मुंबईत बोक्यांचा सुळसुळाट, कुत्र्यानंतर आता मांजरांची नसबंदी
मुंबई : कुत्र्यांची नसबंदी केल्यानंतर मुंबई महापालिका आता मुंबईतील मांजरांची नसबंदी करणार आहे. यासाठी महापालिकेने टेंडर काढलं आहे. महापालिका पशु निर्जंतुकीकरण कार्यक्रमाअंतर्गत ही मोहिम हाती घेण्यात येणार आहे. या अंतर्गत भटक्या कुत्र्यांप्रमाणेच मांजरांना आवर घालण्यासाठी नसबंदीची मोहिम हाती घेतली जाईल. मुंबईतील नागरिक आणि नगरसेवकांच्या मागणीनंतर हा कार्यक्रम हाती घेण्यात आलाय. महापालिकेने यासाठीची निविदा काढली आहे. […]
मुंबई : कुत्र्यांची नसबंदी केल्यानंतर मुंबई महापालिका आता मुंबईतील मांजरांची नसबंदी करणार आहे. यासाठी महापालिकेने टेंडर काढलं आहे. महापालिका पशु निर्जंतुकीकरण कार्यक्रमाअंतर्गत ही मोहिम हाती घेण्यात येणार आहे. या अंतर्गत भटक्या कुत्र्यांप्रमाणेच मांजरांना आवर घालण्यासाठी नसबंदीची मोहिम हाती घेतली जाईल.
मुंबईतील नागरिक आणि नगरसेवकांच्या मागणीनंतर हा कार्यक्रम हाती घेण्यात आलाय. महापालिकेने यासाठीची निविदा काढली आहे. पशु जन्म नियंत्रण (एबीसी) या कार्यक्रमाअंतगर्त भटक्या मांजरींवर नसबंदी करण्यासाठी मुंबई महापालिका एका एजन्सीला नियुक्त करणार आहे.
भटक्या मांजरींची वाढती संख्या आणि त्यामुळे होणारे आजार यावर उपाय म्हणून पशु जन्म नियंत्रण कार्यक्रम या अंतर्गत ही मोहिम हाती घेण्यात येईल. भारतीय पशु कल्याण बोर्ड यांच्याकडून घेतलेल्या परवानगीनंतर महापालिकेने मांजरींच्या निर्बीजीकरणाचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी महानगरपालिकेने याच कार्यक्रमाअंतर्गत भटक्या कुत्र्यांची देखील नसबंदी मोहिम राबवली होती. भटक्या मांजरींचा त्रास महापालिकेच्या मुख्य इमारतीत देखील पाहायला मिळतो. पालिका दर पाच वर्षांनी भटक्या कुत्र्यांची गणना करते. मात्र सध्या पालिकेकडे भटक्या मांजरींची एकूण साधारण किती संख्या आहे याची नेमकी माहिती उपलब्ध नाही. कारण, महापालिकेने आतपर्यंत कधी मांजरींची गणना केलेली नाही.
तीन महिन्यात एखादी संस्था या कामासाठी पुढे आल्यावर 1 एप्रिलपासून हे काम सुरू होऊ शकतं. महापालिकेने घेतलेल्या निर्णयाला प्राणीमित्रांनी विरोध केला आहे.