MLC Election 2022: तर आघाडी सरकार अल्पमतात येणार?; गुप्त मतदानामुळे आमदार फुटीचा सर्वाधिक धोका कुणाला?

MLC Election 2022: भाजपकडे 106 मते आहेत. त्यांच्या पाचव्या उमेदवाराला 24 मतांची गरज आहे. भाजपला सहा अपक्षांचा पाठिंबा आहे. त्यामुळे भाजपचे पाचवे उमदेवार प्रसाद लाड यांना अजून 18 मतांची आवश्यकता आहे.

MLC Election 2022: तर आघाडी सरकार अल्पमतात येणार?; गुप्त मतदानामुळे आमदार फुटीचा सर्वाधिक धोका कुणाला?
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्रीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 4:58 PM

मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकीत (MLC Election 2022) राज्यसभा निवडणुकीतील पुनरावृत्ती करण्यासाठी भाजप (bjp) सज्ज झाला आहे. तर ही पुनरावृत्ती टाळण्यासाठी महाविकास आघाडीनेही कंबर कसली आहे. या निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून गेल्या तीन दिवसांपासून स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार सक्रिय झाले आहेत. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनीही चाली चालण्यास सुरुवात केली आहे. राज्यसभा निवडणुकीत अपक्षांनी क्रॉस व्होटिंग केलं होतं. त्याचीच पुनरावृत्ती विधान परिषदेत घडवून आणण्यासाठी भाजपने फासे टाकले आहेत. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग झाल्यास राज्यातील आघाडी सरकार अल्पमतात येईल असं सांगितलं जात आहे. मोठ्या प्रमाणावर आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यास ऑपरेशन लोट्स सुरू होण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचं सांगितलं जात आहे. या निवडणुकीत गुप्त मतदान असल्यामुळे क्रॉस व्होटिंगची शक्यता नाकारता येत नाहीये. त्यामुळे आघाडीचे टेन्शन वाढले आहे.

सरकार अल्पमतात का येऊ शकतं?

राज्य विधानसभेत एकूण 285 सदस्य आहेत. विजयासाठी 26 मतांची गरज आहे. शिवसेनेकडे 55 मते आहेत. दोन्ही उमदेवारांना मतदान केल्यानंतर शिवसेनेची हक्काची तीन मते अतिरिक्त होत आहेत. राष्ट्रवादीकडे 51 मते आहेत. त्यांना दुसऱ्या उमेदवारासाठी एका मताची गरज आहे. तर काँग्रेसकडे 44 मते असून दुसऱ्या उमेदवाराला विजयासाठी 8 मतांची गरज आहे. शिवसेनेकडे बच्चू कडू यांच्या प्रहारचे दोन आमदार, शंकरराव गडाख, आशिष जैस्वाल, गीता जैन, चंद्रकांत पाटील अशी काही अतिरिक्त मते आहेत. तर संजय मामा शिंदे, राजेंद्र येड्रावकर, देवेंद्र भुयार यांच्यासह काही जण अजित पवारांच्या संपर्कात आहेत. समाजवादी पार्टी आणि एमआयएमची प्रत्येकी दोन मतेही आघाडीलाच जाणार आहे. आघाडीचे सहाही उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

भाजपकडे 106 मते आहेत. त्यांच्या पाचव्या उमेदवाराला 24 मतांची गरज आहे. भाजपला सहा अपक्षांचा पाठिंबा आहे. त्यामुळे भाजपचे पाचवे उमदेवार प्रसाद लाड यांना अजून 18 मतांची आवश्यकता आहे. बविआची तीन मते जर लाड यांना पडली तर त्यांना 15 मतांची गरज असणार आहे. मनसेचं एक मतही भाजपच्या पारड्यात गेल्यास तरीही लाड यांना 14 मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. अशावेळी आघाडीचे केवळ अपक्ष आमदार फोडून चालणार नाहीये. त्यासाठी त्यांना आघाडीच्या आमदारांनाच फोडावे लागणार आहेत. तरच लाड यांचा विजय होऊ शकतो. अशावेळी आघाडीतील पक्षांचे 14 आमदार फुटल्यास ठाकरे सरकार अल्पमतात येऊ शकतं.

गणित काय आहे?

सध्या शिवसेनेकडे 55, राष्ट्रवादीकडे 51 आणि काँग्रेसकडे 44 आमदार आहेत. म्हणजे आघाडीकडे सध्या एकूण 150 आमदार आहेत. त्यात आघाडीला 17 अपक्षांचा पाठिंबा आहे. त्यामुळे आघाडीची मते 167 झाली आहेत. मात्र, राज्यसभा निवडणुकीत आघाडीचे अपक्ष आमदार फुटले होते. त्यामुळे आताही अपक्ष आणि पक्षाचे आमदार फुटून आघाडीचा एकूण आकडा 145च्या खाली आल्यास सरकार अल्पमतात जाईल. त्यामुळे आघाडीला मोठ्या संकटाला सामोरे जावं लागू शकतं, असं सूत्रांनी सांगितलं.

सर्वाधिक धोका कुणाला?

आमदार फुटीचा सर्वाधिक धोका हा शिवसेना आणि राष्ट्रवादीला असल्याचं सांगितलं जातं. आता पर्यंत या दोन्ही पक्षातील नेत्यांवरच ईडीच्या कारवाया झाल्या आहेत. त्यांनाच ईडीच्या नोटिशी गेल्या आहेत. या दोन्ही पक्षाचे नेते भाजपच्या सातत्याने रडारवर राहिले आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षालाच आमदार फुटीचा सर्वाधिक धोका असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तर अविश्वास प्रस्ताव येऊ शकतो

गुप्त मतदान पद्धत असली तरी आमदारांना व्हीप असतो. त्यामुळे पक्षाला मतदान करावं लागतं. तरीही क्रॉस व्होटिंग झाल्यास काऊंटिंगच्या वेळी मतं फुटल्याचं लक्षात येईल. पण कुणाचं मत फुटलं हे कळणार नाही. त्यामुळे कारवाई करणं कठिण जाईल. पण सहसा आपल्या पक्षाच्या उमेदवाराला पाडण्याचं काम कोणी करत नाही. सरकार स्थिर आहे. सरकारकडे पाठबळ आहे. भाजपकडे जाऊन कुणाचं भलं होणार नाही. खडसेंकडे जाऊनही फायदा होणार नाही. पण जर तरचा भाग पाहता मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग झालीच तर भाजप येत्या अधिवेशनात सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणू शकते. १४५ मतांची गरज आहे. तेवढे मतदान आघाडीकडे आहे. पण पाच पन्नास मते फुटली तरच सरकार अल्पमतात येईल. पण त्यांची शक्यता कमी आहे, असं राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी सांगितलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.