Adity Thackarey | ठाणे खाडी परिसराला रामसर क्षेत्र म्हणून मान्यतेसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविणार : आदित्य ठाकरे

ठाणे खाडीच्या 65 चौरस किलोमीटरच्या परिसरात 17 चौरस किलोमीटर अभयारण्य असून उर्वरित जागेत परिसंस्था (इकोसिस्टीम) असल्याने या क्षेत्रात इतर नवीन बंधने येणार नाहीत. त्यामुळे या परिसरातील जैवविविधता जपणे सुलभ होणार आहे.

Adity Thackarey | ठाणे खाडी परिसराला रामसर क्षेत्र म्हणून मान्यतेसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविणार : आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे, पर्यावणमंत्री
Follow us
| Updated on: Dec 09, 2021 | 11:38 PM

मुंबई : ठाणे खाडी परिसरात जैवविविधता असल्याने या परिसरास आंतरराष्ट्रीय रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून मान्यता मिळण्यासाठी केंद्रीय पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. यामुळे या परिसरातील जैवविविधता जपणे सुलभ होईल, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वेटलँड प्राधिकरणाची चौथी बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. या बैठकीत या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.

या बैठकीस महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, वनविभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी आदी उपस्थित होते.

या परिसरातील जैवविविधता जपणे सुलभ होणार

ठाणे खाडीच्या 65 चौरस किलोमीटरच्या परिसरात 17 चौरस किलोमीटर अभयारण्य असून उर्वरित जागेत परिसंस्था (इकोसिस्टीम) असल्याने या क्षेत्रात इतर नवीन बंधने येणार नाहीत. त्यामुळे या परिसरातील जैवविविधता जपणे सुलभ होणार आहे. देशात एकूण 46 रामसर क्षेत्र आहेत. राज्यात यापूर्वी लोणार सरोवर आणि नांदूर मध्यमेश्वर या दोन क्षेत्रांना रामसर म्हणून मान्यता मिळाली असून ठाणे खाडी क्षेत्राला मान्यता मिळाल्यास राज्यातील हे तिसरे रामसर क्षेत्र असेल.

रामसर पाणथळ क्षेत्र हे नाव का?

जगातील विविध देशांनी एकत्र येऊन पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी इराणमधील रामसर येथे करार केला होता. त्यामुळे या कराराला रामसर करार असे तर पाणथळ जागांना रामसर पाणथळ क्षेत्र असे संबोधले गेले. या कराराअंतर्गत जगातील 168 देश एकत्र आले असून या देशांतील एकूण 2177 पाणथळ जागांचे संरक्षण करीत आहेत. या क्षेत्रांमध्ये भारतातील 27 ठिकाणांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक पाणथळ क्षेत्र या रामसर पाणथळ क्षेत्रात समावेश होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यामध्ये ठाणे खाडीचा क्षेत्राचाही समावेश करण्याचा प्रयत्न सुरु आहे. (Aditya Thackeray’s letter to the Center for recognition of Thane Bay area as Ramsar area)

इतर बातम्या

BMC | मनपा कर्मचाऱ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी ‘आनापानसती’ प्रशिक्षणाचे आयोजन

कामगारांना 50 किलोपेक्षा जास्त वजनाच्यावर भार वाहू देऊ नये, सहकार व पणन मंत्र्यांचे निर्देश

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.