‘अदानी ग्रुप’चे सीईओ ‘कृष्णकुंज’वर, वाढीव वीज बिलाबाबत राज ठाकरेंशी चर्चा

जनक्षोभ झाल्यास मनसे सामान्य नागरिकांच्या बाजूने असेल, असा इशारा राज ठाकरे यांनी 'अदानी ग्रुप'ला दिल्याची माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली.

'अदानी ग्रुप'चे सीईओ 'कृष्णकुंज'वर, वाढीव वीज बिलाबाबत राज ठाकरेंशी चर्चा
Follow us
| Updated on: Sep 07, 2020 | 1:10 PM

मुंबई : वाढीव वीज बिलाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने छेडलेल्या राज्यव्यापी आंदोलनानंतर ‘अदानी ग्रुप’च्या सीईओनी ‘कृष्णकुंज’ची पायरी चढली. ‘अदानी ग्रुप’चे सीईओ आणि शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. (Adani Group CEO meets MNS President Raj Thackeray on Krushnakunj about Electricity Bill issue)

कोरोना काळात जी वीज बिलं आली आहेत, ती खूप जास्त आहेत. जनतेचा आक्रोश वाढत जाईल. जनतेला वीज बिलात सूट द्या, जनक्षोभ झाल्यास मनसे सामान्य नागरिकांच्या बाजूने असेल, असा इशारा राज ठाकरे यांनी ‘अदानी ग्रुप’ला दिल्याची माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली.

“राज्य सरकारसोबत ‘अदानी ग्रुप’ने लवकर वाटाघाटी करावी. मनसे जनतेसोबत आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, उत्पन्नाचे साधन नाही, कोणाचे पगार कमी झाले, अशात आलेली वीज बिले खूप जास्त आहेत. जनतेला वीज बिलात दिलासा दिला नाही, तर त्यांचा उद्रेक होईल आणि निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर कोणाचे नियंत्रण राहणार नाही” असे राज ठाकरे यांनी सांगितले.

‘अदानी ग्रुप’ हे व्यवसाय करत आहेत, हे मान्य आहे, मात्र अशा अपवादात्म्क परिस्थितीत व्यवसाय बाजूला ठेवा आणि मार्ग काढा” अशा सूचना त्यांना दिल्याचे सरदेसाई यांनी सांगितले. “आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर, नयन कदम याचा कित्येक दिवस पाठपुरावा करत आहेत, त्यांच्या नेतृत्वात अनेक भेटीगाठी झाल्या. त्यामुळे यातून लवकरात लवकर पण कसाही मार्ग काढा” असे ‘अदानी ग्रुप’ला सांगितल्याचे नितीन सरदेसाई म्हणाले. यानंतर ‘बेस्ट’ वीज विभागाचे शिष्टमंडळही भेटीला येणार असल्याची माहिती यावेळी बाळा नांदगावकर यांनी दिली.

संबंधित बातम्या :

वाढीव वीजबिलावरोधात मनसे आक्रमक, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर रास्ता रोको 

वीज ग्राहकांनी 50 टक्केच बिल भरावे, ‘बेस्ट’ पदाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर मनसेचे आवाहन

(Adani Group CEO meets MNS President Raj Thackeray on Krushnakunj about Electricity Bill issue)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.