…तर याद राखा, आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला इशारा

अनिल परब यांनी तक्रार केल्यानंतर समिती बसवली. हा कसा कारभार चाललाय. तुम्हाला राग येतोय की नाही, असंही आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना विचारलं.

...तर याद राखा, आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला इशारा
Follow us
| Updated on: Jul 01, 2023 | 6:20 PM

मुंबई : मुंबई महापालिकेची ही वास्तू आर्थिक केंद्र आणि शक्तीपीठ आहे. या वास्तूवर भगवाच असेल. त्याचा आवाजदेखील दिल्लीला ऐकावा लागतो. मुंबईची आज परिस्थिती काय आहे? गेल्या 25 वर्षात आपण जी कामं केली आहेत ती करुन दाखवलं आहे. पण एक वर्ष मुंबई महापालिकेत नगरसेवक, कमिट्या, चेअरमन नाहीत. दाराला कुलूप लावलेले आहेत. प्रशासक आहेत. तुमचा आवाज त्यांना ऐकू येतंय का? तुमची चिंता त्यांना आहे का? तुम्ही मुंबईकर आहात. तुम्ही बिल्डर म्हणून आला तर रेड कारपेट टाकलं जाईल. पण नागरिक म्हणून आला तर वेळ नाहीय. खोके घ्यायचा वेळ आला आहे. असा आरोप ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केला. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

उत्तर द्यायचं नाही असे धोरण

आदित्य ठाकरे म्हणाले, मला अधिकारी फोन करून सांगतात की, निवडणुका लावायचा प्रयत्न करा. तुम्ही असताना कामं व्हायची. पण आता चोरी केली जातेय. त्यामुळे या चोरांना आपल्याला पळवायचं आहे. जानेवारीपासून मी वेगवेगळे विषय मांडण्याचा प्रयत्न केला. हेच निवेदन आम्ही मुंबई महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना दिले. मी आमदार म्हणून धमकी दिली नाही तोपर्यंत त्यांच्याकडून उत्तर आलं नाही. आदित्य ठाकरे यांचं पत्र आलं की उत्तर द्यायचं नाही, हे धोरण आहे.

एसआयटी लावा, घोटाळे बाहेर येतील

मी नवीन राज्यपालांकडे गेलो. नव्या राज्यपालांकडे तक्रार केली. लोकायुक्तांकडे चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली. त्यांनी याबाबत आपण विचार करु, असं सांगितलं. पण अजून झालं नाही. मुंबईवर एसआयटी लावली तशी ठाणे, नागपूर, पुणे महापालिकांवर लावा. घोटाळेच केले आहेत. दुसरं काहीच केलेलं नाही.

मुंबईकरांच्या पैशाला हात लावाल तर…

मुंबईत सगळं काही आम्ही ऐकून घेऊ. पण, मुंबईकरांच्या पैशाला हात लावाल तर याद राखा. पाच हजार बाथरूम नसताना पाच हजार मशीन विकत घ्यायला काढताय. २३ हजार रुपयांचं मशीन ७२ हजार रुपयांना खरेदी करण्याचा यांचा प्रयत्न आहे. अनिल परब यांनी तक्रार केल्यानंतर समिती बसवली. हा कसा कारभार चाललाय. तुम्हाला राग येतोय की नाही, असंही आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना विचारलं.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.