पोलिसांच्या धाडीत बारबाला कुठे गायब व्हायच्या? पत्ता लागला, उल्हासनगरात बारमध्ये छुप्या खोल्यांचं भुयार!
उल्हासनगर शहरात मोठ्या प्रमाणात डान्स बारसह लेडीज बारचे (Action on Ulhasnagar Dance bar) पेव फुटले आहे.
मुंबई : उल्हासनगर शहरात मोठ्या प्रमाणात डान्स बारसह लेडीज बारचे (Action on Ulhasnagar Dance bar) पेव फुटले आहे. इथे पोलिसांच्या कारवाई दरम्यान बारबालांना लपविण्यासाठी, तळ घरात बेकायदा बांधकाम करुन, मोठ्या संख्येने छुप्या खोल्या बांधण्यात आल्या होत्या. त्या खोल्यावर महापालिका अतिक्रमण विभागाने पोलीस बंदोबस्तात हातोडा चालवला. (Action on Ulhasnagar Dance bar)
याठिकाणी ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सर्रास डान्सबार सुरू असून, अश्लील प्रकार सुरू असल्याचे अनेकदा समोर आले आहे. शिवाय हे डान्सबार गुन्हेगारीचे केंद्र बनत आहेत. याठिकाणी बारमध्ये नृत्य करणाऱ्या महिलांवर पैशांची उधळण करणं, अश्लील प्रकार सुरू असतात.
याबाबत पोलिसांनी अनेकदा कारवाई केली आहे, मात्र या गायिकांशिवाय बारबाला त्यांच्या हाती लागत नव्हत्या, त्याकुठे गायब होतात असा प्रश्न पोलिसांना पडायचा. त्या तळ घरातील छुप्या खोल्यांमध्ये जाऊन लापायच्या. त्यांच्यासाठी विशेष अशा या खोल्या बांधल्या गेल्याचे पोलीस आयुक्तांना समजताच, त्यांनी उल्हासनगर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला याची माहिती देत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार पोलिस बंदोबस्तात श्रीराम चौकात असलेल्या अप्पल बार, नाईनटी डिग्री बार, राखी बार, अचल बार, चांदणी बार, हंड्रेड डे बार अशा अनेक डान्सबारमधील छुप्या खोल्या उध्वस्त करण्यात आल्या. दरम्यान या कारवा नंतर उल्हासनगरातील डान्सबार चालविणार्या मालकांचे धाबे दणाणले आहे.