AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maratha Reservation | संजय दत्तच्या खटल्यातील वकील आता नि:शुल्क मराठा आंदोलकांची केस लढणार

Maratha Reservation | राज्यात मराठा आरक्षणाचा विषय तापलाय. आता या प्रकरणात एका प्रसिद्ध वकिलाची एन्ट्री झालीय. या वकिलाने प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तचा खटला लढवला होता. अनेक हाय-प्रोफाईल प्रकरणाच वकीलपत्र त्यांच्याकडे होतं. आता तेच मराठा आंदोलकांची बाजू मांडणार आहेत.

Maratha Reservation | संजय दत्तच्या खटल्यातील वकील आता नि:शुल्क मराठा आंदोलकांची केस लढणार
Sanjay DuttImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 26, 2023 | 12:46 PM
Share

मुंबई : सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा विषय तापलाय. मनोज जरांगे पाटील एकाबाजूला आमरण उपोषणाला बसले आहेत. त्याचवेळी आज सकाळी प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली. परळ येथील क्रिस्टल टॉवरखाली उभी असलेली गुणरत्न सदावर्ते यांची गाडी फोडण्यात आली. गाडी फोडणारे एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी करत होते. पोलिसांनी या प्रकरणी तीन तरुणांना अटक केली आहे. आता प्रसिद्ध वकिल सतीश मानशिंदे यांची यामध्ये एन्ट्री झाली आहे. सतीश मानशिंदे गुणरत्न सदावर्ते वाहन तोडफोड प्रकरणात अटक झालेल्या मराठा तरुणांचा खटला लढवणार आहेत. महत्त्वाच म्हणजे एकही पैसा न घेता मोफत ते हा खटला लढणार आहेत.

सतीश मानशिंदे हे कायदेशीर क्षेत्रातल मोठ नाव आहे. त्यांनी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या केसेस लढवल्या आहेत. 1983 साली सतीश मानशिंदे यांनी वकिल म्हणून सुरुवात केली. राम जेठमालानी यांच्याकडे त्यांनी दशकभर काम केलं. सतीश मानशिंदे हे प्रसिद्ध क्रिमिनल लॉयर म्हणून ओळखले जातात. कर्नाटक विद्यापीठातून लॉ कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतलीय. 90 च्या दशकात सर्वप्रथम सतीश मानशिंदे हे नाव चर्चेत आलं. मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात तुरुंगात बंद असलेला अभिनेता संजय दत्तच वकीलपत्र त्यांनी घेतलं होतं. कुठल्या हाय-प्रोफाइल प्रकरणात वकिल?

त्यानंतर 2002 साली हिट अँड रन प्रकरणात बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा खटला ते लढले. त्यांनी सलमानला जामीन मिळवून दिला होता. सतीश मानशिंदे हे अनेक हाय-प्रोफाईल प्रकरणात वकील होते. आता त्यांची मराठा आंदोलनात एन्ट्री झाली आहे. मराठा आंदोलकांची केस ती निशुल्क लढणार आहेत.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.