आदित्य ठाकरेंच्या वरळीत भाजपचा दणक्यात दीपोत्सव; मराठी वेशभूषा स्पर्धेनिमित्त बक्षीसांची खैरात
'आपली संस्कृती आपला अभिमान' या कार्यक्रमांतर्गत मराठमोळी वेशभूषा करणाऱ्यांना भरघोस बक्षीसं दिली जाणार आहेत.
विनायक डावरुंग TV9 मराठी, प्रतिनिधी, वरळी : मुंबईतील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीमुळे तर सर्वच राजकीय पक्षांनी अश्वासनांची खैरात सुरू केली आहे. मुंबईतील दहीहंडीनंतर (Dahihandi) आता साऱ्यांचे लक्ष आती दिवाळीतील विविध कार्यक्रमांकडे लागून राहिले आहे. त्यामुळेच आदित्य ठाकरेंच्या (MLA Aditya Thackeray) वरळीतील जांभोरी मैदानात पुन्हा एकदा भाजपकडून दहिहंडी नंतर दीपोत्सवाचं आयोजन केले आहे. आदित्य ठाकरेंच्या या वरळी मतदार संघातच या कार्यक्रमाचे आयोजन केले गेल्याने या भाजपसह इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही या कार्यक्रमाची उत्सुकता लागून राहिली आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन 19 ते 23 ऑक्टोबर या केले जाणार आहे. या कार्यक्रममध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी जोरदार प्रसिद्ध केली जात आहे.
आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघात एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असल्याने आता आदित्य ठाकरे गटाकडूनही कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार का याचीही उत्सुकता लागून राहिली आहे.
जांभोरी मैदानात भाजपकडून दहिहंडीनंतर दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये ‘आपली संस्कृती आपला अभिमान’ या कार्यक्रमांतर्गत मराठमोळी वेशभूषा करणाऱ्यांना भरघोस बक्षीसं दिली जाणार आहेत.
यावेळी मराठमोळी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये पहिलं बक्षीस मारुती अल्टो कार, दुसरं बक्षीस असणार आहे इलेक्ट्रिक बाईक आणि तिसरं बक्षीस हे अॅक्टिवा बाईक दिली जाणार आहे. त्यामुळे मराठमोळ्या कार्यक्रमाकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव, संगती व खाद्यसंस्कृतीचा सोहळा असे या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी केली आहे.
भाजपने वरळी परिसरात दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र नंतर आता मुंबईत मराठामोळा दीपोत्सव साजरा करण्यात येणार असल्याने साऱ्यांचे याकडे लक्ष लागून राहिले आहे. त्याबरोबरच या कार्यक्रमाच्या निमित्ताने बक्षीसांचाही खैरात होणार आहे.