संजय राऊतांनंतर शिवसेनेचा आणखी एक नेता ‘ईडी’च्या रडारवर
एचडीआयएल PMC बँकेत घोटाळा करुन मिळवलेल्या निधीचा मोठा हिस्सा या राजकीय नेत्याला मिळाला आहे. | ShivSena Beneficiary of PMC Bank Fraud
मुंबई: पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्यापाठोपाठ शिवसेनेचा आणखी एक नेता सक्तवसुली संचलनालयाच्या (ED) रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे. हा नेता शिवसेनेचा माजी खासदार असून अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या एका स्थानिक नेत्याचा नातेवाईक असल्याचे सांगितले जाते. हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) आणी PMC बँकेत झालेल्या आर्थिक व्यवहारप्रकरणी PMC Bank Fraud) या नेत्याची ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता असल्याचे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे. (Sanjay Raut one more leader of ShivSena Beneficiary of PMC Bank Fraud)
सूत्रांच्या माहितीनुसार, एचडीआयएल PMC बँकेत घोटाळा करुन मिळवलेल्या निधीचा मोठा हिस्सा या राजकीय नेत्याला मिळाला आहे. त्यामुळे ईडीकडून आता या शिवसेना नेत्याची झाडाझडती घेतली जाणार असल्याचे सांगितले जाते.
वर्षा राऊत यांची चार तास चौकशी
याच प्रकरणात सोमवारी खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची ईडीकडून चार तास चौकशी करण्यात आली. प्रवीण राऊत हे पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्यातील आरोपी आहेत. प्रवीण राऊत यांच्याशी संजय व वर्षा राऊत यांचे आर्थिक संबंध असून, त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा ईडीला संशय आहे.
#संजयराऊत नंतर #शिवसेने चा आणखी एक नेता पीएमसी बँक घोटाळा चा लाभार्थी !! चौकशी व्हायलाच हवी @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @mipravindarekar pic.twitter.com/tXfyTnVV72
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 5, 2021
संशयाच्या आधारे चौकशीसाठी ईडीने वर्षा राऊत यांना चौकशीसाठी नोटिसा बजावल्या होत्या. दोन वेळा तब्येतीचे कारण देत त्यांनी चौकशी टाळली. परंतु, सोमवारी त्या चौकशीसाठी बलार्ड पीयर येथील कार्यालयात हजर झाल्या होत्या.
माधुरी राऊतांकडून घेतलेल्या कर्जातून वर्षा राऊतांनी विकत घेतला फ्लॅट
माधुरी राऊत यांनी 23 डिसेंबर 2010 रोजी वर्षा राऊत यांच्या खात्यात 50 लाख आणि 15 मार्चला 5 लाख रुपये जमा केले होते. हे बिनव्याजी कर्ज असल्याचे सांगण्यात येते. या पैशातून वर्षा राऊत यांनी दादरमध्ये सदनिका विकत घेतली होती. वर्षा आणि माधुरी राऊत या अवनी कन्स्ट्रक्शनमध्ये भागीदार आहेत.
वर्षा राऊत यांचे अवनी कन्स्ट्रक्शनमध्ये अवघ्या 5,625 रुपयांचे भांडवल होते. मात्र, तरीही त्यांना 12 लाखांचे कर्ज देण्यात आले होते. हे कर्ज त्यांनी अजूनही फेडलेले नाही. त्यामुळे आता ईडीकडून वर्षा राऊत यांनी विकत घेतलेल्या फ्लॅटची आणि अवनी कन्स्ट्रक्शनमधील व्यवहारांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या:
वर्षा संजय राऊत यांची ईडी चौकशी का? वाचा सविस्तर
संजय राऊतांच्या पत्नीला PMC बँक घोटाळ्या प्रकरणी ईडीचे समन्स का? नेमकं प्रकरण काय?
(Sanjay Raut one more leader of ShivSena Beneficiary of PMC Bank Fraud)