Video: अमित शाहांचा एक फोन आणि राणे पिता-पुत्रांची सुटका, पोलीस ठाण्यातले राणेंचे 9 तास नेमके कसे गेले?
दिशा सालियान (Disha Salian) मृत्यू प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी गंभीर आरोप केले आहेत. याच प्रकरणात नारायण राणे आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची आज मालवणी पोलिसांकडून तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली.
मुंबई : दिशा सालियान (Disha Salian) मृत्यू प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी गंभीर आरोप केले आहेत. याच प्रकरणात नारायण राणे आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची आज मालवणी पोलिसांकडून तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली. जबाब नोंदवल्यानंतर नारायण राणे पोलीस ठाण्यातून बाहेर पडले. त्यावेळी राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय. इतकंच नाही तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केल्यानंतर माझा जबाब नोंदवला गेला आणि मग आम्हाला सोडण्यात आल्याचं राणेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
राणे म्हणाले की, ‘मला 9 तास बसवून घेतलं. मी सांगतोय मी केंद्रीय मंत्री आहे, नितेश आमदार आहे. आम्हाला अधिकार आहे कुणावर अन्याय होत असेल तर न्याय मिळवून द्यावा. आम्ही दिशाला न्याय देण्याची मागणी करत आहोत. आम्ही अटकपूर्व जामीन घेतला. शेवटी मी अमित शहांना फोन केला. त्यानंतर माझा आणि नितेशचा जबाब घेतला आणि त्यानंतर आम्हाला सोडलं’, असंही राणेंनी माध्यमाशी बोलताना सांगितलं.
नेमकं काय म्हणाले राणे?
मला दोन दिवसांपूर्वी 41A ची नोटीस आली होती, आपलं म्हणणं सागण्यासाठी यावे अशी नोटीस होती. त्यात असे म्हटले होते की, दिशा सालियानच्या आईने तक्रार केली असल्याने तुम्हाला यावं लागेल. मी आणि नितेश काय बोललो, तिची आत्महत्या नाही हत्या आहे, हे आम्ही वारंवार बोलत आहोत. त्यानंतर मुंबईच्या महापौरांनी त्यांच्या कुटुंबियांना तक्रार करायला भाग पाडलं. आमची बदनामी होतेय. अशी तक्रार केली. खोटी तक्रार केली. आम्हाला अधिकार आहे. मी मंत्री आणि नितेश आमदार आहे. कोणावर अन्याय होत असेल तर आम्हाला अधिकार आहे बोलायचा. तरी माझी नऊ तास चौकशी केली. मी पोलिसांना सर्व सांगितलं. जे घडलं ते सर्व मांडलं. सुशांतची हत्या झाल्यानंतर मला उद्धव ठाकरेंचा दोनवेळा फोन आला की तुम्ही याबाबत बोलू नये. असे सांगितले. मात्र पोलिसांनी माझं हे वाक्य जबाबातून वगळलं. मात्र आम्ही अन्यायाविरुद्ध लढत राहणार. आम्ही आवाज उठवणार. दिशा सालियची केस बंद केली जात आहे. ज्या लोकांनी अत्याचार केला त्यांना सरकार संरक्षण देत आहे. मी शरद पवारांचे वक्तव्य ऐकले. वाह पवारसाहेब, काय बोलावं की कीव करावी हेच कळेना. आमचा कुणा दाऊदसोबत दोस्ती नाही, तो देशद्रोही आहे. त्याच्याशी मलिकांचे संबंध, म्हणून आम्ही राजीनामा मागतोय. तुम्ही आमचे राजीनामे मागता. तुम्ही हेच केलं आयुष्यभर, हीच तुमची पुण्याई आहे. आमचा आवाज तुम्ही दाबू शकणार नाही.
व्हिडीओ पाहा
इतर बातम्या