कोकणाच्या धर्तीवर मराठवाड्यात ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम-अब्दुल सत्तार

कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमाच्या धर्तीवर मराठवाडा ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तारांनी सांगितले. (abdul sattar said village tourism will start in marathwada)

कोकणाच्या धर्तीवर मराठवाड्यात ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम-अब्दुल सत्तार
अब्दुल सत्तार - महसूल राज्यमंत्री (शिवसेना) - कोरोनाची लागण : 22 जुलै 2020 - कोरोनामुक्त
Follow us
| Updated on: Sep 30, 2020 | 10:12 PM

मुंबई: कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमाच्या धर्तीवर मराठवाडा ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तारांनी सांगितले. मराठवाडा ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीस ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंदकुमार, पर्यटन संचालक दिलीप गावडे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  (abdul sattar said village tourism will start in marathwada)

ग्रामविकास विभागामार्फत कोकणातील ग्रामीण भागातील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधी दिला जातो. यासारखीच योजना मराठवाड्यासाठी राबविता येईल. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अनेक ऐतिहासिक आणि पुरातन वास्तू, किल्ले, गुंफा, अभयारण्ये आदी पर्यटनस्थळे आहेत. याशिवाय कृषी आणि ग्रामीण पर्यटनालाही मराठवाड्यात मोठा वाव आहे, असे अब्दुल सत्तार म्हणाले.

मराठवाड्यात ग्रामीण पर्यटनाला चालना मिळाल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची क्षमता होऊ शकते. या पार्श्वभूमीवर येत्या काळात ग्रामविकास विभागामार्फत कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमाच्या धर्तीवर मराठवाडा ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम राबवण्यात येईल. यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना सत्तार यांनी दिल्या.

मराठवाडा ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्यात यावा, अशी सूचनाही अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली. पर्यटन विभागाच्या सहयोगातून मराठवाड्यातील ग्रामीण भागातील पर्यटनस्थळे सुनिश्चित करुन त्यांचा विकास करणे, तिथे पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ग्रामीण विकास विभागामार्फत निधीची उपलब्धता करुन देणे, याबाबतही यावेळी चर्चा झाली.

संबंधित बातम्या:

राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार? अब्दुल सत्तार म्हणतात…

चंद्रकांत पाटील 32 तारखेची वाट बघू लागले, पण मुंगेरीलालचे स्वप्न पूर्ण होत नाहीत : अब्दुल सत्तार

(abdul sattar said village tourism will start in marathwada)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.