Maharashtra NCP Crisis : अजित पवार गटाचा नवीन प्रदेशाध्यक्ष, प्रफुल्ल पटेल यांंची घोषणा

एकीकडे शरद पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना बडतर्फ केलं गेलं आहे. पवारांच्या ट्विटनंतर काहीच वेळात अजित पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये या कार्यकारणीची घोषणा करण्यात आली आहे.

Maharashtra NCP Crisis : अजित पवार गटाचा नवीन प्रदेशाध्यक्ष, प्रफुल्ल पटेल यांंची घोषणा
Follow us
| Updated on: Jul 03, 2023 | 5:55 PM

मुंबई : अजित पवार गटाने पत्रकार परिषद घेत जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवलं आहे. प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारणीची घोषणा केली आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासोबतच प्रफुल्ल पटेल यांनी विधीमंडळाच्या गटनेतेपदी अजित पवार तर प्रतोदपदी अनिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकीकडे शरद पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना बडतर्फ केलं आहे. पवारांच्या ट्विटनंतर काहीच वेळात अजित पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये या कार्यकारणीची घोषणा करण्यात आली आहे.

सुनील तटकरे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची  जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामध्ये युवक प्रदेशाध्यक्षपदी सुरज चव्हाण तर महिला प्रदेशाध्यक्षपदी रूपाली चाकणकर यांची निवड करण्यात आली आहे. शरद पवार हेच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राहणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. त्यासोबतच त्यांनी यावेळी बोलताना विरोधी पक्षनेता आणि प्रतोद या पदांवर एकच व्यक्ती असू शकत नसल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

विरोधी पक्षनेता निवडण्याचं काम विधानसभेच्या अध्यक्षांना आहे. अपात्रतेची नोटीस देणं हे बेकायदेशीर आहे. आता महायुतीचं सरकार असून ते चांगलं काम  करेल. विधानसभा अध्यक्षांकडे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर आम्ही रविवारीच अपात्रतेची कारवाई करण्याचं पत्र दिलं असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.