Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | भाजपच्या नेत्याचा सुपुत्राचा दावा, विधानसभेच्या ‘या’ जागेवरुन महायुतीत तिढा?

Tv9 Marathi Special PKG : लोकसभा निवडणुकीआधीच विधानसभेच्या एका जागेवरून महायुतीमध्ये कुरबुर सुरू झाली आहे. या जागेवर महायुती कोणता उमेदवार देणार? आणि कोणाला माघार घ्यावी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणारय. 

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | भाजपच्या नेत्याचा सुपुत्राचा दावा, विधानसभेच्या 'या' जागेवरुन महायुतीत तिढा?
ajit pawar, eknath shinde and devendra fadnavisImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Feb 18, 2024 | 11:27 PM

मुंबई : लोकसभा निवडणुकींच्याआधीच इंदापूर विधानसभेच्या जागेवरुन राजकारण रंगलंय. इंदापूर विधानसभा हर्षवर्धन पाटील लढणार असल्याचा दावा हर्षवर्धन पाटलांचे पुत्र राजवर्धन पाटलांनी केलाय. त्यामुळे महायुतीत इंदापूरच्या जागेवरुन तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. यावरचा पाहा टीव्ही 9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

महायुतीत इंदापूर विधानसभा मतदारसंघावरुन तिढा निर्माण होण्याची शक्यताय. माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता पाटील आणि पुत्र राजवर्धन पाटलांनी विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केलीय. दरम्यान विधानसभेला जो आमचं काम करेल त्याचच लोकसभेला काम करणार असल्याचा इशारा अंकिता पाटलांनी दिलाय. दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील महायुतीत असल्यामुळे इंदापूरची जागा कोण लढवणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र, त्यापूर्वीच हर्षवर्धन पाटलांचे पुत्र राजवर्धन पाटलांनी इंदापूरच्या जागेवर दावा सांगितलाय.

पाहा व्हिडीओ:-

2014 आणि 2019 मध्ये इंदापूरमधून दत्तात्रय भरणेंनी विजय मिळवला होता. तर दोन्ही वेळेस हर्षवर्धन पाटलांना पराभव स्वीकारावा लागला होता. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे यांनी 1,08,400 मतं मिळवून विजय मिळवला होता. त्यावेळी काँग्रेसकडून लढणाऱ्या हर्षवर्धन पाटलांचा 14 हजार 173 मतांनी पराभव झाला होता. 2019 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं एकत्र निवडणूक लढवल्यामुळे इंदापूरची जागा राष्ट्रवादीला सुटली. त्यामुळे काँग्रेसच्या हर्षवर्धन पाटलांनी 2019च्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या तिकीटावर इंदापूरची निवडणूक लढवली.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे दत्तात्रय भरणेंनी 1,14,960 मतं मिळवून विजय प्राप्त केला. तर भाजपच्या तिकीटावर लढणाऱ्या हर्षवर्धन पाटलांचा 3 हजार 110 मतांनी पराभव झाला. इंदापूरच्या जागेसंदर्भात वरिष्ठ निर्णय घेणार असल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय. दरम्यान इंदापूरचा निर्णय महायुतीचा अंतर्गत प्रश्न असल्याचं म्हणत सुप्रिया सुळेंनीही बोलणं टाळलं.

लोकसभेच्या निवडणुकांआधीच इंदापूर विधानसभेवरुन सध्या राजकारण रंगलंय. त्यामुळे इंदापूरच्या जागेवर महायुती कोणता उमेदवार देणार? आणि कोणाला माघार घ्यावी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणारय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.