. त्यांनी सांगावं. आम्ही आमची भूमिका मांडली. उद्धव ठाकरे हा आमचा चेहरा आहे. त्यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. लोक त्यांना पालक म्हणून पाहत आहे. पण महायुतीकडे चेहरा कोण आहे? जे योजनेच्या क्रेडिटवरून भांडतात ते आम्हाला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे विचारत आहेत”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत काय म्हणाले?

“माझा उलटप्रश्न आहे. आता सरकार कुणाचं आहे? महायुतीचं. निवडणुकीत ते हाच चेहरा घेऊन जाणार आहेत का? हा सवाल त्यांना केला पाहिजे. त्यांच्यातून चेहरा कोण? म्हणजे जिंकणार तर नाहीच. पण त्यांच्यातून चेहरा कोण? आमच्यातून एक मत असं आहे की, म्हणून उद्धव ठाकरेंनी त्यादिवशी सांगितलं होतं की, कुणाकडे चेहरा असेल तर जाहीर करुन टाका. आमची स्पष्ट भूमिका अशी आहे की, चेहरा असेल तर अजून चांगली मदत होते”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

“निवडणुकीत विश्वासू चेहरा समोर येतो, जसा आम्ही उद्धव ठाकरे यांचा चेहरा बघतो. विश्वासू आहे. प्रत्येकजण त्यांना कुटुंब प्रमुख म्हणून पाहतो. त्यांचं काम पाहिलं आहे. शेतकरी असेल, महिला असेल, तरुण असेल एक विश्वास आहे. हा माणूस महाराष्ट्रासाठी दिवसरात्र मेहनत करतो, काम करतो आणि महाराष्ट्राच्या हिताचं काम करेल. तसं आज महायुतीकडे चेहरा कोण. त्यांच्याकडे उत्तरच नाही. ते योजनेच्या नावाने भांडत आहेत, तेच चेहरा कोण म्हणून आवाज करत आहेत. आम्ही देऊ महाराष्ट्र हिताचा चेहरा. त्यांच्याकडे कोण चेहरा आहे”, अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी मांडली.

“आमचा आग्रह एकच आहे, तो म्हणजे बदल झाला पाहिजे. महाराष्ट्र म्हणून आवाहन आहे. महाराष्ट्र द्वेष्टे सरकार आहे. मिंधे कधीही निघून जातील. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेल. ज्यांनी निर्लज्जपणे गद्दारी केली ते जातील. अजूनही अंतर्गत चर्चा होईल. सीटवरून ताणलं गेलं असं ऐकायला येईल. हे व्हायला पाहिजे. तिन्ही पक्षाची ताकद असेल तर तुम्ही ती सीट मागाल. त्यात खिंचतान होईल”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

‘भाजपच्या वरिष्ठांच्या मनातही मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचं नाव नाही’

“माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या डोक्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही नाव नाही. फडणवीस यांच्या वरिष्ठांच्या मनातही मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांचं नाव नाही. सर्वात जास्त जागा, बहुमताचं सरकार महाविकास आघाडीचं येईल. आम्ही सर्वजण महाराष्ट्र हितासाठी लढत आहोत. महाराष्ट्राच्या हक्कासाठी लढत आहोत. आमचं सरकार असतं तर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असती. पोलीस हाऊसिंगचं काम सुरू झालं असतं”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

‘मी मनसेवर टीका करणार नाही’

“अनेक उमेदवार उतरतात. १५ ते २० उमेदवार निवडणूक लढवतात. अनेक लोक येत असतात. पंतप्रधान मोदींना तीनदा कमी मते मिळाली. आमच्या उमेदवारांना असं काही घडत नाही. पाच वर्ष सातत्याने काम करणारे पक्ष असतात. काही पक्ष निवडणुकीला उठतात. मी मनसेवर टीका करणार नाही. मी वरळीतूनच लढणार आहे”, अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी मांडली.