तेव्हा कुठे गेली होती नैतिकता? सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल

devendra fadnavis on supreme court decision : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी न्यायालयाच्या निकालाची माहिती दिली. तसेच उद्धव ठाकरे यांच्या नैतिकतेवर प्रश्न उपस्थित केले.

तेव्हा कुठे गेली होती नैतिकता? सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल
Image Credit source: TV9 NETWORK
Follow us
| Updated on: May 11, 2023 | 2:38 PM

मुंबई : राज्याच्या सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांचा विषय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने अनेक निरीक्षणे नोंदवली. व्हीप, राज्यपालांची भूमिका आणि प्रतोद या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाच्या टिपण्या केल्या. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल नेमका काय आहे, यासंदर्भात माहिती दिली. तसेच आपण निकालाबाबत समाधानी असल्याचे त्यांनी म्हटले. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे सरकार पूर्णपणे कायदेशीर असल्यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केला.

काय म्हणाले फडणवीस

  • उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवले जाऊ शकत नाही. त्यांनी राजीनामा दिला आहे.
  • आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्ष घेणार आहे, हा सर्वोच्च न्यायालय घेणार नाही.
  • निवडणूक आयोग स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतो, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
  • राज्यपालांनी शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा जो निर्णय घेतला, तो योग्य आहे.

सरकार पूर्ण कायदेशीर

हे सुद्धा वाचा

सरकार पूर्णपणे कायदेशीर आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अपात्रतेसंदर्भातील अधिकार अध्यक्षांना आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. राजकीय पक्ष ठरवण्याचा अधिकारीही अध्यक्षांना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जे लोक कालपर्यंत सरकार जाणार म्हणून उड्या मारत होते आता त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं आहे. त्यांनी वेगवेगळ्या चर्चा केल्या त्या किती थोतांड होत्या हेही दिसून आलं असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांना टोला

उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, मी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, भाजपसोबत निवडून आला आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेला, तेव्हा नैतिकता कुठे गेली होती. तुम्ही नैतिकतेवर बोलण्याचा अधिकार नाही.

एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही

एकनाथ शिंदे यांच्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्णय दिला आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांचा राजीनामा देण्याचा प्रश्नच नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा जो निर्णय घेतला, तो सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरवला.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.